ETV Bharat / state

कोल्हापूर हादरलं! बिहारी जोडप्याच्या अल्पवयीन मुलीची हत्या, मामानेच अत्याचार करून खून केल्याचा पोलिसांचा अंदाज - MINOR GIRL MURDER - MINOR GIRL MURDER

Minor Girl Murder : कोलकाता, बदलापूर अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच आता कोल्हापुरात धक्कादायक घटना घडलीय. कोल्हापूरमध्ये एका 10 वर्षीय मुलीचा मृतदेह शेतात आढळून आला. अत्याचार करून मुलीची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलाय. त्यामुळं जिल्ह्यात एकच खळबळ उडालीय. कामानिमित्त आलेल्या बिहारी जोडप्याची ही मुलगी आहे.

a 10 year old minor girl sexually abuse and then assassinated in Ramnagar Shiye Village in Kolhapur district
कोल्हापुरात अल्पवयीन मुलीची हत्या (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 22, 2024, 4:07 PM IST

Updated : Aug 22, 2024, 4:33 PM IST

कोल्हापूर Minor Girl Murder : पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यात डॉक्टर महिलेवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेनंतर राज्यातील ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. इतरही काही अशाच प्रकारच्या घटना उघडकीस येत आहेत. या घटनांनंतर राज्यात लोकांचा या नराधमांच्या विरोधात उद्रेक निर्माण झालाय. आता याच घटनांची पुनरावृत्ती कोल्हापूर जिल्ह्यातील शिये गावात घडली असून गावातील रामनगर परिसरातील शेतवडीत 10 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळल्यानं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. लैंगिक अत्याचार करून अल्पवयीन मुलीची हत्या करण्यात आली असल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी व्यक्त केलाय. कामानिमित्त आलेल्या बिहारी जोडप्याची ही मुलगी आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter)

कोल्हापुरातील शिये गावातील रामनगर परिसरामध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली. अल्पवयीन मुलगी बुधवार (21 ऑगस्ट) दुपारपासून बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या पालकांनी शिरोली एमआयडीसी पोलिसात दिली होती. पोलिसांनी काल दुपारपासून शोध मोहीम राबवली. मात्र, मुलीचा पत्ता लागला नाही. त्यानंतर आज सकाळी ही शोध मोहीम पुन्हा सुरू करण्यात आली. यासाठी पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केलं होतं. श्वान पथकानं मुलीच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या शेतवडीत माग काढला. या ठिकाणी पोलिसांना मुलीचा मृतदेह आढळून आला. लैंगिक अत्याचार करून या मुलीचा खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी यावेळी व्यक्त केला आहे. दरम्यान, कोल्हापूर पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतलय. विशेष म्हणजे महायुतीचा आज लाडकी बहीण वचनपूर्ती सोहळा कोल्हापूरमध्ये सुरू असतानाच हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. त्यामुळं राज्यातील मुली आता सुरक्षित आहेत की नाहीत? हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झालाय.

परिसरातील सीसीटीव्हीत धूसर चित्रफीत : परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये अल्पवयीन मुलगी एका अज्ञात व्यक्तीसोबत शेतात जात असल्याचं चित्र अगदी धूसर दिसत आहे. या व्हिडिओवरुन आरोपीचा शोध घेण्याचं काम स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि शिरोली एमआयडीसी पोलीस करत आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर अल्पवयीन मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय. मात्र, बदलापूर नंतर कोल्हापुरात अशा पद्धतीनं घडलेल्या घटनेनं जिल्ह्यात पुन्हा संतापाची लाट उसळली आहे.

हेही वाचा -

  1. भय इथलं संपलं नाही! मुंबईत अल्पवयीन दिव्यांग मुलीवर लैंगिक अत्याचार; नराधम अटकेत - Girl Sexually Abuse Kandivali
  2. शेजारधर्माला काळिमा : 9 वर्षीय चिमुकलीला सार्वजनिक शौचालयात नेऊन दाखवला अश्लील व्हिडिओ, 35 वर्षीय नराधमाकडून लैंगिक अत्याचार - Man Abused 9 Year Girl
  3. अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ, गुन्हेगारांवर कायद्याचा वचक नाही? - minor girl abuse cases

Last Updated : Aug 22, 2024, 4:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.