ETV Bharat / sports

युएईचा एकहाती पराभव करत भारताच्या मुली अशिया चषकाच्या सेमीफायनलमध्ये - INDW vs UAEW T20I - INDW VS UAEW T20I

INDW vs UAEW T20I : महिला आशिया चषक 2024 चा पाचवा सामना भारत महिला संघ आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात दांबुला येथील रंगिरी दांबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघानं युएईचा 78 धावांनी एकहाती पराभव करत आशिया चषकाच्या उपांत्य फेरीत स्थान निश्चित केलंय.

INDW vs UAEW T20I
भारतीय महिला ब्रिगेड युएईविरुद्ध मैदानात (BCCI)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 21, 2024, 3:10 PM IST

Updated : Jul 21, 2024, 5:36 PM IST

दांबुला INDW vs UAEW T20I : भारतीय महिला क्रिकेट संघानं आपल्या पहिल्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव करत आशिया चषकाची विजयी सुरुवात केली. यानंतर आज हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा संयुक्त अरब अमिराती (UAE) विरुद्ध सामना सुरु आहे. या सामन्यात युएईच्या संघानं नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. हा सामना जिंकून उपांत्य फेरीतील आपलं स्थान निश्चित करण्याच्या भारतीय संघाचा प्रयत्न असेल. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 5 बाद 201 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे भारतीय महिला संघानं इतिहासात पहिल्यांदाच 200 धावा करण्याचा पराक्रम केलाय. हिमालयाइतक्या धावांचा पाठलाग करताना युएईचा संघ 20 षटकांत 7 बाद 132 धावांपर्यंत मजल मारु शकला. परिणामी भारतानं हा सामना 78 धावांनी जिंकत उपांत्य फेरीत आपलं स्थान जवळपास निश्चित केलंय.

भारताचा सलग दुसरा विजय : भारतीय महिला क्रिकेट संघानं आशिया चषक स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदवलाय. यूएईविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारतानं 78 धावांनी विजय मिळवला. युएईसमोर विजयासाठी 202 धावांचं मोठं लक्ष्य होतं, ज्याचा पाठलाग करताना युएई संघ 20 षटकांत 7 गडी गमावून 123 धावाच करु शकला. यूएईकडून कविशा इगोदगेनं सर्वाधिक 40 धावांची खेळी केली. याशिवाय कर्णधार ईशा रोहित ओझानं 38 धावांची खेळी केली. भारताकडून दीप्ती शर्मानं सर्वाधिक 2 बळी घेतले.

भारतानं उभारला धावांचा हिमालय : तत्पूर्वी, प्रथम फलंदाजीचं आमंत्रण मिळाल्यानंतर भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर (66 धावा) आणि यष्टीरक्षक फलंदाज ऋचा घोष (नाबाद 64) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारतीय महिला संघानं संयुक्त अरब अमिराती (यूएई) विरुद्ध 5 गडी गमावून 201 धावांची मोठी धावसंख्या उभारली. 35 वर्षीय हरमनप्रीतनं 47 चेंडूंच्या खेळीत सात चौकार आणि एक षटकार मारला. हरमनप्रीतने आंतरराष्ट्रीय टी 20 मध्ये तिचं 12वं अर्धशतक झळकावलं, तर कर्णधार म्हणून तिचं 11वं अर्धशतक ठरलं. तसंच ऋचानं 'फिनिशर'ची भूमिका चोख बजावली आणि 29 चेंडूंच्या खेळीत 12 चौकार आणि एक षटकार लगावला. तिनं डावाच्या शेवटच्या षटकात हीना होतचंदानीच्या गोलंदाजीवर सलग पाच चौकार मारले. ऋचाचं हे टी 20 मधील पहिलंच अर्धशतक ठरलंय.

पहिल्या सामन्यात युएईचा पराभव : युनायटेड अरब अमिरातीला महिला टी 20 आशिया कप क्रिकेट स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. नेपाळनं 23 चेंडू बाकी असताना सहा गडी राखून विजय मिळवला. तत्पूर्वी, अमिरातीचा संघ 8 गड्यांच्या मोबदल्यात 115 धावाच करु शकला. खडकानं 45 चेंडूत 11 चौकारांसह नाबाद 71 धावा केल्या. त्याच्या खेळीच्या जोरावर नेपाळनं 16.1 षटकांत 116 धावांचं लक्ष्य गाठलं.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन :

भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन) : शफाली वर्मा, स्मृती मानधना, दयालन हेमलता, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, ऋचा घोष (यष्टिरक्षक), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, रेणुका ठाकूर सिंग, तनुजा कंवर

UAE महिला (प्लेइंग इलेव्हन) : ईशा रोहित ओझा (कर्णधार), तीर्थ सतीश (यष्टिरक्षक), रिनिता राजित, समायरा धरणीधारका, कविशा अगोगे, खुशी शर्मा, हीना होचंदानी, वैष्णव महेश, रितिका राजित, लावण्य केनी, इंदुजा नंदकुमार.

हेही वाचा :

  1. भारतीय महिला संघाला मोठा धक्का, 'मॅच विनर' श्रेयंका पाटील संपूर्ण स्पर्धेतून पडली बाहेर! - Womens Asia Cup 2024

Last Updated : Jul 21, 2024, 5:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.