ETV Bharat / sports

भारत-न्यूझीलंड कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी प्रेक्षकांना पिण्याच्या पाण्याची समस्या; MCA म्हणालं...

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पुण्यातील गहुंजे येथील स्टेडियमवर आजपासून भारत विरुद्ध न्यूझीलंड क्रिकेट संघात कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे.

MCA Water Crisis
भारतीय क्रिकेट संघ (AP Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : 3 hours ago

पुणे MCA Water Crisis : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पुण्यातील गहुंजे येथील स्टेडियमवर आजपासून भारत विरुद्ध न्यूझीलंड क्रिकेट संघात कसोटी सामन्याला सुरुवात झाली असून कसोटीच्या पहिल्या दिवशीच सामना बघण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना काही काळ पाण्याची समस्या जाणवल्याची तक्रार प्राप्त झाली. मात्र यानंतर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन कडून याची तात्काळ दखल घेण्यात आली आणि सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना गार पाण्याची सोय करुन देण्यात आली.

एमसीएकडून तात्काळ दखल : आजपासून भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामना पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरु झाला आहे. कडक उन्हात हा सामना बघण्यासाठी आलेल्या नागरिकांना सकाळी पाणीच भेटलं नसल्यानं अनेकांनी तात्काळ तक्रार केली आणि याची दखल महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला घ्यावी लागली. याबाबत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी कमलेश पिसाळ म्हणाले की, "आज भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामन्याचा पहिला दिवस असून अतिशय सुंदर नियोजन एमसीएकडून करण्यात आलं आहे. पार्किंगची समस्या देखील अतिशय उत्तम करण्यात आली आहे. सकाळपासून ऊन जास्त असल्यानं सामना बघण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना गार पाणी मिळालं पाहिजे हे आमचं नियोजन होतं. मात्र सामना सुरु असताना लंच दरम्यान रिफेलिंग करण्यासाठी काही वेळ गेल्यानं प्रेक्षकांची गैरसोय झाली. पण याची तात्काळ याची दखल घेण्यात आली आहे." तसंच उद्यापासून पाण्याचं दुपटीनं नियोजन करण्यात येणार असल्याचं पिसाळ यांनी सांगितलं.

कमलेश पिसाळ, सेक्रेटरी, MCA (ETV Bharat Reporter)

वॉशिंग्टनची सुंदर गोलदाजी : दरम्यान आज सामन्याच्या पहिल्या दिवशी या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर न्यूझीलंडनं पहिल्या डावात 259 धावा केल्या. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरनं घातक गोलंदाजी करत सात विकेट घेतल्या. विशेष म्हणजे त्यानं 1329 दिवसांनंतर आज कसोटी सामना खेळला. प्रत्युत्तरात भारतानं पहिल्या दिवशी (24 ऑक्टोबर) खेळ संपेपर्यंत एक गडी गमावून 16 धावा केल्या. शुभमन गिल 10 आणि यशस्वी जैस्वाल 5 धावांवर नाबाद आहेत.

हेही वाचा :

  1. 1329 दिवसांनी संघात परतलेल्या वॉशिंग्टनच्या 'सुंदर' फिरकीत अडकले किवी फलंदाज, न्यूझीलंडचा पहिला डाव संपुष्टात
  2. भारताच्या 'या' पराक्रमाची पुनरावृत्ती करण्यासाठी पाकिस्तानला लागली 60 वर्षे; कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 'असं' चौथ्यांदा घडलं

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.