पुणे Washington Sundar 10 Wickets Haul : न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघ बॅकफूटवर असेल, पण या सामन्यात भारतीय संघाला काही संधी असेल, तर त्याचं सर्व श्रेय वॉशिंग्टन सुंदरला द्यायला हवं. न्यूझीलंडच्या पहिल्या डावात 7 विकेट्स घेतल्यानंतर दुसऱ्या डावातही त्यानं आपल्या अप्रतिम फिरकीचं दर्शन घडवलं आणि आणखी चार बळी घेतले. अशाप्रकारे त्याला सामन्यात आतापर्यंत 11 विकेट घेण्यात यश आलं. यासह तो भारतातील अशा निवडक खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे, ज्यांनी न्यूझीलंडविरुद्ध कसोटीत ही कामगिरी केली आहे.
🚨10 WICKET FOR WASHINGTON SUNDAR IN THE PUNE TEST...!!! 🚨 pic.twitter.com/O9HbhysoRK
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 25, 2024
अश्विननं न्यूझीलंडविरुद्ध तीन वेळा, अनिल कुंबळे आणि सुंदरनं एकदा घेतले 10 बळी : न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीत सर्वाधिक वेळा 10 बळी घेणारा भारतीय गोलंदाज रविचंद्रन अश्विन आहे, जो या सामन्यातही खेळताना दिसत आहे. या संघाविरुद्धच्या तीन वेळा 10 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय अनिल कुंबळेसह इरापल्ली प्रसन्ना आणि एस वेंकटराघवन यांनीही न्यूझीलंडविरुद्ध प्रत्येकी 10 बळी घेतले आहेत. त्यात आता वॉशिंग्टन सुंदर या नव्या नावाची भर पडली आहे. विशेष म्हणजे वॉशिंग्टन सुंदर हा केवळ चौथा कसोटी सामना खेळत असून यामध्ये त्यानं ही कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे या सामन्याच्या पहिल्या डावात सुंदरनं 5 विकेट घेतल्या होत्या, त्यानं पहिल्यांदाच हे काम केलं होतं.
खूप दिवसांनी सुंदरचं संघात पुनरागमन : या मालिकेसाठी वॉशिंग्टन सुंदरचा भारतीय संघात समावेश करण्यात आला नव्हता. पण जेव्हा भारतीय संघ बेंगळुरुमध्ये पहिला कसोटी सामना हरला तेव्हा अचानक निवडकर्त्यांना सुंदरची आठवण झाली. त्याचा केवळ संघात समावेशच नव्हता तर त्याला प्लेइंग 11 मध्येही ठेवण्यात आलं होतं. सुंदरनं येताच या संधीचा फायदा घेतला आणि पहिल्याच डावात सात बळी घेत चमत्कार घडवला. न्यूझीलंडचा एकही फलंदाज सुंदरला नीट खेळू शकला नाही.
1⃣0⃣th wicket of the match for Washington Sundar! 👏 👏
— BCCI (@BCCI) October 25, 2024
He is having a brilliant game with the ball 👌 👌
Live ▶️ https://t.co/YVjSnKCtlI #TeamIndia | #INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/CZPbjhBccj
सामना वाचवणं भारतीय संघासाठी खूप कठीण : पहिल्या डावात सुंदरनं सात गडी आणि अश्विननं तीन विकेट घेत न्यूझीलंड संघाला स्वस्तात बाद केलं तेव्हा मोठी धावसंख्या उभारण्याची जबाबदारी फलंदाजांवर होती. मात्र तसं होऊ शकलं नाही. पहिल्याच डावात न्यूझीलंडनं 100 हून अधिक धावांची आघाडी घेत भारतीय संघाला बॅकफूटवर ढकललं. आता ही स्पर्धा बरीच अडकलेली दिसते. ज्या स्टाईलसाठी ते ओळखले जाते, त्याच शैलीत भारतीय संघानं फलंदाजी केली तर सामना जिंकता येईल, पण परिस्थिती पूर्वीसारखीच राहिली, तर दुसरा पराभव फार दूर दिसत नाही.
हेही वाचा :