ETV Bharat / sports

विनेश फोगटला गमवावा लागला असता जीव... पॅरिस ऑलिम्पिकदरम्यान 'त्या' मध्यरात्री काय घडलं? प्रशिक्षकांनी केले धक्कादायक खुलासे - Vinesh Phogat coach woller Akos

author img

By ETV Bharat Sports Team

Published : Aug 16, 2024, 4:11 PM IST

Vinesh Phogat coach Woller Akos on Weight Loss Session : हंगेरियन प्रशिक्षक वोलार अकोस यांनी खुलासा केला की विनेश फोगटला वजन कमी करण्यासाठी इतर सर्वांनी शक्य ते सर्व प्रयत्न केले. प्रशिक्षकानं त्या रात्रीची संपूर्ण कहाणी एका पोस्टमध्ये सांगितली, जी त्यांनी नंतर हटवली.

Vinesh Phogat
विनेश फोगट (IANS Photo)

नवी दिल्ली Vinesh Phogat coach Woller Akos : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एकही सामना न गमावता विनेश फोगटला पदक मिळालं नाही. याचं कारण म्हणजे तिचं वजन प्रमाणापेक्षा 100 ग्रॅम जास्त होतं. यामुळंच अंतिम सामन्यापूर्वी तिला अपात्र ठरवण्यात आलं आणि तिला कोणतंही पदक मिळालं नाही. यानंतर विनेश क्रीडा न्यायाधिकरणात गेली जिथं तिचं अपील फेटाळण्यात आले. आता जवळजवळ प्रत्येक चाहत्यांना विनेश फोगटच्या संघर्षाची कहाणी माहित आहे, परंतु त्याच दरम्यान तिचे प्रशिक्षक वूलर अकोस यांनी एक खुलासा केला आहे जो खूप धक्कादायक आहे. वूलर अकोसनं सांगितलं की पॅरिस ऑलिम्पिकदरम्यान एका क्षणासाठी त्यांना वाटलं की विनेश फोगट आपला जीव गमावू शकते.

Vinesh Phogat
विनेश फोगट (IANS Photo)

विनेश फोगटचा जीव धोक्यात : विनेश फोगटचे प्रशिक्षक वुलर अकोस यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, विनेश फोगटनं ज्या पद्धतीनं वजन कमी करण्याचा प्रयत्न केला, ते पाहून एकवेळ असं वाटलं की तिला आपला जीव गमवावा लागेल. वूलर अकोस म्हणाले, 'उपांत्य फेरीनंतर तिचं वजन 2.7 किलोनं वाढलं होतं. एक तास 20 मिनिटं वर्कआउट करुनही दीड किलो जास्त होतं. 50 मिनिटांसाठी सॉना सत्र होतं ज्यामध्ये घाम येत नव्हता. असं असूनही विनेशनं अनेक कार्डिओ मशीनवर वर्कआउट केलं. ती मध्यरात्री पहाटे साडेपाचपर्यंत कुस्ती आणि कार्डिओ करत राहिली. अनेकवेळा ती थकव्यामुळं खाली पडली. मला खरोखरच तिचा जीव धोक्यात आला आहे असं वाटलं.'

प्रशिक्षकानं पोस्ट केली डिलीट : विनेशचे प्रशिक्षक वोलार अकोस यांनी हंगेरियन भाषेत ही पोस्ट लिहिली होती, जी त्यांनी आता काढून टाकली आहे. पण त्यापूर्वीच ती वाचली होती. या प्रक्रियेनंतर विनेशला रुग्णालयात दाखल करावं लागलं, तेव्हा अकोसनं उघड केले की विनेशचं हृदय दुखत असलं तरी ती सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करत होती. कुस्तीपटू विनेश फोगटनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 50 किलो कुस्तीच्या अंतिम फेरीत पोहोचून किमान रौप्यपदकाची खात्री केली होती. पण दुर्दैवानं अंतिम सामन्यापूर्वी वजन श्रेणीपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्यानं ती अपात्र ठरली.

हेही वाचा :

  1. पंतप्रधान मोदींनी पॅरिस ऑलिम्पिक खेळाडूंची घेतली भेट; मनू भाकरनं पंतप्रधानांना भेट दिली 'पिस्तूल' - Olympics Players
  2. 'माझं वजन 100 ग्रॅमने वाढलं कारण...' विनेश फोगाटचा मोठा खुलासा - Paris Olympic 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.