मुंबई Rohit Sharma Slams IPL broadcasters : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा नुकताच इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधून बाहेर पडलाय. त्याचा संघ मुंबई इंडियन्स (MI) आयपीएलच्या प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही. आता रोहितनं जूनमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकाची तयारी सुरु केलीय. यादरम्यान रोहित शर्मानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन चाहत्यांमध्ये खळबळ उडवून दिली. ही पोस्ट पाहता रोहितनं संतापून लिहिल्याचं दिसतंय. या पोस्टद्वारे रोहितनं आयपीएल ब्रॉडकास्टर चॅनलला चांगलंच फटकारलंय.
काय म्हणाला रोहित शर्मा : रोहित शर्मानं आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, "क्रिकेटपटूंचं जीवन इतकं अनाहूत बनलं आहे की, कॅमेरे आता आमच्या मित्र आणि सहकाऱ्यांसोबत, प्रशिक्षणात किंवा सामन्याच्या दिवशी गोपनीयतेत करत असलेले प्रत्येक पाऊल आणि संभाषण रेकॉर्ड करत आहेत. स्टार स्पोर्ट्सला माझं संभाषण रेकॉर्ड करु नका असं सांगूनही त्यांनी ते रेकॉर्ड केलं. नंतर प्रसारित केलं गेलं आणि ते गोपनीयतेचा भंग करणारं आहे. एक्सक्सुसीव्ह कंटेंट मिळवण्याची आणि केवळ टीआरपीवर लक्ष केंद्रित करण्याची धडपड यामुळं एक दिवस चाहते, क्रिकेटपटू आणि क्रिकेटमधील विश्वासाला तडा जाईल."
रोहितचे अनेक व्हिडिओ व्हायरल : आयपीएल दरम्यान रोहितचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. ज्यामुळं हिटमॅन स्वतः खुप संतापलेला दिसत आहे. असाच एक व्हिडिओ ब्रॉडकास्टर चॅनलनं प्ले केला होता, ज्यात रोहित मुंबई संघाचा माजी खेळाडू धवल कुलकर्णी आणि इतरांसोबत बोलत होता. त्यानंतर रोहितनं कॅमेरामनला रेकॉर्डिंग न करण्यास सांगितलं होतं. मात्र हा व्हिडिओ चॅनलवर चालला असला तरी या व्हिडिओत रोहित स्वतः म्हणत होता, 'भाऊ, ऑडिओ बंद करा, एका ऑडिओनं माझी वाट लावलीय.' तसंच आणखी एका व्हिडिओत तो कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघाचे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांच्याशी बोलत होता. त्यानंतर हा व्हिडिओ चॅनलवर चालला आणि चांगलाच व्हायरल झाला.
हेही वाचा :