10 Wickets in an Innings : भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळल्या गेलेल्या 19 वर्षाखालील कूचबिहार ट्रॉफीमध्ये बिहार संघाचा युवा वेगवान गोलंदाज सुमन कुमारनं ऐतिहासिक गोलंदाजी करत राजस्थानविरुद्धच्या सामन्यात डावातील सर्व 10 बळी घेतले. बिहार आणि राजस्थानच्या संघांमधला सामना बिहारचं होम ग्राउंड मोईन उल हक स्टेडियमवर खेळला जात आहे. सुमननं राजस्थान संघाच्या पहिल्या डावात एकूण 33.5 षटकं टाकली ज्यात 20 षटकं निर्धाव होती. त्यानं यात 53 धावा देत सर्व 10 विकेट्स घेतल्या.
A masterclass!
— Varun Giri (@Varungiri0) November 30, 2024
Rajasthan U19: 182/10 v Bihar U19 in Cooch Behar Trophy.
-All 10 wickets claimed by one bowler " suman kumar"
scorecard looks beautiful 😍 https://t.co/LGiieQGHaK pic.twitter.com/0FxSFnYGog
सुमन कुमारनं हॅट्ट्रिकही साधली : बिहार संघाचा वेगवान गोलंदाज सुमन कुमारनं 10 विकेट घेतल्या, तर यात त्यानं हॅटट्रिकही केली. सुमननं राजस्थान संघाच्या पार्थ यादव, मनय कार्तिकेय, तोषित, मोहित भगतानी, अनस, सचिन शर्मा, आकाश मुंडेल, जतीन, आभाष श्रीमाळी, ध्रुव आणि गुलाब सिंग यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. सुमनच्या या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर बिहार संघानं राजस्थानचा पहिला डाव अवघ्या 182 धावांवर आटोपला. या सामन्यात बिहार संघानं पहिल्या डावात 467 धावा केल्या होत्या, ज्यात सुमननं फलंदाजीसह महत्त्वपूर्ण योगदान दिलं आणि 56 चेंडूत 22 धावांची खेळी केली आणि यादरम्यान त्याच्या बॅटमधून चार चौकारही निघाले.
सचिनला पॅव्हेलियनमध्ये पाठवत केली हॅट्ट्रिक : राजस्थानविरुद्धच्या कूचबिहार ट्रॉफी सामन्यात सुमन कुमारनं सलग तीन चेंडूत मोहित भगतानी, अनस आणि त्यानंतर सचिनची विकेट घेत हॅटट्रिक पूर्ण केली. या वर्षात देशांतर्गत क्रिकेटमध्ये भारतीय खेळाडूनं एका डावात सर्व 10 विकेट्स घेण्याचा पराक्रम करण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी रणजी ट्रॉफी 2024-25 मध्ये हरियाणाच्या अंशुल कंबोजनं केरळविरुद्धच्या सामन्यात आपल्या डावात 10 विकेट घेतल्या होत्या.
बिहार के बाएं हाथ के युवा स्पिन गेंदबाज़ #SumanKumar ने #CoochBehar ट्रॉफ़ी में इतिहास रच दिया है 🙄
— Syed Hussain (@imsyedhussain) November 30, 2024
सुमन ने #Rajasthan के ख़िलाफ़ हैट्रिक लेते हुए पारी में सभी दस विकेट अपने नाम किए 👏
बोलिंग फ़िगरः 33.5-20-53-10 😳
स्कोरः
बिहार पहली पारी 467
राजस्थान 185 और 173/2
फ़ोटो सौः… pic.twitter.com/5FYUmy2oFS
आतापर्यंत भारतीय क्रिकेटपटूंनी घेतलेल्या 10 विकेट्स :
• 10/20 – प्रेमांसू चटर्जी – बंगाल विरुद्ध आसाम (1956-57)
• 10/46 – देबासिस मोहंती – पूर्व विभाग विरुद्ध दक्षिण विभाग (2000-01)
• 10/49 – अंशुल कंबोज – हरियाणा विरुद्ध केरळ (2024-25)
• 10/74 – अनिल कुंबळे – भारत विरुद्ध पाकिस्तान (1999)
• 10/78 – प्रदीप सुंदरम – राजस्थान विरुद्ध विदर्भ (1985-86)
• 10/78 - सुभाष गुप्ते - बॉम्बे विरुद्ध पाकिस्तान संयुक्त सेवा आणि बहावलपूर इलेव्हन (1954-55)
हेही वाचा :