पल्लेकेले SL vs WI 3rd ODI Live Streaming : श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध वेस्ट इंडिज राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज 26 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. उभय संघांमधील हा सामना पल्लेकेले येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दुपारी अडीच वाजल्यापासून खेळवला जाईल. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेनं वेस्ट इंडिजचा पाच गडी राखून पराभव करत मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. आता तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंका संघ क्लीन स्वीप करण्यासाठी मैदानात उतरेल, तर वेस्ट इंडिज संघाला व्हाईट वॉश टाळायचा आहे. श्रीलंकेची कमान चारिथ असलंकाच्या हाती आहे. तर वेस्ट इंडिजचं नेतृत्व शाई होप करत आहे.
WI keep rallying'💪🏾
— Windies Cricket (@windiescricket) October 25, 2024
Tune in for the third & final ODI v Sri Lanka, tomorrow!📺🤳🏾#SLvWI | #MenInMaroon pic.twitter.com/YOvKZ9Qfnw
श्रीलंकेची गोलंदाजी मजबूत : या मालिकेत श्रीलंका संघाची कामगिरी उत्कृष्ट झाली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या वनडेत श्रीलंकेच्या गोलंदाजांनी वेस्ट इंडिजच्या फलंदाजांवर वर्चस्व राखलं. असिथा फर्नांडो, वानिंदू हसरंगा आणि महिष तिक्षाना यांच्या फिरकी आणि वेगवान गोलंदाजीमुळं विरोधी फलंदाजांना धावा करण्याची एकही संधी मिळाली नाही. मागच्या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार चारिथ असलंकानंही महत्त्वपूर्ण अर्धशतक झळकावत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
वेस्ट इंडिजचा संघर्ष : दुसरीकडे, वेस्ट इंडिजचा संघ या मालिकेत संघर्ष करताना दिसत आहे. दुसऱ्या वनडेत श्रीलंकेच्या फिरकीपटूंसमोर वेस्ट इंडिजची फलंदाजी सपशेल अपयशी ठरली. शेरफेन रदरफोर्ड आणि गुडकेश मोटी यांनी काही चमकदार कामगिरी दाखवत 119 धावांची भागीदारी करुन संघाची धावसंख्या सन्मानजनक पातळीवर नेली. मात्र, संघाला फलंदाजी आणि गोलंदाजीत आणखी सुधारणा करण्याची गरज आहे.
Sri Lanka take a 2-0 lead in the series with one more ODI to play on October 26.🌴🇱🇰 #SLvWI | #MenInMaroon pic.twitter.com/i1X4suEMBQ
— Windies Cricket (@windiescricket) October 23, 2024
दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत 66 वनडे सामने खेळले गेले आहेत. यात श्रीलंकेच्या संघानं 32 सामने जिंकले असून वेस्ट इंडिजनं 31 सामने जिंकले आहेत. तर 3 सामन्यांमध्ये कोणताही निकाल लागला नाही. श्रीलंकेच्या भूमीवर दोन्ही संघांमध्ये 19 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत श्रीलंकेनं 14 सामने जिंकले आहेत. तर वेस्ट इंडिजचा संघ केवळ 3 सामने जिंकू शकला आहे. 2 सामन्यांमध्ये कोणताही निकाल लागला नाही. या मालिकेत श्रीलंकेचा वरचष्मा राहिला आहे.
खेळपट्टी कशी असेल : श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा वनडे सामना 26 ऑक्टोबर रोजी पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना खूप मदत मिळते. नुकत्याच झालेल्या सामन्यांमध्येही तिथं फिरकीपटूंनी चमकदार कामगिरी केली आहे. खेळपट्टीवर धावा काढणं फलंदाजांना थोडं अवघड जाऊ शकते. खेळपट्टीच्या संथ पृष्ठभागामुळं दुसऱ्या डावात फलंदाजी करणं सोपं जाणार नाही. या खेळपट्टीवर सरासरी स्कोअर 240-250 दरम्यान असू शकतो. या खेळपट्टीवर, नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करणं चांगलं होईल, कारण पाठलाग करणाऱ्या संघाला संथ खेळपट्टीमुळं दुसऱ्या हाफमध्ये काही अडचणी येऊ शकतात. पहिल्या दोन सामन्यांमध्येही पाठलाग करणाऱ्या संघानं विजय मिळवला आहे.
श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज तिसरा वनडे सामना कधी आणि कुठं खेळला जाईल?
श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध वेस्ट इंडिज क्रिकेट संघ या तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसरा वनडे सामना 26 ऑक्टोबर (शनिवार) रोजी पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, पल्लेकेले इथं दुपारी 02:30 वाजता खेळवला जाईल. ज्याची नाणेफेक दुपारी 02.00 वाजता होईल.
श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज तिसरा वनडे सामना कुठं आणि कसा पाहायचा?
भारतात श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज एकदिवसीय मालिकेचे प्रसारण हक्क सोनी स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. जे सोनी स्पोर्ट्स टेन 5 टीव्ही चॅनलवर तिसऱ्या वनडे सामन्याचं प्रसारण प्रदान करेल. श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग फॅनकोड आणि सोनी लिव्ह ॲप आणि वेबसाइटवर केलं जाईल.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11 :
श्रीलंका : निशान मदुष्का, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (यष्टिरक्षक), कामिंदू मेंडिस, चारिथ असलंका (कर्णधार), सदिरा समरविक्रमा, जेनिथ लियानागे, विनिदू हसरंगा, दुनिथ वेलालागे, महिश थेक्षाना, असिथा फर्नांडो.
वेस्ट इंडिज : ब्रँडन किंग, ॲलेक अथेनेस, शाई होप (कर्णधार आणि यष्टिरक्षक), केसी कार्टी, रोस्टन चेस, शेरफेन रदरफोर्ड, रोमॅरियो शेफर्ड, गुडकेश मोती, हेडन वॉल्श, जेडेन सील्स, अल्झारी जोसेफ.
हेही वाचा :