ETV Bharat / sports

क्रिकेटला आज मिळणार T20 विश्वचषकाचा नवा विजेता, पहिल्यांदाच कोण उचलणार विश्वचषक? अंतिम सामना 'इथं' पाहा लाईव्ह

ICC महिला T20 विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना आज न्यूझीलंड महिला क्रिकेट संघ विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघ यांच्यात खेळवला जाणार आहे.

author img

By ETV Bharat Sports Team

Published : 17 hours ago

SAW vs NZW T20 WC Final Live Streaming
T20 विश्वचषक अंतिम सामना (Etv Bharat)

दुबई SAW vs NZW T20 WC Final Live Streaming : न्यूझीलंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात ICC महिला T20 विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना आज 20 ऑक्टोबर (रविवार) रोजी दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. अठरा दिवसांच्या थरारक क्रिकेट सामन्यांनतर महिला T20 विश्वचषक 2024 च्या महाअंतिम फेरीचं आयोजन करण्यासाठी स्टेज तयार आहे. जो कोणी जिंकेल त्याच्याकडे स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच ट्रॉफी असेल, त्यामुळं हा विजय विजेत्यासाठी खरोखरच संस्मरणीय ठरणार आहे. सोफी डिव्हाईनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंड संघ आत्मविश्वासानं भरलेला आहे, परंतु लॉरा वोल्वार्ड आणि संघ देखील आत्मविश्वासानं भरलेला आहे.

नवीन विश्वविजेता मिळणार : या फायनलची खास गोष्ट म्हणजे या दोन्ही संघांनी अद्यापही विश्वचषक जिंकलेला नाही. अशा स्थितीत कोणताही संघ हे विजेतेपद मिळवेल, इतिहास बदलणार हे नक्की. सध्याच्या ICC T20 विश्वचषकात दोन्ही संघांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. या स्पर्धेत दोन्ही संघांनी उपांत्य फेरीत शानदार विजय मिळवत अंतिम फेरी गाठली आहे. दक्षिण आफ्रिकेनं ऑस्ट्रेलियाचा पराभव केला तर न्यूझीलंडनं वेस्ट इंडिजचा पराभव केला.

दक्षिण आफ्रिका जबरदस्त फॉर्ममध्ये : या स्पर्धेत दक्षिण आफ्रिका जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. कर्णधार लॉरा वोल्वार्डच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेनं ऑस्ट्रेलियाचा पराभव करत उपांत्य फेरीत शानदार विजयाची नोंद केली. अनेके बॉश आणि मारिझान कॅप हे दक्षिण आफ्रिकेचे प्रमुख फलंदाज आहेत, तर गोलंदाजीमध्ये अयाबोंगा खाका आणि नॉनकुलुलेको मलाबा यांनी महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या आहेत.

न्यूझीलंडची गोलंदाजी उत्तम : न्यूझीलंडनं या स्पर्धेत प्रत्येक आव्हानाचा सामना केला आहे. न्यूझीलंड संघानं उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजविरुद्धचा चुरशीचा सामना जिंकला होता. मात्र, न्यूझीलंड संघाची फलंदाजी आतापर्यंत फारशी छाप पाडलेली नाही. अंतिम सामन्यात कर्णधार सोफी डिव्हाईन, अमेलिया केर आणि सुझी बेट्स यांच्यावर मोठी जबाबदारी असेल. न्यूझीलंडची गोलंदाजी ही त्यांची सर्वात मोठी ताकद आहे. न्यूझीलंडसाठी एडन कार्सन आणि रोझमेरी मार यांनी महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या आहेत.

दोन्ही संघाचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत एकूण 16 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. यात दक्षिण आफ्रिकेनं चार सामने जिंकले आहेत. तर न्यूझीलंडनं 11 सामने जिंकले आहेत. तर एका सामन्याचा निकाल लागला नाही. आकडेवारी पाहता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध न्यूझीलंड संघाचा वरचष्मा असल्याचं स्पष्ट होतं.

ICC महिला T20 विश्वचषकाचा अंतिम सामना कधी खेळला जाईल?

ICC महिला T20 विश्वचषकाचा अंतिम सामना रविवार, 20 ऑक्टोंबर रोजी होणार आहे.

ICC महिला T20 विश्वचषकाचा अंतिम सामना कुठं खेळवला जाईल?

ICC महिला T20 विश्वचषकाचा अंतिम सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई इथं होणार आहे.

ICC महिला T20 विश्वचषकाचा अंतिम सामनाविश्वचषकाचा अंतिम सामना किती वाजता सुरु होईल?

ICC महिला T20 विश्वचषकाचा अंतिम सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 07:30 वाजता सुरु होईल.

ICC महिला T20 विश्वचषकाचा अंतिम सामना टीव्हीवर कुठं पाहायचा?

ICC महिला T20 विश्वचषकाचा अंतिम सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.

ICC महिला T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग कुठं पहायचं?

ICC महिला T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचं लाइव्ह स्ट्रीमिंग तुम्ही डिस्ने+हॉटस्टार ॲप आणि वेबसाइटवर पाहू शकाल.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11 :

दक्षिण आफ्रिका : लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), तझमिन ब्रिट्स, अनेके बॉश, मारिझान कॅप, क्लो ट्रायन, सून लुस, नादिन डी क्लर्क, अनेरी डेर्कसेन, सिनालो जाफ्ता (यष्टिरक्षक), नॉनकुलुलेको म्लाबा, अयाबोंगा खाका.

न्यूझीलंड : सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, अमेलिया केर, सोफी डिव्हाईन (कर्णधार), ब्रूक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गेज (यष्टिरक्षक), रोझमेरी मायर, ली ताहुहू, एडन कार्सन, फ्रॅन जोनास.

हेही वाचा :

  1. 5600 दिवसांत पहिल्यांदाच 'असं' घडलं; दक्षिण आफ्रिकेनं केला सर्वात मोठा 'अपसेट'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.