रामनगर (उत्तराखंड) Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकर जेव्हा क्रिकेट खेळत असे तेव्हा मैदानावरील प्रत्येक क्षणाचा आनंद भरभरुन लुटला. फलंदाजी असो, गोलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण असो, त्यानं क्रिकेटच्या प्रत्येक पैलूचा पुरेपूर आनंद घेतला. आता तो क्रिकेटमधून निवृत्तीचं जीवन जगत असताना, सचिन तेंडुलकरनं प्रवासासोबतच खाद्यपदार्थांचा छंदही तितकाच जोपासलाय.
सचिनने फेसबुकवर शेअर केला व्हिडिओ : नुकताच 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर उत्तराखंडमध्ये गेला होता. तेव्हा सचिन दोन दिवस जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये राहिला. त्यावेळचा एक व्हिडिओ फेसबुकवर शेअर करत सचिन तेंडुलकरनं त्याच्या चाहत्यांना भेट दिलीय. या व्हिडिओत सचिन सांगत आहे की, "आम्ही जंगल सफारीला जात होतो. अचानक पाऊस पडला. जंगल सफारी रद्द करावी लागली. हा व्हिडिओ जिम कॉर्बेट नॅशनल पार्कच्या ढिकाला झोनमध्ये शूट करण्यात आलाय." सचिन मुक्कामाच्या गेस्ट हाऊसच्या स्वयंपाकघरात पोहोचला. तिथं त्यानं पकोडे बनवण्याची रेसिपी स्वयंपाकीला समजावून सांगितली. त्यानंतर सचिन तेंडुलकरनं स्वतः भजी तळून त्याची पत्नी अंजली तेंडुलकरला खाऊ घातल्या. यानंतर अंजलीनंही या पकोड्यांचं कौतुक केलंय.
सचिननं पत्नी अंजलीला खाऊ घातले पकोडे : सचिन तेंडुलकर, त्याची पत्नी अंजली आणि त्याच्या कुटुंबातील इतर सदस्य जगप्रसिद्ध जिम कॉर्बेट नॅशनल पार्कच्या सर्वात प्रसिद्ध ढिकाला झोनमध्ये राहिले होते. सचिननं तेथील जंगल आणि वन्यजीव पाहिले होते. दोन दिवसांच्या सफारीदरम्यान कॉर्बेटचे वन्यजीव आणि व्यवस्थापन याबद्दल सचिनला खूप उत्सुकता होती. दुसऱ्या दिवशीच्या सकाळच्या सफारीदरम्यान सचिन आणि त्याची पत्नी अंजली पावसामुळं जाऊ शकले नाहीत. यावेळी सचिन जंगलाच्या मध्यभागी राहत असलेल्या गेस्ट हाऊसच्या स्वयंपाकघरात त्यानं पत्नीसाठी भजी तळल्या.
सचिन आयपीएल टीम मुंबई इंडियन्सचा मेंटॉर : सचिन तेंडुलकर आयपीएलदरम्यान मुंबई इंडियन्सच्या प्रत्येक मॅचमध्ये दिसतो. खरं तर सचिन तेंडुलकर हा मुंबई इंडियन्स संघाचा मेंटॉर आहे. पण यातून ब्रेक घेत तो जंगलात फिरायलाही गेला. 30 मार्च रोजी तो पत्नी अंजली आणि कुटुंबातील इतर सदस्यांसह ढिकाळा भागात रात्रीच्या विश्रांतीसाठी गेला होता. तिथं त्यानं एक पूर्ण दिवस घालवला आणि रात्रीची विश्रांती देखील घेतली.
हेही वाचा :