ETV Bharat / sports

'हिटमॅन'नं दुसऱ्या वनडेत दोन धावा काढताच रचला इतिहास; 'द वॉल'ला टाकलं मागे - Rohit Sharma

author img

By ETV Bharat Sports Team

Published : Aug 4, 2024, 7:12 PM IST

Updated : Aug 4, 2024, 7:32 PM IST

Rohit Sharma Record : भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मानं नवा विक्रम आपल्या नावे केलाय.

Rohit Sharma Record
रोहित शर्मा (AP Photo)

कोलंबो Rohit Sharma Record : भारतीय क्रिकेट संघ आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मानं फलंदाजीला येताच इतिहास रचलाय. फलंदाजी करताच त्यानं दोन धावा काढताच तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा काढणारा चौथा फलंदाज बनलाय. त्यानं क्रिकेट विश्वात 'द वॉल' म्हणून प्रसिद्ध असलेल्या राहुल द्रविडला मागे टाकलंय.

रोहित शर्मानं राहुल द्रविडला टाकलं : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याच्या डावात रोहित शर्मानं 2 धावा करताच राहुल द्रविडला मागं टाकलं. रोहित शर्मा आता एकदिवसीय फॉर्मेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे, जिथं राहुल द्रविड आधी होता. राहुल द्रविडनं त्याच्या एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीत एकूण 10 हजार 768 धावा केल्या आहेत.

क्रिकेटचा देव पहिल्या क्रमांकावर : एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानं या फॉरमॅटमध्ये एकूण 18 हजार 426 धावा केल्या आहेत. तर या यादीत दुसऱ्या स्थानावर विराट कोहली, तर तिसऱ्या स्थानावर माजी कर्णधार सौरव गांगुली आहे त्यानं 11 हजार 221 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा आता चौथ्या स्थानावर तर राहुल द्रविड पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. एमएस धोनी 10 हजार 599 धावांसह यादीत सहाव्या स्थानावर आहे.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा :

  • 18426 - सचिन तेंडुलकर
  • 13872 - विराट कोहली (वृत्त लिहिपर्यंत)
  • 11221 - सौरव गांगुली
  • 10820 - रोहित शर्मा (वृत्त लिहिपर्यंत)
  • 10768 - राहुल द्रविड
  • 10599 - एमएस धोनी

हेही वाचा :

  1. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कुलदीप-वॉशिंग्टनची 'सुंदर' गोलंदाजी; भारताला किती धावांचं लक्ष्य? - SL vs IND 2nd ODI
  2. भारत विरुद्ध श्रीलंका वनडे सामना हॉटस्टार, जिओ सिनेमावर दिसत नाही; कुठे बघता येईल लाइव्ह मॅच? - IND VS SL 2nd ODI
  3. रोहित-विराट होते शाळेत तर उपकर्णधाराचा झाला नव्हता जन्म..! श्रीलंकेनं भारताविरुद्ध कधी जिंकली होती शेवटची वनडे मालिका? - IND vs SL ODI

Last Updated : Aug 4, 2024, 7:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.