मुंबई Tribute to Ratan Tata : भारतातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं बुधवारी रात्री उशिरा निधन झालं. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा गेल्या काही दिवसांपासून आजारी होते, त्यामुळं त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या निधनामुळं देशभरात शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह क्रीडा जगतातील अनेक खेळाडूंनी याबद्दल शोक व्यक्त केला. भारतीय दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर, वीरेंद्र सेहवाग, शिखर धवन, हरभजन सिंग, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा, T20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याच्यासह अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली.
In his life, and demise, Mr Ratan Tata has moved the nation.
— Sachin Tendulkar (@sachin_rt) October 10, 2024
I was fortunate to spend time with him, but millions, who have never met him, feel the same grief that I feel today. Such is his impact.
From his love for animals to philanthropy, he showed that true progress can… pic.twitter.com/SBc7cdWbGe
सचिननं दिला आठवणींना उजाळा : दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून रतन टाटा यांच्याबद्दलचं प्रेम प्रकट केलं. त्यानं सोशल मीडियावर लिहिलं की, 'रतन टाटा यांनी केवळ त्यांच्या आयुष्यातच नव्हे तर त्यांच्या मृत्यूमध्येही देशाला हादरा दिला. मी त्यांच्यासोबत काही वेळ घालवला. पण जे लाखो लोक त्यांना कधीच भेटले नाहीत ते देखील माझ्यासारखेच सध्या त्रस्त आहेत. हा त्यांचा प्रभाव आहे. प्राण्यांवरील त्यांच्या प्रेमापासून ते त्यांच्या परोपकारापर्यंत टाटा यांनी दाखवून दिलं की, खरी प्रगती तेव्हाच होऊ शकते जेव्हा आपण त्यांची काळजी घेऊ जे स्वतःची काळजी घेऊ शकत नाही. टाटा, तुम्ही उभारलेल्या संस्था, तुमचा वारसा कायम आहे.'
A man with a heart of gold. Sir, you will forever be remembered as someone who truly cared and lived his life to make everyone else’s better. pic.twitter.com/afbAbNIgeS
— Rohit Sharma (@ImRo45) October 10, 2024
रोहित शर्मा : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मानं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, 'एक असा माणूस ज्याच्याकडे सोन्याचं हृदय होतं. सर, तुमची खऱ्या अर्थानं इतरांची काळजी घेणारे आणि इतरांच्या भल्यासाठी आयुष्य जगणारे माणूस म्हणून तुम्ही नेहमी लक्षात रहाल.'
End of an era.
— Surya Kumar Yadav (@surya_14kumar) October 9, 2024
The epitome of kindness, most
inspirational, marvel of a man. Sir, you have touched so many hearts. Your life has been a blessing to the nation. Thank you for your endless and unconditional service.
Your legacy will live on. Rest in glory, sir. 🤍 pic.twitter.com/mCw0xJ84A7
सुर्यकुमार यादव : भारतीय T20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, 'भारतानं एक खरा प्रतीक गमावला आहे. रतन टाटा सरांचं दूरदर्शी नेतृत्व, करुणा आणि परोपकाराची अटल वचनबद्धता आपल्या देशावर आणि जगावर अमिट छाप सोडली आहे. त्यांचा वारसा आपल्या सर्वांना शांततेनं प्रेरणा देतो.'
India has lost a true icon. Ratan Tata Sir’s visionary leadership, compassion, and unwavering commitment to philanthropy have left an indelible mark on our nation and the world. His legacy will continue to inspire us all. Rest in peace, Sir. 🙏 #RIPRatanTata pic.twitter.com/4CZbacRLCG
— Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) October 9, 2024
सुरेश रैना : भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनानं लिहिलं, 'भारतानं एक खरा आयकॉन गमावला आहे. रतन टाटा सरांचं दूरदर्शी नेतृत्व, करुणा आणि परोपकाराची अटल बांधिलकी यांनी आपल्या देशावर आणि जगावर अमिट छाप सोडली आहे. त्यांचा वारसा आपल्या सर्वांना प्रेरणा देत राहील.'
We have lost a true Ratan of Bharat, Shri Ratan Tata ji.
— Virender Sehwag (@virendersehwag) October 9, 2024
His life will be an inspiration for us all and he will continue to live in our hearts. Om Shanti 🙏🏼🌸 pic.twitter.com/CvTRS3VYXp
विरेंद्र सेहवाग : भारताचा माजी दिग्गज सलामीवीर विरेंद्र सेहवागनं लिहिलं, 'आम्ही मूळ भारतीय रत्न गमावलं आहे, त्यांचं जीवन आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, ते नेहमी आपल्या हृदयात राहतील. ओम शांती.'
हरभजन सिंग : 'महान नेत्याच्या निधनानं दु:ख झालं. देव त्यांना शांती देवो. रतन टाटाजी, तुमचा दयाळूपणा आणि योगदान सदैव स्मरणात राहील.'
नीरज चोप्रा : 'रतन टाटाजी यांच्या निधनाबद्दल ऐकून मला खूप दुःख झालं, ते एक दूरदर्शी होते, मी त्यांच्याशी केलेलं संभाषण कधीच विसरणार नाही, टाटाजींनी देशाला प्रेरणा दिली, त्यांच्या कुटुंबियांबद्दल मनापासून संवेदना. ओम शांती.'
हेही वाचा :