नवी दिल्ली Rahul Dravid Son Selected U19 : क्रिकेटविश्वात 'द वॉल' म्हणून प्रसिद्ध असलेला दिग्गज भारतीय फलंदाज आणि माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडनं क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण आता त्याचा मुलगा आपली छाप पाडण्यास तयार आहे. द्रविडचा मुलगा समित द्रविडचा भारताच्या अंडर-19 संघात समावेश करण्यात आला आहे, जो ऑस्ट्रेलिया अंडर-19 संघाविरुद्ध मालिका खेळणार आहे.
बीसीसीआयनं केली घोषणा : बीसीसीआयनं एका मीडिया निवेदनाद्वारे भारताच्या अंडर-19 संघाची घोषणा केली आहे. जे पॉंडिचेरीत एकदिवसीय सामने खेळणार आहे, तर चार दिवसीय सामने चेन्नईत खेळवले जाणार आहेत. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी एका मीडिया निवेदनात सांगितलं की, 'ज्युनियर निवड समितीनं ऑस्ट्रेलिया अंडर-19 विरुद्ध आगामी बहु-स्वरुपातील घरच्या मालिकेसाठी भारतीय अंडर-19 संघाची निवड केली आहे. या मालिकेत पॉंडिचेरी आणि चेन्नईमध्ये तीन 50 षटकांचे सामने आणि दोन चार दिवसीय सामने खेळवले जातील.
समितचा दोन्ही संघात समावेश : उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनचा मोहम्मद अमान एकदिवसीय मालिकेत भारताच्या अंडर-19 संघाचं नेतृत्व करणार आहे. तर चार दिवसीय मालिकेसाठी सोहम पटवर्धन भारतीय अंडर-19 संघाचं नेतृत्व करणार आहे. समित द्रविडचा दोन्ही संघात समावेश करण्यात आला आहे. राहुल द्रविडचा 18 वर्षीय समित हा उजव्या हाताचा फलंदाज आहे आणि अलीकडेच त्यानं KCSA च्या महाराजा ट्रॉफीमध्ये त्याच्या पॉवर हिटिंग कौशल्याचं प्रदर्शन केलं होतं.
- ही एकदिवसीय मालिका 21 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे, तर चार दिवसांची मालिका 30 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे.
- एकदिवसीय मालिकेसाठी भारताचा अंडर-19 संघ : रुद्र पटेल, साहिल पारख, कार्तिकेय केपी, मोहम्मद अमन, किरण चोरमले, अभिज्ञान कुंडू, हरवंशसिंग पंगालिया, समित द्रविड, युधाजित गुहा, समर्थ एन, निखिल कुमार, चेतन शर्मा, हार्दिक राज, रोहित राजावत, मोहम्मद अनन.
- चार दिवसांच्या मालिकेसाठी भारताचा अंडर 19 संघ : वैभव सूर्यवंशी, नित्या पंड्या, विहान मल्होत्रा, सोहम पटवर्धन (कर्णधार), कार्तिकेय केपी, समित द्रविड, अभिज्ञान कुंडू, हरवंशसिंग पनगालिया (यष्टिरक्षक), चेतन शर्मा, समर्थ एन, आदित्य रावत, निखिल कुमार, अनमोलजीत सिंग, आदित्य सिंग, मोहम्मद अनन
हेही वाचा :