मुंबई Paris Olympics 2024 Swapnil Kusale : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन्सच्या अंतिम फेरीत कांस्यपदक जिंकणाऱ्या स्वप्नील कुसाळेनं इतिहास रचलाय. प्रथमच, भारतीय नेमबाजानं या ऑलिम्पिक स्पर्धेत म्हणजे 50 मीटर रायफल 3 पोझिशन स्पर्धेत पदक जिंकलं. यासह कुसाळेनं भारताला तिसरं पदक मिळवून दिलं. विशेष म्हणजे या ऑलिम्पिकमध्ये भारतानं तिन्ही पदकं नेमबाजी क्रीडाप्रकारात मिळवली आहेत.
मराठी पाऊल पडते पुढे....
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 1, 2024
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेतील नेमबाजी खेळातील पुरुष ५० मी.रायफल थ्री पोझिशन विभागात स्वप्नील कुसाळे या कोल्हापूरच्या नेमबाजाने कांस्य पदकावर मोहोर उमटवून संपादन केलेल्या उत्तुंग यशामुळे देशाची मान अभिमानाने उंचावली आहे.
जागतिक क्रीडाविश्वाच्या नकाशावर… pic.twitter.com/NUsjupI1FH
धोनीसारखी आहे कुसाळेची कहाणी : कुसाळेच्या यशाची कहाणी महान क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीसारखी आहे. धोनीप्रमाणेच कुसाळेदेखील मध्य रेल्वेत तिकीट कलेक्टर आहे. स्वप्निल कुसाळे आज (21 ऑगस्ट) दुपारी 1 वाजता अंतिम फेरीत खेळण्यासाठी आला होता. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळणारा कुसाळे हा पहिला भारतीय होता. आपल्या पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये त्यानं भारतासाठी पदक जिंकलं.
Exceptional performance by Swapnil Kusale! Congrats to him for winning the Bronze medal in the Men's 50m Rifle 3 Positions at the #ParisOlympics2024.
— Narendra Modi (@narendramodi) August 1, 2024
His performance is special because he’s shown great resilience and skills. He is also the first Indian athlete to win a medal in… pic.twitter.com/9zvCQBr29y
आई सरपंच आणि वडील शिक्षक : कोल्हापूर म्हटलं की प्रत्येकाला फुटबॉल आठवतं. येथील प्रत्येक पेठांमध्ये आणि गावांमध्ये एक तरी फुटबॉल खेळाडू असतोच. मात्र, मूळचा राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी इथं राहणारा 29 वर्षीय स्वप्नील सुरेश कुसाळे याला अपवाद ठरला. स्वप्नीलचे वडील सुरेश कुसाळे हे जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून काम करतात. तर आई ही गावाची सरपंच असून वारकरी संप्रदायातील आहे. तर स्वप्नीलला एक लहान भाऊ सूरज हादेखील क्रीडा शिक्षक आहे. स्वप्नील लहान असल्यापासूनच घरामध्ये आई वारकरी संप्रदायातील धार्मिक आणि वडील शिक्षक असल्यानं भक्तिमय शैक्षणिक वातावरण होतं. स्वप्नीलचं पहिली ते चौथीचं शिक्षण राधानगरी तालुक्यातील हजार-बाराशे व्यक्तींचं छोटंसं गाव असलेल्या कांबळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत झालं. यानंतर पाचवी ते सातवी त्याचं भोगावती पब्लिक स्कूल इथं पुढील शिक्षण झालं. याचवेळी त्याला क्रीडा विषयात आवड निर्माण झाली. त्याचं पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलातून सांगली इथं प्रशिक्षणासाठी सेंटर मिळालं. यामुळं त्यानं सांगली इथं पुढील शिक्षण सराव सुरू केला.
बिंद्राला पाहण्यासाठी सोडली 12वीची परीक्षा : घरात नेमबाजीची कोणतीही पार्श्वभूमी नसताना स्वप्नीलला या खेळात आवड निर्माण झाली. यातूनच नववीला पुढील प्रशिक्षण घेण्यासाठी नाशिक इथं गेला. यावेळी त्याचं वय अवघे 15 ते 16 वर्ष होतं. इथं प्रशिक्षण घेतल्यानं दहावी पूर्ण केली. सकाळी आणि संध्याकाळी तो तेथे सराव करत दुपारी शाळेला जात होता. त्यानंतर अभिनव बिंद्राला 2008 च्या ऑलिम्पिकमध्ये खेळताना पाहण्यासाठी स्वप्नीलनं 12 वीच्या परिक्षांकडे कानाडोळा केला होता.
मध्य रेल्वेत करतो नोकरी : स्वप्नील हा 2015 पासून मध्य रेल्वेत कार्यरत आहे. एका मुलाखतीत त्यानं सांगितलं, " आतापर्यंतचा अनुभव खूप चांगला आहे. मला नेमबाजी आवडते. मी खूप आनंदी आहे, की मी इतके दिवस ते करू शकलो. नेमबाजीत मी कोणत्याही विशिष्ट खेळाडूचं मार्गदर्शन घेत नाही. पण इतर खेळांमध्ये धोनी माझा फेव्हरेट आहे. माझ्या खेळात शांत राहण्याची गरज आहे. तोही मैदानावर नेहमी शांत असायचा. तोही कधी काळी टीसी होता आणि मीही," असं स्वप्नीलनं एका मुलाखतीत सांगितलं होतं.
नेमबाजीत भारताचे पदक विजेते :
- राज्यवर्धन सिंह राठोड : रौप्यपदक, अथेन्स ऑलिम्पिक (2004)
- अभिनव बिंद्रा : सुवर्णपदक, बीजिंग ऑलिम्पिक (2008)
- गगन नारंग : कांस्यपदक, लंडन ऑलिम्पिक (2012)
- विजय कुमार : रौप्यपदक, लंडन ऑलिम्पिक (2012)
- मनु भाकर : कांस्यपदक, पॅरिस ऑलिम्पिक (2024)
- मनु भाकर-सरबजोत सिंग : कांस्यपदक, पॅरिस ऑलिम्पिक (2024)
- स्वप्नील कुसाळे : कांस्यपदक, पॅरिस ऑलिम्पिक (2024)*
हेही वाचा :