ETV Bharat / sports

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला मिळालं पहिलं पदक; अचूक 'निशाणा' साधत मनू भाकरनं रचला इतिहास - Paris Olympics 2024 - PARIS OLYMPICS 2024

Paris Olympics 2024 Shooting : भारतीय नेमबाज मनू भाकरनं महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक जिंकलं आहे. मनूनं अंतिम फेरीत एकूण 221.7 गुण मिळवले.

Paris Olympics 2024 Shooting
मनू भाकर (AP Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Jul 28, 2024, 4:02 PM IST

Updated : Jul 28, 2024, 4:48 PM IST

पॅरिस Paris Olympics 2024 Shooting : भारतीय अव्वल नेमबाज मनू भाकरनं महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक जिंकलं आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताचं हे पहिलं पदक ठरलं. ऑलिम्पिकच्या इतिहासात महिलांच्या नेमबाजीत पदक जिंकणारी मनू भाकर पहिलीच नेमबाज ठरली. मनूनं अंतिम फेरीत एकूण 221.7 गुण मिळवले.

दक्षिण कोरियानं जिंकलं सुवर्णपदक : मनूनं अंतिम फेरीत 221.7 गुण मिळवले आणि भारताला पॅरिस ऑलिम्पिक 2024 चं पहिलं पदक मिळवून दिलं. दक्षिण कोरियाच्या ओ ये जिननं 243.2 गुणांच्या ऑलिम्पिक विक्रमासह सुवर्णपदक जिंकलं. आणखी एका कोरियाच्या येजिननं 241.3 गुणांसह रौप्यपदकावर कब्जा केला.

पहिलीच महिला भारतीय : मागील 20 वर्षांमध्ये वयक्तिक स्पर्धेत ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरी गाठणारी मनू भाकर पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली आहे. यापूर्वी भारताच्या सुमा शिरुरनं 2004 मध्ये 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत मध्ये अथेन्स इथं झालेल्या स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होती. यासह ऑलिम्पिकच्या इतिहासात महिलांच्या नेमबाजीत भारतासाठी पदक जिंकणारी मनू भाकर पहिलीच नेमबाज ठरली.

टोकीयो 2020 ऑलिम्पिकमध्ये केलं होतं पदार्पण : भारतीय नेमबाज मनू भाकर पॅरिस 2024 मध्ये होणाऱ्या तिच्या दुसऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होत आहे. तिनं टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये पदार्पण केलं होतं. परंतु 10 मीटर एअर पिस्तूल पात्रता दरम्यान तिचं पिस्तूल खराब झाल्यामुळं तिला पदकापासून वंचित रहावं लागलं होतं. मिश्र सांघिक 10 मीटर पिस्तूल आणि 25 मीटर पिस्तूल प्रकारातही तिची पदकं हुकली होती.

नेमबाजीत भारताचे पदक विजेते :

1. राज्यवर्धन सिंह राठोड : रौप्यपदक, अथेन्स ऑलिम्पिक (2004)

2. अभिनव बिंद्रा : सुवर्णपदक, बीजिंग ऑलिम्पिक (2008)

3. गगन नारंग : कांस्यपदक, लंडन ऑलिम्पिक (2012)

4. विजय कुमार : रौप्यपदक, लंडन ऑलिम्पिक (2012)

5. मनु भाकर : कांस्यपदक, पॅरिस ऑलिम्पिक (2024)

हेही वाचा :

  1. बलराज पनवारनं रचजला इतिहास; ऑलिम्पिकमध्ये 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच भारतीय - Paris Olympics 2024

Last Updated : Jul 28, 2024, 4:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.