पॅरिस Paris Olympics 2024 Shooting : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये दोनवेळा कांस्यपदकावर नाव कोरणाऱ्या मनू भाकरनं पुन्हा एकदा अचूक निशाणा लावला आहे. ती आता 25 मीटर पिस्तुल स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरली आहे. महिलांच्या पिस्तुल स्पर्धेत मनू दुसऱ्या क्रमांकावर राहिली. तिनं एकूण 590 गुण मिळवले. मनूनं प्रीसीझनमध्ये 97, 98 आणि 99 गुण केले होते. त्यात तिचे एकूण गुण 294 होते. तर रॅपिडमध्ये तिनं 100, 98 आणि 98 गुण करत एकूण 296 गुण केले. विशेष म्हणजे याच ऑलिम्पिकमध्ये तिसऱ्यांदा अंतिम फेरीत स्थान मिळवलंय. आता देशाला मनूकडून सुवर्णपदकाची अपेक्षा असणार आहे. मनू भाकरचा अंतिम सामना शनिवारी (3 ऑगस्ट) दुपारी एक वाजता होणार आहे.
25m Women's Rapid Pistol Qualification
— SAI Media (@Media_SAI) August 2, 2024
MANU MASTERCLASS!@realmanubhaker 's fantastic run of form at the #Paris2024Olympics continues with a score of 590 as she finishes 2nd, qualifying for the finals.
Esha Singh finished 18th with a score of 581 and failed to qualify for the… pic.twitter.com/rbCXNAUWdw
शनिवारी मनूची जादू पाहायला मिळणार : मनू भाकर शनिवारी भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजता अंतिम सामना खेळेल आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याची तिची ही तिसरी संधी असेल. जर तिनं या अंतिम फेरीत देशासाठी तिसरं पदक जिंकलं तर एकाच ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी नेमबाजीत तिसरं पदक जिंकणारी ती पहिली भारतीय नेमबाज ठरेल. याआधी तिनं भारतासाठी दोन कांस्यपदकंही जिंकली आहेत. तिनं महिलांच्या वयक्तिक 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात तिसरं स्थान मिळवून कांस्यपदक जिंकले. यासह तिनं मिश्र 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक जिंकलं आहे.
नेमबाजीत भारताचे पदक विजेते :
- राज्यवर्धन सिंह राठोड : रौप्यपदक, अथेन्स ऑलिम्पिक (2004)
- अभिनव बिंद्रा : सुवर्णपदक, बीजिंग ऑलिम्पिक (2008)
- गगन नारंग : कांस्यपदक, लंडन ऑलिम्पिक (2012)
- विजय कुमार : रौप्यपदक, लंडन ऑलिम्पिक (2012)
- मनु भाकर : कांस्यपदक, पॅरिस ऑलिम्पिक (2024)
- मनु भाकर-सरबजोत सिंग : कांस्यपदक, पॅरिस ऑलिम्पिक (2024)
- स्वप्निल कुसाळे : कांस्यपदक, पॅरिस ऑलिम्पिक (2024)
हेही वाचा :