ETV Bharat / sports

आयओसीच्या सदस्यपदी नीता अंबानींची फेरनिवड; आयओसीमध्ये स्थान मिळवणाऱ्या पहिल्याच भारतीय महिला - Paris Olympics 2024 - PARIS OLYMPICS 2024

Paris Olympics 2024 : नीता अंबानी यांची आयओसीच्या सदस्यपदी फेरनिवड झाली आहे. सर्व 93 मतदारांनी रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा नीता अंबानी यांच्या बाजूनं मतदान केलं. 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये त्या प्रथमच आयओसीच्या सदस्या बनल्या होत्या.

Paris Olympics 2024
आयओसीच्या सदस्यपदी नीता अंबानींची फेरनिवड (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 25, 2024, 2:53 PM IST

पॅरिस Paris Olympics 2024 : आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं नीता अंबानींवर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला आहे. इंटरनेशनल ऑलिम्पिक कमेटी (IOC) च्या सदस्यपदी त्यांची एकमतानं फेरनिवड झाली आहे. यात एकूण 93 मतदारांनी मतदान केलं आणि सर्व 93 मतं नीता अंबानी यांच्या बाजूनं म्हणजेच 100 टक्के मतं पडली. नीता अंबानी 2016 मध्ये रिओ दि जानेरो ऑलिम्पिक गेम्समध्ये प्रथमच आयओसीच्या सदस्या म्हणून निवडून आल्या होत्या. त्या रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा आहेत.

निवड झाल्यावर काय म्हणाल्या नीता अंबानी : पुन्हा एकदा IOC च्या सदस्यपदी निवड झाल्यावर नीता अंबानी म्हणाल्या, "आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची सदस्या म्हणून पुन्हा निवड झाल्याबद्दल मला खूप अभिमान वाटत आहे. मी अध्यक्ष आणि आयओसी मधील माझ्या सर्व सहकाऱ्यांनी माझ्यावर विश्वासा व्यक्त केल्याबद्दल त्यांचे आभार मानू इच्छिते. ही पुनर्निवडणूक केवळ माझ्यासाठीच नाही, तर जागतिक क्रीडा क्षेत्रात भारताचा वाढता प्रभाव दर्शविते. हा क्षण मी अतिशय आनंदानं आणि गर्वानं प्रत्येक भारतीयासोबत साजरा करु इच्छीते तसंच भारतात आणि जगभरात ऑलिम्पिक चळवळ मजबूत करण्यासाठी मी तत्पर असेल."

आयओसीमध्ये स्थान मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला : नीता अंबानी यांच्या नेतृत्वाखाली भारताला 40 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आयओसीच्या वार्षिक बैठकीचं यजमानपद मिळालं होतं. 2023 मध्ये मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये याचं यशस्वी आयोजन करण्यात आले होते. नीता अंबानी यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये इंडिया हाऊस बांधण्यात आलं आहे. पॅरिस ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडू, समर्थक आणि प्रेक्षकांसाठी ते घरासारखं आहे. 2016 मध्ये रिओ दी जानेरो ऑलिम्पिक खेळादरम्यान नीता अंबानींचा या प्रतिष्ठित संस्थेत प्रथम समावेश करण्यात आला होता. आयओसीमध्ये स्थान मिळवणाऱ्या त्या भारतातील पहिल्या महिला आहेत. नीता अंबानी गेल्या आठ वर्षांपासून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचा भाग आहेत. त्या भारतातील आयपीएल आणि आयएसएलशी खूप सक्रियपणे जोडलेल्या आहेत.

हेही वाचा :

  1. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतर देशांकडून खेळणारे 'हे' खेळाडू भारतीय वंशाचे; मुंबईच्याही एका खेळाडूचा समावेश' - Paris Olympics 2024
  2. अशक्य! ऑलिम्पिक इतिहासातील 'हे' 10 विश्वविक्रम मोडणे जवळपास कोणत्याही खेळाडूच्या आवाक्याच्या बाहेर - Paris Olympics 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.