पॅरिस Paris Olympics 2024 Archery : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये तिरंदाजीच्या मिश्र सांघिक स्पर्धेत अंकिता भाकत आणि धीरज बोम्मादेवरा यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. अंकिता-धीरज जोडीनं इंडोनेशियन जोडीचा 5-1 असा पराभव केला. भारतीय जोडी पदक जिंकण्यापासून दोन विजय दूर आहे. या स्पर्धेचे उपांत्यपूर्व सामने आज संध्याकाळी 05:30 पासून खेळवले जाणार आहेत.
Recurve Mixed Team 1/8 Elimination Round
— SAI Media (@Media_SAI) August 2, 2024
Ankita Bhakat and @BommadevaraD put up a clinical performance against Indonesia’s Choirunisa Diananda & Pangestu Arif, defeating them 5-1!
With this, they qualify for the Quarter-finals where they will face the winner of the match… pic.twitter.com/OXFp7Zqogb
भारतीय मिश्र तिरंदाजी संघ उपांत्यपूर्व फेरीत : स्टार तिरंदाज धीरज बोम्मादेवरा आणि अंकिता भाकत यांनी शुक्रवारी पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये मिश्र सांघिक स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व सामन्यात कमी मानांकित इंडोनेशियन संघावर 5-1 असा जोरदार विजय नोंदवला. या विजयासह भारतानं उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
कसा मिळवला विजय : अंकिता भाकत आणि बोम्मादेवरा जोडीनं पहिला सेट 37-36 असा जिंकला. दुसरा सेट 38-38 असा बरोबरीत राहिला. त्यानंतर भारतीय जोडीनं तिसरा सेट 38-37 असा जिंकला. दरम्यान, पाचव्या मानांकित भारतीय जोडीनं लेस इनव्हॅलिड्स इथं उपउपांत्यपूर्व सामना खेळताना पाचवेळा 10 गुण कमावले.
उपांत्यपूर्व फेरीचा सामना कधी : या स्पर्धेच्या पदक फेरीही आजच खेळल्या जाणार आहेत. भारताच्या या स्टार जोडीचा उपांत्यपूर्व फेरीत आज सायंकाळी 05:54 वाजता स्पॅनिश संघाशी सामना होणार आहे. कारण उपउपांत्यपूर्व सामन्यात स्पेननं चीनचा 6-2 असा पराभव केला होता.
दीपिका कुमारीही उपांत्यपूर्व सामन्यात : यापूर्वी भारतीय तिरंदाज दीपिका कुमारीनंही बुधवारी पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या 1/16 एलिमिनेशन फेरीत डच (नेदरलँड्स) तिरंदाज रोफेन क्विंटीचा 6-2 असा पराभव करुन 1/8 फेरीत प्रवेश केला. दीपिकानं सुरुवातीपासूनच सामन्यावर वर्चस्व गाजवलं आणि तिच्या प्रतिस्पर्ध्यानंही काही चुका केल्या, ज्यामुळं सामना तिच्या बाजूनं फिरला.
हेही वाचा :
- अवघ्या 46 सेकंदात बॉक्सिंगमध्ये विजय, महिलेविरुद्ध पुरुष बॉक्सर रिंगणात? पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नवा वाद - Paris Olympics 2024
- स्वप्निल कुसाळे आता 'ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी' ; ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकताच मध्य रेल्वेनं दिली पदोन्नती - Paris Olympics 2024
- बॉक्सर लोव्हलिनाचा विजयी 'पंच'; पदक निश्चित करण्यापासून फक्त एक 'विजय' दूर - Paris Olynmpics 2024