कराची Artificial intelligence in Cricket : AI (आर्टिफिशियल इंटेलिजेंस) आता लोकांना त्यांच्या कामात मदत करत आहे. त्यामुळं आता हे साधन आता क्रिकेटमध्येही दाखल होण्याची शक्यता आहे. कारण अनेक दिवसांपासून खराब कामगिरीतून जात असलेल्या पाकिस्तानी किक्रेट संघात आता आमूलाग्र बदल होत आहेत. अलीकडेच, पाकिस्तानमधील 150 खेळाडूंपैकी 80 टक्के संगणकाद्वारे आणि 20 टक्के जुन्या पॅटर्नद्वारे निवडले गेले आहेत, म्हणजे मानवाद्वारे. परिणामी खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं (पीसीबी) यासाठी आराखडा तयार केला आहे.
PCB Chairman Mohsin Naqvi's press conference at Gaddafi Stadium, Lahore 🏏#𝐃𝐢𝐬𝐜𝐨𝐯𝐞𝐫𝐢𝐧𝐠𝐂𝐡𝐚𝐦𝐩𝐢𝐨𝐧𝐬 pic.twitter.com/YQOUNcEPlg
— Pakistan Cricket (@TheRealPCB) August 26, 2024
नकवी यांची योजना काय : ही संपूर्ण योजना पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांची आहे. नकवी यांच्या मते, चॅम्पियन्स कपमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंचं संगणाकाद्वारे म्हणजेच AI वापरुन मूल्यांकन केलं जाईल, त्यानंतर त्यांना पाकिस्तानी संघात समाविष्ट केलं जाईल. तर खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संघातून वगळण्यात येईल. याविषयी बोलताना नकवी पुढं म्हणाले, चॅम्पियन्स कप सप्टेंबरमध्ये संपेल आणि त्यानंतर प्रत्येकाच्या खेळाडींचं परिक्षण केलं जाईल. जो कोणी कामगिरी करणार नाही त्याला संघातून काढण्यात येईल. हे कोणाच्याही वैयक्तिक मतांवर आणि इच्छांवर अवलंबून नसेल.
5 खेळाडू संघाचे मार्गदर्शक : यापूर्वी, पीसीबीने चॅम्पियन्स कप स्पर्धेतील संघांचे मार्गदर्शक म्हणून आपल्या 5 अव्वल क्रिकेटपटूंना नामांकित केलं होतं. मोहसीन नकवी यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे निर्णय जाहीर केला की मिसबाह-उल-हक, सकलेन मुश्ताक, सरफराज अहमद, शोएब मलिक आणि वकार युनूस या स्पर्धेतील 5 संघांचं मार्गदर्शन करतील आणि त्यांच्या खेळाच्या पातळीवर देशांतर्गत क्रिकेटपटूंना प्रशिक्षण देतील वाढण्यास मदत करतील.
80% AI 🫣
— Waheed Malik (@waheed__malik) August 27, 2024
Cricket is in safe hands now 🇵🇰#PakistanCricket pic.twitter.com/jy5JRZLO45
पाकिस्तानमध्ये खेळाडूंची नोंद नाही : खरं तर, अलीकडेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (पीसीबी) अध्यक्षांनी एक विचित्र विधान केलं होतं. ज्यात त्यांनी दावा केला की पाकिस्तानच्या देशांतर्गत खेळाडूंकडं त्यांच्या नावाचा कोणताही डाटा नाही, ज्यामुळं निवड धोरणात समस्या आहे. नकवी म्हणाले, आमच्याकडे असे अनेक खेळाडू होते ज्यांचे रेकॉर्ड आमच्याकडे नव्हते. हा चषक देशांतर्गत क्रिकेट मजबूत करेल, आमच्याकडे 150 खेळाडूंचा पूल असेल. दरम्यान, एका आश्चर्यकारक विधानात ते पुढे म्हणाले की पीसीबीनं चॅम्पियन्स कपसाठी संघ बनवण्यासाठी संगणकाचा (AI) वापर केला.
80 टक्के खेळाडू AI द्वारे निवडले : याबाबत पीसीबी चेअरमन नकवी म्हणाले, निवडण्यात आलेल्या 150 खेळाडूंपैकी 80 टक्के संगणकानं (AI) निवडले आहेत आणि 20 टक्के माणसं वापरुन निवडले आहेत. कोणीही त्याला आव्हान देऊ शकत नाही. आम्ही आमच्या निवड समितीला सुमारे 20 टक्के वेटेज दिलं. आम्ही एखाद्या वाईट खेळाडूच्या जागी वाईट खेळाडू घेतल्यास, तुम्ही सर्वप्रथम तक्रार कराल. अशा परिस्थितीत, आमच्याकडे रेकॉर्ड असेल आणि आम्ही सर्वजण पारदर्शकपणे पाहू शकू की संघात स्थान कोणतं आहे.
हेही वाचा :