ETV Bharat / sports

पाकिस्ताननं इंग्लंडविरुद्ध मालिका जिंकल्यावर कर्णधाराशिवाय केली चार संघांची घोषणा

झिम्बाब्वे आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी पाकिस्ताननं चार संघ जाहीर केले आहेत. पाकिस्तानी संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंना संधी मिळाली आहे.

Pakistan Squad Announced
पाकिस्तान क्रिकेट संघ (AFP Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Oct 27, 2024, 3:03 PM IST

मुलतान Pakistan Squad Announced : पाकिस्तान क्रिकेट संघाला नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वेविरुद्ध वनडे आणि T20 मालिका खेळायची आहे. यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं चार संघांची घोषणा केली आहे. विशेष बाब म्हणजे पीसीबीनं चारही संघात एकाही खेळाडूला कर्णधार बनवलेलं नाही. काही काळापूर्वी बाबर आझमनं मर्यादित षटकांचं कर्णधारपद सोडलं होतं. पाकिस्तानचा ऑस्ट्रेलिया दौरा 4 ते 18 नोव्हेंबर दरम्यान चालेल, तर झिम्बाब्वे दौऱ्यात 24 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत बुलावायो इथं खेळवले जातील.

बाबर आझमचं पुनरागमन : बाबर आझम, नसीम शाह आणि शाहीन शाह आफ्रिदी यांना इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या दोन कसोटी सामन्यांमधून वगळण्यात आलं होतं. आता हे तिन्ही खेळाडू वनडे संघात परतले आहेत. मात्र झिम्बाब्वे दौऱ्यासाठी त्यांना विश्रांती देण्यात आली आहे. मोहम्मद रिझवान ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे सामन्यांसाठी उपलब्ध असतील. वनडे संघातील अनकॅप्ड खेळाडूंमध्ये आमिर जमाल, अराफत मिन्हास, फैसल अक्रम, हसीबुल्ला, मुहम्मद इरफान खान आणि सॅम अयुब यांचा समावेश आहे. जहाँदाद खान आणि सलमान अली आगा पहिल्यांदाच T20 संघात सामील झाले आहेत.

मोहम्मद हसनैनचं पुनरागमन : चॅम्पियन्स वनडे कपमध्ये फास्ट बॉलर मोहम्मद हसनैनं गेल्या महिन्यात फैसलाबादमध्ये 17 विकेट्स घेतल्या होत्या, तो देखील एकदिवसीय संघात परतला आहे, जो जानेवारी 2023 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध वनडे सामन्यात पाकिस्तानकडून शेवटचा सामना खेळला होता. वनडे संघाचे सात खेळाडू बाबर आझम, फैसल अक्रम, हरिस रौफ, मोहम्मद हसनैन, मोहम्मद इरफान खान, नसीम शाह आणि शाहीन शाह आफ्रिदी 28 ऑक्टोबरला मेलबर्नला पोहोचतील. तर उर्वरित खेळाडू 29 ऑक्टोबरला रवाना होतील.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे आणि T20 मालिकेसाठी पाकिस्तान संघ :

वनडे संघ : आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, अराफात मिन्हास, बाबर आझम, फैसल अक्रम, हरिस रौफ, हसिबुल्लाह (यष्टिरक्षक), कामरान गुलाम, मोहम्मद हसनैन, मोहम्मद रिझवान (यष्टिरक्षक), मोहम्मद इरफान खान, नसीम शाह, सैम अयुब, सलमान अली आगा, शाहीन शाह आफ्रिदी.

T20 संघ : अराफत मिन्हास, बाबर आझम, हारिस रौफ, हसिबुल्लाह, जहांदद खान, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद रिझवान (यष्टिरक्षक), मोहम्मद इरफान खान, नसीम शाह, ओमेर बिन युसूफ, साहिबजादा फरहान, सलमान अली आगा, शाहीन शाह आफ्रिदी, सुफियान मोकीम, उस्मान खान.

कोणत्याही खेळाडूला बनवलं नाही कर्णधार : आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, अबरार अहमद, फैसल अक्रम, कामरान गुलाम, मोहम्मद रिझवान, सैम अयुब आणि शाहनवाज डहानी यांची झिम्बाब्वे दौऱ्यासाठी पाकिस्तानी वनडे संघात निवड झाली आहे. हसिबुल्लाह, हरिस रौफ, मुहम्मद इरफान खान आणि सलमान अली आगा हे चार खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या सुरुवातीपासून ते झिम्बाब्वे दौऱ्याच्या शेवटपर्यंत संघाचा भाग असतील. झिम्बाब्वे दौऱ्यासाठी कोणत्याही खेळाडूला कर्णधार बनवण्यात आलेलं नाही. मात्र पीसीबीच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे की, पीसीबी अध्यक्ष मोहसीन नक्वी रविवारी दुपारी 3.30 वाजता लाहोरमध्ये पत्रकार परिषदेला संबोधित करतील. ज्यामध्ये मर्यादित षटकांच्या नवीन कर्णधाराबद्दल माहिती दिली जाईल.

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी वनडे आणि T20 मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ :

वनडे संघ : आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, अबरार अहमद, अहमद डॅनियल, फैसल अक्रम, हरिस रौफ, हसीबुल्लाह (यष्टिरक्षक), कामरान गुलाम, मोहम्मद हसनैन, मोहम्मद रिझवान (यष्टिरक्षक), मोहम्मद इरफान खान, सईम अयुब, सलमान अली आगा, शाहनवाज डहानी आणि तय्यब ताहिर

T20 संघ : अहमद दानियाल, अराफत मिन्हास, हारिस रौफ, हसिबुल्लाह (यष्टिरक्षक), जहांदद खान, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद हसनैन, मोहम्मद इरफान खान, ओमेर बिन युसूफ, कासिम अक्रम, साहिबजादा फरहान, सलमान अली आगा, सुफियान मोकीम, तय्यब ताहिर आणि उस्मान खान

हेही वाचा :

  1. रक्तानं माखलेली जर्सी, शरीराला प्रचंड वेदना... तरीही योद्ध्यानं मानली नाही हार, जिंकला मालिकावीर पुरस्कार
  2. पाकिस्ताननं फक्त 19 चेंडूत जिंकला कसोटीत सामना, मालिकाही जिंकली; फिरकीच्या जाळ्यात अडकले इंग्रज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.