नवी दिल्ली Pm Modi Congratulate Chess Team : भारतीय महिला आणि पुरुष बुद्धीबळ संघानं ४५व्या FIDE बुद्धीबळ ऑलिम्पियाडमध्ये सुवर्ण पदक जिंकलं आहे. या दोन्ही संघानं ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्ण पदक जिंकण्याचा इतिहास रचला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय महिला आणि पुरुष बुद्धीबळ संघाला हटके शुभेच्छा दिल्या. आमच्या बुद्धीबळ संघानं हे ऐतिहासिक यश मिळवलं. हे यश भारताच्या क्रीडा जगतातील एक नवीन अध्याय आहे, या शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघाचं कौतुक केलं.
हा क्रीडा जगतातील भारताचा नवा अध्याय : भारतीय बुद्धीबळ महिला आणि पुरुष संघानं 45th FIDE Chess Olympiad स्पर्धेत मोठं यश मिळवलं आहे. भारताच्या महिला आणि पुरुष या दोन्ही संघानं सुवर्ण पदक मिळवल्यानं इतिहास रचला गेला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचं तोंड भरुन कौतुक केलं. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल माध्यमांवर भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "आमच्या बुद्धिबळ संघानं 45th FIDE Chess Olympiad जिंकल्यामुळे भारताचा ऐतिहासिक विजय झाला. बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये खुल्या आणि महिला अशा दोन्ही प्रकारात भारतानं सुवर्णपदक जिंकलं. आमच्या पुरुष आणि महिला बुद्धिबळ संघांचं अभिनंदन. भारतीय संघानं मिळवलेलं उल्लेखनीय यश हे भारताच्या क्रीडा मार्गातील एक नवीन अध्याय आहे."
45th FIDE Chess Olympiad स्पर्धेत भारताला दोन सुवर्ण : भारतीय बुद्धीबळ महिला आणि पुरुष या दोन्हा संघांना 45th FIDE Chess Olympiad स्पर्धेत सुवर्ण पदक मिळालं आहे. भारतीय संघानं 45th FIDE Chess Olympiad स्पर्धेत दोन सुवर्ण जिंकले. गुकेश डी, प्रज्ञानंदा आर, अर्जुन इरिगाईसी, विदित गुजराथी, पेंटाला हरिकृष्ण आणि श्रीनाथ नारायणन (कर्णधार) यांनी हे यश मिळवलं. गुकेश डी यानं व्लादिमीर फेडोसेव्हला पराभूत केलं. अर्जुन एरिगाईसी यानं जान सुबेल्जला तगडी मात दिली. भारतीय संघानं स्लोव्हेनियाविरुद्धच्या सामन्यात सुवर्णपदक जिंकलं. भारतीय महिला संघानंही जोरदार कामगिरी केली. भारतीय संघाच्या हरिका द्रोणवल्ली, वैशाली रमेशबाबू, दिव्या देशमुख, वंतिका अग्रवाल, तानिया सचदेव आणि अभिजित कुंटे (कर्णधार) यांनी जोरदार कामगिरी करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली.
हेही वाचा :