ETV Bharat / sports

'बडे मियाँ ते बडे मियाँ, छोटे मियाँ सुभानल्लाह...'; सर्फराजनंतर लहान भावाचा मोठा कारमाना, थेट वसीम जाफरच्या विक्रमाशी बरोबरी - सरफराज खान

Musheer Khan Double Century : सरफराजचा लहान भाऊ मुशीर खान यानं रणजी ट्रॉफी 2024 च्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मुंबईकडून खेळताना द्विशतक झळकावलं. मुशीरनं 18 चौकारांच्या मदतीनं नाबाद 203 धावा केल्या.

सर्फराजनंतर लहान भावाचा रणजीत मोठा कारमाना, थेट वसीम जाफरच्या विक्रमाशी बरोबरी

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 25, 2024, 11:33 AM IST

मुंबई Musheer Khan Double Century : 'बडे मियाँ ते बडे मियाँ, छोटे मियाँ सुभानल्लाह...' या ओळी सरफराज खान आणि त्याचा धाकटा भाऊ मुशीर खान यांच्यासाठी अगदी तंतोतंत बसतात. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यानं आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या सरफराज खाननं पहिल्याच कसोटीच्या दोन्ही डावात अर्धशतकं झळकावल्यानं तो चर्चेत आहे. त्याचा लहान भाऊ मुशीर खानानं अंडर 19 विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्यानंतर आता रणजी चषकामध्येही विक्रमी कामगिरी केलीय.

मुशीर खानचं नाबाद द्विशतक : मुशीर खाननं 2024 च्या रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात द्विशतक झळकावून सर्वांना आश्चर्यचकित केलंय. बडोद्याविरुद्धच्या सामन्यात त्यानं 18 चौकारांच्या मदतीनं नाबाद 203 धावांची शानदार खेळी केली. मुशीरच्या या द्विशतकाच्या बळावर मुंबई संघानं पहिल्या डावात 384 धावांपर्यंत मजल मारली. याआधी मुशीरनं नुकत्याच झालेल्या अंडर 19 विश्वचषक स्पर्धेत दमदार फलंदाजी केली होती. या स्पर्धेत त्यानं दोन शतकं झळकावली होती. मुशीरच्या दमदार कामगिरीमुळं भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला. मात्र, विजेतेपदाच्या लढतीत भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला.

दुसरा सर्वात तरुण फलंदाज : मुशीर खान हा रणजी ट्रॉफीमध्ये द्विशतक करणारा मुंबईचा दुसरा सर्वात तरुण फलंदाज ठरलाय. त्याचं वय 18 वर्षे 362 दिवस आहे. सर्वात कमी वयात द्विशतक झळकावण्याचा विक्रम माजी क्रिकेटपटू वसीम जाफरच्या नावावर आहे. 1996-97 रणजी ट्रॉफीमध्ये त्यानं 18 वर्षे आणि 262 दिवसांचं वय असताना सौराष्ट्राविरुद्ध द्विशतकी खेळी केली होती.

सामन्यावर मुंबईची पकड मजबूत : बडोद्याविरुद्धच्या उपांत्यपुर्व सामन्यात मुशीर खानच्या द्विशतकाच्या बळावर मुंबईनं 384 धावांपर्यंत मजल मारली. मुशीर खान वगळता मुंबईच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. यानंतर प्रत्युत्तरात बडोदा संघाच्या आज सामन्याच्या तिसऱ्या दिवशी 35 षटकांत 2 बाद 127 धावा झाल्या असून बडोद्याचा संघ अद्यापही 257 धावांनी पिछाडीवर आहे.

सरफराजची पहिल्याच कसोटीत विक्रमी खेळी : मुशीरचा मोठा भाऊ सरफराज खाननं इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. या कसोटीच्या दोन्ही डावांत सरफराजनं अर्धशतकं झळकावली. यासह त्यानं महान फलंदाज सुनील गावसकरांच्या एका विक्रमाची बरोबरी केली. त्या सामन्यात सरफराजनं पहिल्या डावात 62 आणि दुसऱ्या डावात नाबाद 68 धावा केल्या होत्या. भारतीय संघानं तिसरी कसोटी 434 धावांच्या मोठ्या फरकानं जिंकत मालिकेत 2-1 नं आघाडी घेतली होती.

हेही वाचा :

  1. "हिंमत नही छोडना, बस्स !" आनंद महिंद्रा यांनी सरफराज खानच्या वडिलांना ऑफर केली थार
  2. सरफराजनं केलं संधीचं 'सोनं'; कसोटी पदार्पणातच झळकावलं आक्रमक अर्धशतक
  3. सरफराज खानला अखेर कसोटी मालिकेत संधी, रवींद्र जडेजा अन् के.एल राहुलला दुखापतीमुळं विश्रांती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.