मुंबई Amol Kale Passed Away : मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचं निधन झालंय. अमोल काळे यांचं सोमवारी हृदयविकाराच्या झटक्यानं न्युयॉर्क इथं निधन झालंय. यामुळं क्रिकेटविश्वात शोककळा पसरलीय.
भारत पाकिस्तान सामना पाहायला गेले होते न्युयॉर्कला : अमोल काळे हे रविवारी रात्री एमसीएच्या पदाधिकाऱ्यांसह न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम इथं भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहण्यासाठी गेले होते. त्यानंतर आता त्यांच्या निधनाची बातमी समोर आलीय. एमसीएचे सचिव अजिंक्य नाईक आणि सर्वोच्च परिषदेचे सदस्य सूरज सामत यांच्यासह अमोल काळे यांनी रविवारी नासाऊ काउंटी स्टेडियममधून टी-20 विश्वचषकातील भारत पाकिस्तान सामना पाहिला होता. त्याचा फोटो देखील त्यांनी सोशल मीडियावर टाकला होता.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय : अमोल काळे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जात होते. ऑक्टोबर 2022 मध्ये 1983 च्या क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य संदीप पाटील यांचा निवडणुकीत पराभव केल्यानंतर अमोल काळे यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. आगामी मोसमापासून मुंबईच्या वरिष्ठ खेळाडूंची मॅच फी दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये त्यांचं मोठं योगदान राहिलंय. त्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शेलार आणि फडणवीस यांच्याशिवाय अमोल काळेंना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचाही पाठिंबा मिळाला. शरद पवार आणि आशिष शेलार हे देखील एमसीएचे अध्यक्ष राहिले आहेत.
हेही वाचा :