नवी दिल्ली IND vs PAK Bowl Out : ICC T20 विश्वचषक क्रिकेटचा पहिला हंगाम 2007 मध्ये खेळला गेला. ज्यामध्ये भारतीय क्रिकेट संघ एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली विजेता ठरला. धोनीच्या नेतृत्वाखाली 'मेन इन ब्लू'नं अंतिम फेरीत पाकिस्तानचा पराभव करुन विजेतेपद पटकावलं. पण त्याआधी भारतानं पाकिस्तानला ग्रुप स्टेजमध्ये बॉल आऊटच्या माध्यमातून दणदणीत पराभव केला होता. या दोघांमधील गट टप्प्यातील ऐतिहासिक सामना या दिवशी म्हणजेच 14 सप्टेंबर 2007 रोजी खेळला गेला होता.
काय झालं होतं सामन्यात? : वास्तविक हा सामना बरोबरीत सुटला, त्यानंतर बॉल आऊटद्वारे सामन्याचा निकाल लागला. भारतानं बॉल आऊटमध्ये पाकिस्तानचा शानदार पराभव केला होता. बॉल आऊटमध्ये, वीरेंद्र सेहवागनं भारतासाठी प्रथम गोलंदाजी केली. त्यानंतर पाकिस्तानकडून पहिली संधी मिळालेल्या यासिर अराफतची ती संधी हुकली. यानंतर पुन्हा भारताची पाळी येते आणि यावेळी चेंडू हरभजन सिंगच्या हातात आहे. भज्जी अगदी सहज स्टंपला मारतो. याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानकडून वेगवान गोलंदाज उमर गुल येतो आणि त्यालाही स्टंपला मारता येत नाही. भारताकडून रॉबिन उथप्पा तिसऱ्या क्रमांकावर आला आणि त्यानं मैदानावर विकेट्स उडवून भारताच्या खात्यात एक गुण जोडला. शाहिद आफ्रिदी तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानसाठी शेवटची आशा म्हणून येतो, पण तोही अपयशी ठरला. अशा प्रकारे भारतीय संघानं पाकिस्तानचा बॉल आऊटमध्ये पराभव केला.
✅ @virendersehwag
— ICC (@ICC) September 14, 2018
❌ @YasArafat12
✅ @harbhajan_singh
❌ @mdk_gul
✅ @robbieuthappa
❌ @SAfridiOfficial#OnThisDay in 2007 India v Pakistan at #WT20 finished in a tie… and India won the bowl-out! pic.twitter.com/sN2dZMyLN2
141 धावांवर सामना बरोबरीत सुटला : प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघानं 20 षटकांत 9 गडी गमावून 141 धावा केल्या. रॉबिन उथप्पानं संघासाठी 50 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. प्रत्युत्तरात पाकिस्ताननं 20 षटकांत 7 विकेट गमावत केवळ 141 धावा केल्या. पाकिस्तानकडून मिसबाह-उल-हकनं सर्वाधिक 53 धावा केल्या होत्या.
THE MS DHONI CAPTAINCY ERA STARTED ON THIS DAY IN 2007. 🇮🇳
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 14, 2024
- India won in the famous 'Bowl Out' against Pakistan, the GOAT captain arrived in style. 🐐pic.twitter.com/zO4ljBGqZ2
धोनी युगाची झाली होती सुरुवात : याच सामन्यापासून भारतीय क्रिकेटमध्ये धोनी युगाची सुरुवात झाली. यानंतर भारतानं महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक, 2013 मध्ये ICC चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धाही जिंकली होती. ICC च्या तीनही टॉफ्रीज जिंकणारा धोनी क्रिकेटच्या इतिहासातील पहिला आणि एकमेव कर्णधार आहे.
हेही वाचा :