T20 World Cup 2024 : आयसीसी टी-20 विश्वचषकाची उलटी गिनती सुरू झालीय. जगभरातील क्रिकेट चाहते या रोमांचकारी स्पर्धेची आतुरतेनं वाट पाहत आहेत. या स्पर्धेत विविध देशांतील दिग्गज खेळाडूंसोबत अनेक युवा खेळाडूही मैदानात उतरणार आहेत. या खेळाडूंना अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये आपली प्रतिभा दाखवून स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. जाणून घेऊया पहिल्यांदाच टी-20 विश्वचषक खेळणाऱ्या युवा खेळाडूंबद्दल.
यशस्वी जैस्वाल (भारत) : भारतीय क्रिकेट संघाचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल पहिला टी-20 विश्वचषक खेळणार आहे. तो कर्णधार रोहित शर्मासोबत संघासाठी डावाची सुरुवात करताना दिसू शकतो. यशस्वीनं गेल्या काही वर्षांत चांगली फलंदाजी करत संघात स्थान मिळवलय. आता तो 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये आपली जादू दाखवताना दिसणार आहे. जैस्वालनं आतापर्यंत भारतासाठी 17 सामन्यांच्या 16 डावांमध्ये 1 शतक आणि 4 अर्धशतकांसह 502 धावा केल्या आहेत.
हॅरी ब्रूक (इंग्लंड) : इंग्लंड क्रिकेट संघाचा सर्वोत्कृष्ट फलंदाज हॅरी ब्रूक 2024 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत संघासाठी महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो. हा 25 वर्षीय फलंदाज आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. ब्रूकनं इंग्लंडसाठी 30 सामन्यांच्या 27 डावांमध्ये 2 अर्धशतकांच्या मदतीनं 545 धावा केल्या आहेत.
शिवम दुबे (भारत) : शिवम दुबे हा देखील अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या या टी-20 स्पर्धेसाठी भारतीय संघाचा एक भाग आहे. या युवा अष्टपैलू खेळाडूचा हा पहिलाच विश्वचषक असेल. त्याने आतापर्यंत भारतासाठी एक एकदिवसीय आणि 21 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
तौहीद हृदय (बांगलादेश) : बांगलादेश क्रिकेट संघाचा युवा डावखुरा फलंदाज तौहीद हृदय या टी-20 विश्वचषकात आपली छाप पाडेल अशी अपेक्षा आहे. बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर त्याचा टी-20 विश्वचषक संघात समावेश करण्यात आलाय. आता या मेगा टूर्नामेंटमध्ये त्याला संघासाठी अप्रतिम कामगिरी करण्याची संधी मिळणार आहे. त्यानं बांगलादेशसाठी 21 टी-20 सामन्यांच्या 19 डावांमध्ये 2 अर्धशतकांसह 454 धावा केल्या आहेत.
कंवरपाल तथगुर (कॅनडा) : कॅनडाच्या क्रिकेट संघाचा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज कंवरपाल तथगुर हा त्याच्या वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो. 2024 च्या या टी-20 विश्वचषकात तो आपल्या संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.
विल जॅक (इंग्लंड) : इंग्लंडचा धोकादायक अष्टपैलू खेळाडू विल जॅक या टी-20 विश्वचषकात बॅट आणि बॉलने कहर करू शकतो. या 25 वर्षीय खेळाडूनं आतापर्यंत इंग्लंडसाठी 12 टी-20 सामन्यांच्या 12 डावात 218 धावा केल्या आहेत. याशिवाय या ऑफस्पिनरच्या नावावर 1 विकेटही आहे.
संजू सॅमसन (भारत) : विश्वचषक 2024 साठी भारतीय संघात संजू सॅमसनची यष्टिरक्षक फलंदाज म्हणून निवड झाली करण्यात आलीय. संजू पहिल्यांदाच टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियासाठी मैदानात उतरणार आहे.
रचिन रवींद्र (न्यूझीलंड) : न्यूझीलंड क्रिकेट संघाचा डावखुरा स्टार फलंदाज रचिन रविंदनं 20 सामन्यात 1 अर्धशतकाच्या मदतीनं एकूण 214 धावा केल्या आहेत. तर 11 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.
ट्रिस्टन स्टब्स (दक्षिण आफ्रिका) : 23 वर्षीय दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज ट्रिस्टन स्टब्सनं संघासाठी 17 सामन्यात 1 अर्धशतकासह 239 धावा केल्या आहेत. आता तो या विश्वचषकात संघासाठी धोकादायक ठरू शकतो.
दीपेंद्र सिंग ऐरी (नेपाळ) : नेपाळच्या या क्रिकेटपटूने नुकतेच 6 चेंडूत 6 षटकार मारून खळबळ उडवून दिलीय. आता तो 2024 च्या टी-20 विश्वचषकात संघासाठी धोकादायक ठरू शकतो. त्याने 64 टी-20 सामन्यांमध्ये 1 शतक आणि 9 अर्धशतकांसह 1626 धावा केल्या आहेत.
हेही वाचा
केकेआरनं ट्रॉफी जिंकल्यावर बॉलीवूडमध्ये जल्लोष, करण जोहरसह 'या' स्टार्सनी केलं अभिनंदन - IPL 2024
केकेआरनं आयपीएलची ट्रॉफी उचलताच 'मिस्टर आणि मिसेस माही'चा स्टेडियमवर जल्लोष - IPL 2024