ETV Bharat / sports

एका युगाचा अंत! इंग्लंडच्या महान वेगवान गोलंदाजाची रिटायरमेंट घोषणा; सचिनचा 'हा' विक्रम राहणार अबाधित - James Anderson - JAMES ANDERSON

James Anderson Announces Retirement : इंग्लंडचा महान वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसननं क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलीय. 41 वर्षीय अँडरसननं 2003 मध्ये लॉर्ड्सवर कसोटी पदार्पण केलं होतं. त्यानं आतापर्यंत 187 कसोटी सामने खेळले आहेत.

जेम्स अँडरसन
जेम्स अँडरसन (Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 11, 2024, 6:41 PM IST

लंडन James Anderson Announces Retirement : इंग्लंडचा महान वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसननं क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलीय. अँडरसन आपला शेवटचा कसोटी सामना या वर्षी जुलै महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध क्रिकेटच्या मक्का, लॉर्ड्स इथं खेळणार आहे. हा कसोटी सामना 10 ते 14 जुलै दरम्यान होणार आहे. 41 वर्षीय अँडरसननं 2003 मध्ये लॉर्ड्सवर कसोटी पदार्पण केलं होतं. त्यानं 187 कसोटी सामन्यात 700 बळी घेतले आहेत. अँडरसन हा 700 कसोटी बळींचा पल्ला गाठणारा पहिला वेगवान गोलंदाज आहे. भारताविरुद्धच्या धर्मशाला कसोटी सामन्यात कुलदीप यादवला बाद करुन अँडरसननं यावर्षी 700 बळी पूर्ण केलं.

निवृत्तीबाबत काय म्हणाला अँडरसन : निवृत्तीबाबत बोलताना अँडरसन म्हणाला, "लॉर्ड्सवर या उन्हाळ्यात होणारी पहिली कसोटी ही माझी शेवटची कसोटी असेल. लहानपणापासून मला आवडलेल्या खेळात माझ्या देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी. ही 20 वर्षे माझ्यासाठी अविश्वसनीय आहेत. इंग्लंडकडून खेळताना मला खूप आठवण येईल. पण मला माहित आहे की, या खेळापासून दूर जाण्याची आणि इतरांना संधी देण्याची हीच योग्य वेळ आहे. माझी जशी स्वप्नं सत्यात उतरली तशी त्यांची स्वप्नं साकार करा कारण यापेक्षा मोठी भावना नाही. डॅनिएला, लोला रुबी आणि माझ्या पालकांच्या प्रेम आणि पाठिंब्याशिवाय मी हे करु शकलो नसतो. त्यांचे अनेक आभार तसंच त्या खेळाडूंचे आणि प्रशिक्षकांचे आभार ज्यांनी हे जगातील सर्वोत्तम काम केलं. नवीन आव्हानांसाठी मी उत्सुक आहे. वर्षानुवर्षे मला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाचे आभार."

अँडरसनची क्रिकेट कारकीर्द कशी : जेम्स अँडरसननं 2003 मध्ये लॉर्ड्सवर झिम्बाब्वेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तेव्हापासून तो 187 सामने खेळला आहे. फक्त 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकरनं अँडरसनपेक्षा जास्त कसोटी सामने खेळले आहेत. सचिनच्या नावावर 200 कसोटी सामने आहेत. जेम्स अँडरसननं 194 एकदिवसीय सामने खेळले असून त्यात त्याच्या नावावर 269 विकेट्स आहेत. तसंच त्याच्या नावावर 19 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 18 विकेट आहेत.

सर्वाधिक कसोटी विकेट्स :

  • मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका 1992-2010) : 133 कसोटी, 800 विकेट्स
  • शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया 1992-2007) : 145 कसोटी, 708 विकेट्स
  • जेम्स अँडरसन (इंग्लंड 2003-2024) : 187* कसोटी, 700* विकेट्स
  • अनिल कुंबळे (भारत 1990-2008) : 132 कसोटी, 619 विकेट्स
  • स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड 2007-2023) : 167 कसोटी, 604 विकेट्स
  • ग्लेन मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया 1993-2007) : 124 कसोटी, 563 विकेट्स

हेही वाचा :

  1. दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का; कर्णधार ऋषभ पंत एका सामन्यासाठी निलंबित, काय आहे नेमकं प्रकरण? - Rishabh Pant
  2. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेट सामन्यात संपुर्ण संघ अवघ्या 12 धावांत गारद; सात फलंदाज तर शुन्यावर बाद - T20 Record

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.