ETV Bharat / sports

न्यूझीलंडविरुद्ध मानहानिकारक पराभवानंतर WTC पॉइंट टेबलमध्ये भारताचं मोठं नुकसान; अव्वल स्थानावरुन घसरण - WTC POINT TABLE UPDATE

भारताला न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात 25 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. यामुळं भारतीय संघानं मालिका 3-0 नं गमावली आणि WTC गुणतालिकेतही त्यांना मोठं नुकसान झालं आहे.

WTC Point Table Update
भारतीय संघ (IANS)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Nov 3, 2024, 3:10 PM IST

मुंबई WTC Point Table Update : भारत आणि न्यूझीलंड क्रिकेट संघ यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली गेली. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यातही भारताला पराभवाचा सामना करावा लागला. बऱ्याच दिवसांनी भारतीय संघाला भारतात कोणत्याही संघानं क्लीन स्वीप केला. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाला 25 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारतीय संघाला या पराभवासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतही नुकसानाला सामोरं जावं लागलं आहे. भारताय संघाला अव्वल स्थान गमवावं लागलं आहे. या मालिकेत भारतीय संघ तीन सामने हरला आहे. त्यामुळं भारतीय संघाला आता फायनलमध्ये पोहोचण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

भारतीय संघाची दुसऱ्या स्थानावर घसरण : न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारतीय संघाची आता पहिल्या स्थानावरुन दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. सामना सुरु होण्यापूर्वी भारतीय संघ 62.82 च्या पीसीटी पॉइंट्ससह पहिल्या स्थानावर होता. परंतु आता ते 58.33 च्या पीसीटी पॉइंटसह दुसऱ्या स्थानावर घसरले आहेत. तर ऑस्ट्रेलियन संघ 62.30 पीसीटी गुणांसह पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.

न्यूझीलंडला झाला फायदा : या मालिकेनंतर किवी संघाला खूप फायदा झाला आहे. मालिकेतील तिसऱ्या सामन्यापूर्वी त्यांचा संघ पाचव्या स्थानावर होता. जिथं त्याचा पीसीटी स्कोअर 50 होता, पण या सामन्यातील विजयामुळं त्यांचा स्कोर 54.55 झाला आणि त्यांचा संघ आता चौथ्या स्थानावर आला आहे. तर दक्षिण आफ्रिकेची पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे. या एका सामन्यात संपूर्ण पॉइंट टेबल वर-खाली झालं आहे.

कसा झाला सामना? : दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर त्यांनी पहिल्या डावात 235 धावा केल्या. तर प्रत्युत्तरात भारतीय संघानं 263 धावा केल्या आणि 28 धावांची आघाडी घेतली. यानंतर कीवी संघ दुसऱ्या डावात 174 धावांवर ऑलआऊट झाला आणि भारतीय संघाला विजयासाठी 147 धावांचं लक्ष्य मिळालं. ज्याचा भारतीय संघ पाठलाग करु शकला नाही आणि 121 धावांवर ऑलआऊट झाला.

हेही वाचा :

  1. 'मुंबई'कर एजाज पटेलसमोर 'रोहित'सेनेची शरणागती; 92 वर्षाच्या भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात लाजिरवाणा दिवस
  2. 'साहेबां'चा कसोटीत पराभव करताच पाकिस्तानचा कॉन्फिडन्स वाढला; सामन्याच्या 24 तासाआधीच जाहीर केली प्लेइंग 11

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.