मुंबई Full Cricket Schedule in November : भारत आणि न्यूझीलंड क्रिकेट संघ यांच्यातील 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना सध्या मुंबईच्या वानखेडे मैदानावर सुरु आहे. यानंतर भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. तसंच त्यानंतर भारतीय संघ या वर्षातील सर्वात मोठ्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. नोव्हेंबर महिन्यात भारताव्यतिरिक्त इतरही अनेक संघ विविध क्रिकेट मालिका खेळणार आहेत. त्यामुळं क्रिकेट चाहत्यांसाठी नोव्हेंबर महिना मोठी पर्वणी ठरणार आहे.
Proteas out for #T20WorldCup revenge 👀
— ICC (@ICC) November 1, 2024
South Africa have named a strong squad for this month's four-match T20I series against India 💪
More 👉 https://t.co/dD1PzgsYNV pic.twitter.com/xpcmYOxGgO
नोव्हेंबर महिन्यातील सर्व आंतरराष्ट्रीय मालिका :
न्यूझीलंडचा भारत दौरा 2024
- तिसरा कसोटी सामना: भारत विरुद्ध न्यूझीलंड, मुंबई (1 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबर)
पाकिस्तानचा ऑस्ट्रेलिया दौरा 2024
- 03 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर (3 सामन्यांची वनडे आणि 3 T20I मालिका)
अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश UAE मध्ये 2024
- 06 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर (3 सामन्यांची वनडे मालिका)
भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा 2024
- 07 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर (4 सामन्यांची T20I मालिका)
ICYMI, England announced their squad that will travel to New Zealand for a three-match #WTC25 series 👊
— ICC (@ICC) October 30, 2024
➡ https://t.co/Ab8hjoWJxA pic.twitter.com/DARTeDrGZi
न्यूझीलंडचा श्रीलंका दौरा 2024
- 09 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर (2 सामन्यांची T20I मालिका आणि 3 सामन्यांची वनडे मालिका)
वेस्ट इंडिजचा बांगलादेश दौरा, 2024
- 14 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर (2 कसोटी, 3 वनडे आणि 3 T20I मालिका)
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा 2024-25
- 22 नोव्हेंबर ते 06 जानेवारी (5 सामन्यांची कसोटी मालिका)
इंग्लंडचा न्यूझीलंड दौरा 2024
- 23 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर (3 सामन्यांची कसोटी मालिका)
झिम्बाब्वेचा पाकिस्तान दौरा, 2024
- 24 नोव्हेंबर ते 05 डिसेंबर (3 सामन्यांची वनडेआणि T20I मालिका)
श्रीलंका दक्षिण आफ्रिका दौरा 2024
- 25 नोव्हेंबर ते 07 डिसेंबर (2 सामन्यांची कसोटी मालिका)
Australia have named a 13-member squad for the three-match T20I home series against Pakistan, beginning 14 November.
— ICC (@ICC) October 28, 2024
Details ➡️ https://t.co/AJMWI49KO8 pic.twitter.com/RjJtcW5oHW
नोव्हेंबर महिन्यातील सर्व भारतीय सामन्यांचं संपूर्ण वेळापत्रक :
भारत vs दक्षिण आफ्रिका 2024 T20I मालिका वेळापत्रक :
- 8 नोव्हेंबर, पहिला T20I सामना, डर्बन
- 10 नोव्हेंबर, दुसरा T20I सामना, सेंट जॉर्ज पार्क
- 13 नोव्हेंबर, तिसरा T20I सामना, सेंच्युरियन
- 15 नोव्हेंबर, चौथा T20I सामना, जोहान्सबर्ग
भारत vs दक्षिण आफ्रिका T20I मालिकेसाठी दोन्ही संघ :
भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, टिळक वर्मा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार वैभव. , आवेश खान आणि यश दयाल.
दक्षिण आफ्रिक : एडन मार्कराम, ओटनील बार्टमन, ट्रिस्टन स्टब्स, गेराल्ड कोएत्झी, डोनावन फरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅनसेन, हेनरिक क्लासेन, पॅट्रिक क्रुगर, केशव महाराज, डेव्हिड मिलर, मिलाली माँगवान, न्काब पीटर, रायन सिमेलेटन आणि लुईस रिक्लेटन. सिपमला (तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यांसाठी).
भारतचा दौरा ऑस्ट्रेलिया : भारतीय संघ 22 नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात करणार आहे. पहिला कसोटी सामना पर्थ स्टेडियमवर होणार आहे. त्यानंतर डिसेंबर आणि जानेवारीमध्ये उर्वरित 4 कसोटी सामने खेळवले जातील. मालिकेतील शेवटचा सामना 3 जानेवारी ते 7 जानेवारी दरम्यान खेळवला जाईल.
हेही वाचा :