हरारे ZIM vs IND 4th T20I : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पाच सामन्यांच्या टी 20 क्रिकेट मालिकेतील चौथा सामना आज हरारे स्पोर्ट्स क्लबवर झाला. या सामन्यात भारतानं 10 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. भारतासमोर सामना जिंकण्यासाठी 153 धावांचं लक्ष्य होतं, ते त्यांनी 15.2 षटकांतच पूर्ण केलं. या विजयासह भारतीय संघानं मालिकेत 3-1 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. दरम्यान मालिकेतील पाचवा आणि शेवटचा टी 20 सामना रविवार 14 जुलै रोजी याच मैदानावर होणार आहे.
A sparkling 🔟-wicket win in 4th T20I ✅
— BCCI (@BCCI) July 13, 2024
An unbeaten opening partnership between Captain Shubman Gill (58*) & Yashasvi Jaiswal (93*) seals the series for #TeamIndia with one match to go!
Scorecard ▶️ https://t.co/AaZlvFY7x7#ZIMvIND | @ShubmanGill | @ybj_19 pic.twitter.com/xJrBXlXLwM
10 गड्यांनी दणदणीत विजय : धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघासाठी सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांनी शानदार फलंदाजी करत यजमान संघाला एकही विकेट दिली नाही. यशस्वीनं 53 चेंडूंत 13 चौकार आणि दोन षटकारांसह 93 धावा केल्या. तर कर्णधार गिलनं 39 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 58 धावांची खेळी केली. दोन्ही खेळाडूंनी 156 धावांची नाबाद भागीदारी करत संघाला एकहाती विजय मिळवून दिला.
कर्णधार रझाची एकाकी झुंज : नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना यजमान झिम्बाब्वेनं सात गडी गमावून 152 धावा केल्या. झिम्बाब्वेसाठी कर्णधार सिकंदर रझानं सर्वाधिक 28 चेंडूत 46 धावांची खेळी खेळली, ज्यात दोन चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. सलामीवीर तदिवनाशे मारुमणीनं 32 आणि वेस्ली माधवेरेनं 25 धावांचं योगदान दिले. माधेवर-मारुमणी यांनी पहिल्या विकेटसाठी 52 चेंडूत 63 धावांची भागीदारी केली. मात्र त्यानंतर ठराविक अंतरानं झिम्बाब्वेचे फलंदाज बाद होत गेले. भारताकडून खलील अहमदनं सर्वाधिक दोन बळी घेतले. तर अभिषेक शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे आणि तुषार देशपांडे यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन :
- भारत : यशस्वी जैस्वाल, अभिषेक शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), रुतुराज गायकवाड, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, तुषार देशपांडे, खलील अहमद.
- झिम्बाब्वे : वेस्ली मधवेरे, तदिवानाशे मारुमणी, ब्रायन बेनेट, सिकंदर रझा (कर्णधार), डिऑन मायर्स, जोनाथन कॅम्पबेल, क्लाइव्ह मदांडे (यष्टीरक्षक), फराझ अक्रम, रिचर्ड नगारवा, ब्लेसिंग मुझाराबानी, तेंडई चतारा
भारतीय संघाचा झिम्बाब्वे दौरा (जुलै 2024) :
- 6 जुलै- पहिल्या टी 20 मध्ये भारताचा 13 धावांनी पराभव
- 7 जुलै- दुसरा टी 20, भारतानं 100 धावांनी जिंकला
- 10 जुलै- तिसरा टी 20, भारतानं 23 धावांनी जिंकला
- 13 जुलै- चौथा टी 20, हरारे, भारत 10 गड्यांनी विजयी
- 14 जुलै - पाचवा टी 20, हरारे
हेही वाचा :