अहमदाबाद INDW vs NZW 2nd ODI Live Streaming : भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज म्हणजेच 27 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. उभय संघांमधील हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दुपारी दीड वाजल्यापासून खेळवला जाईल. या मालिकेत भारतीय संघाची कमान हरमनप्रीत कौरच्या खांद्यावर आहे. दरम्यान, न्यूझीलंडचं नेतृत्व सोफी डिव्हाईन करत आहे.
A winning start to the ODI series in Ahmedabad 🤩#TeamIndia complete a 59 runs victory over New Zealand in the 1st #INDvNZ ODI and take a 1-0 lead 👏👏
— BCCI Women (@BCCIWomen) October 24, 2024
Scorecard - https://t.co/VGGT7lSS13@IDFCFIRSTBank pic.twitter.com/QUNOirPjbh
भारताची मालिकेत 1-0 अशी आघाडी : भारतीय महिला संघ तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 नं आघाडीवर आहे. पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघानं न्यूझीलंडचा 59 धावांनी पराभव केला होता. पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघ 44.3 षटकांत 227 धावांवर बाद झाली. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ 40.4 षटकांत 168 धावांवर गारद झाला. अशा स्थितीत दुसरा वनडे जिंकून भारतीय संघ मालिकेवर कब्जा करण्याचे ध्येय ठेवणार आहे. दुसरीकडे, न्यूझीलंडला दुसरा वनडे सामना जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधायची आहे.
दोन्ही संघाचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : भारत आणि न्यूझीलंड महिला क्रिकेट संघ आतापर्यंत वनडे सामन्यांमध्ये एकूण 55 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यात न्यूझीलंडचा वरचष्मा दिसत आहे. न्यूझीलंडनं 33 सामने जिंकले आहेत. तर भारतानं केवळ 21 सामने जिंकले आहेत. याशिवाय एक सामना अनिर्णित राहिला.
Evening training at Narendra Modi Stadium! #INDvNZ #CricketNation 📷 = NZC pic.twitter.com/IdM7qi9R8r
— WHITE FERNS (@WHITE_FERNS) October 26, 2024
खेळपट्टी कशी असेल : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा वनडे सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी गोलंदाजांपेक्षा फलंदाजांसाठी अधिक योग्य आहे. फलंदाज मोठ्या धावा बोर्डवर ठेवू शकतात आणि दव दुसऱ्या हाफमध्ये गोष्टी सुलभ करु शकतात. नाणेफेक जिंकणारा संघ इथं लक्ष्याचा पाठलाग करण्याचा निर्णय घेईल. या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना अधिक फायदा होतो. या खेळपट्टीवर 32 एकदिवसीय सामन्यांमध्ये पहिल्या डावात सरासरी 243 धावा आहेत. खेळ जसजसा पुढं जाईल तसतसे फिरकीपटू खेळात येतील अशी अपेक्षा आहे, परंतु वेगवान गोलंदाजांना नवीन चेंडू आणि वेगातील फरकांचा प्रभावीपणे उपयोग करावा लागेल.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा वनडे सामना कधी खेळला जाईल?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा वनडे सामना रविवार, 27 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी 1:30 वाजता खेळवला जाईल.
भारत आणि न्यूझीलंड दुसऱ्या वनडे सामन्याचं थेट प्रक्षेपण आणि लाईव्ह स्ट्रीमिंग कुठं पाहता येईल?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्याचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 चॅनेलवर उपलब्ध असेल. तर जिओ सिनेमावर लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल. अशा परिस्थितीत चाहत्यांना सामन्याचा आनंद घेता येईल.
सामन्यासाठी दोन्ही संघ :
भारतीय महिला संघ : स्मृती मानधना, शफाली वर्मा, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, डेलन हेमलता, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया (यष्टिरक्षक), श्रेयंका पाटील, राधा यादव, रेणुका ठाकूर सिंग, अरुंधती रेड्डी, तेजल हसबनीस, सायली सातघरे. सायमा ठाकोर, उमा छेत्री, प्रिया मिश्रा
न्यूझीलंड महिला संघ : सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, अमेलिया केर, सोफी डिव्हाईन (कर्णधार), ब्रुक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गेज (यष्टिरक्षक), लॉरेन डाउन, पॉली इंग्लिस, फ्रॅन जोनास, ली ताहुहू, हन्ना रो, जेस केर, मॉली पेनफोल्ड, ईडन कार्सन
हेही वाचा :