India vs Zimbabwe 1st T20 : भारतीय क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. आजपासून या मालिकेला सुरुवात होणार असून भारतीय वेळेनुसार सायंकाळी 4.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. हरारे स्पोर्ट्स क्लब इथं हा सामना रंगणार आहे. भारताचा युवा संघ या दौऱ्यासाठी पाठवण्यात आला आहे. शुभमन गिलकडं भारतीय संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. गिल पहिल्यांदाच टीम इंडियाची कमान सांभाळताना दिसणार आहे. तर झिम्बाब्वे संघाचं नेतृत्व सिकंदर राजा करणार आहे. टी-20 च्या जागतिक क्रमवारीत भारतीय संघ अव्वल स्थानावर आहे. टी-20 विश्वचषक पटकवल्यानंतर प्रथमच भारतीय संघ झिम्बाब्वेविरुद्ध खेळण्यास उतरणार आहे.
📍 Harare
— BCCI (@BCCI) July 3, 2024
Preps Begin 👌 👌#TeamIndia hit the ground running for the #ZIMvIND T20Is 👍 👍 pic.twitter.com/9nce3rMQEa
कोणाचं पारंड जड : टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारत आणि झिम्बाब्वेचे संघ आतापर्यंत 8 वेळा आमनेसामने आले आहेत. या काळात झिम्बाब्वेविरुद्ध भारतीय संघाचा वरचष्मा राहिला आहे. भारतानं आतापर्यंत विरोधी संघाविरुद्ध 6 सामन्यात यश मिळवलं आहे. तर विरोधी संघानं फक्त 2 सामने जिंकले आहेत. मात्र गेल्या 5 टी-20 झिम्बाब्वेनं भारताला कडवी टक्कर दिली आहे. झिम्बाब्वेनं भारताला दोनदा पराभूत केलं आहे, तर भारतीय संघानं तीन वेळा विजय मिळवला आहे.
Where were they? 🤔
— BCCI (@BCCI) July 5, 2024
What were they doing❓
How much #TeamIndia's #T20WorldCup 2024 triumph 🏆 means to them?
Indian Cricket Team in Zimbabwe is like the All Of Us! 😊 #Champions
WATCH 🎥🔽 - By @ameyatilak pic.twitter.com/J2VDtNwSPk
झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-20 मालिकेचे वेळापत्रक
- पहिला सामना- 6 जुलै
- दुसरा सामना- 7 जुलै
- तिसरा सामना- 10 जुलै
- चौथा सामना- 13 जुलै
- पाचवा सामना- 14 जुलै
— BCCI (@BCCI) July 3, 2024
झिम्बाब्वेमध्ये भारतीय संघाचा रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. भारतानं अद्याप एकही टी-20 मालिका गमावलेली नाही. 2015 साली उभय संघांमध्ये खेळलेली दोन सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली होती. तर 2010 मध्ये भारतानं झिम्बाब्वेमध्ये 2 सामन्यांच्या मालिकेत यजमानांचा पराभव केला होता. सध्याच्या मालिकेतील पाचही टी-20 सामने खेळवले जातील.
Travel Day ✅
— BCCI (@BCCI) July 3, 2024
The Journey Begins... 👌
Excitement, happiness & more, ft. #TeamIndia newcomers 😎#ZIMvIND | @ParagRiyan | @IamAbhiSharma4 pic.twitter.com/YdhK5jldtW
दोन्ही संघ
- झिम्बाब्वेचा संघ : सिकंदर रजा (कर्णधार), अकरम फराज, बॅनेट ब्रायन, कॅम्पबेल जोनाथन, तेंदई चतारा, ल्यूक जोंगवे, इनोसेंट काइया, क्लाइव मडांडे, वेस्ली मधेविरे, तदिवनाशे मारुमानी, वेलिंग्टन मसाकाद्जा, ब्रँडन मावुता, ब्लेसिंग मुजरबानी, डायोन मायर्स, अंतुम नकवी, रिचर्ड नगारवा, मिल्टन शुम्बा
- भारताचा संघ : शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जायस्वाल, ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकु सिंह, संजू सॅमसन, ध्रुव जुरेल, शिवम दुबे, रियान पराग, वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे.
हेही वाचा
- "बरं झालं बॉल हातात बसला नाहीतर मी...", 'मुंबईच्या राजा'नं विधानसभा गाजवली! पहा व्हिडिओ - Rohit Sharma Marathi Speech
- नाशिकच्या सर्वेश कुशारेचा भीम पराक्रम; मक्याच्या भुशावरून थेट पॅरिस ऑलम्पिकमध्ये उडी - Paris Olympics 2024
- रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला खास सत्कार - felicitated by Chief Minister