नवी दिल्ली Champions Trophy 2025 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सूत्रांनी मंगळवारी सांगितलं की, भारतीय संघ पुढील वर्षी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाणार नाही. मात्र स्थळ स्थलांतरित केलं जाऊ शकतं किंवा हायब्रीड मॉडेलचा मार्ग देखील निवडला जाऊ शकतो, असंही सूत्रांनी सांगितलंय.
पाकिस्तानचा दौरा अशक्य : पुढील वर्षी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतानं आपला संघ पाकिस्तानला पाठवला तर पीसीबी त्यांच्यासोबत द्विपक्षीय मालिका खेळण्यास तयार आहे, असं पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी म्हटलंय. मात्र, बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितलं की, 'द्विपक्षीय मालिका विसरा. भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानचा दौराही करू शकत नसल्याचं सूत्रांनी सांगितलं.
आशिया चषकाचे बहुतेक सामने श्रीलंकेत : सूत्रांनी सांगितलं की, 'भारतीय बोर्डाला या प्रवासासाठी सरकारची परवानगी लागेल, सध्या पाकिस्तानसोबत आमचे संबंधही चांगले नाहीत. अशा परिस्थितीत ते जवळजवळ अशक्य आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात शेवटची द्विपक्षीय मर्यादित षटकांची मालिका 2012-13 मध्ये खेळली गेली होती. जेव्हा पाकिस्ताननं भारताचा दौरा केला होता. गेल्या वर्षी, भारतानं पाकिस्तानमध्ये आशिया चषक खेळण्यासाठी आपला संघ पाठविण्यास नकार दिला होता. परिणामी शेवटी आशियाई क्रिकेट परिषदेला (ACC) या स्पर्धेसाठी एक संकरित मॉडेल स्वीकारावं लागलं होतं. यात बहुतेक सामने हे श्रीलंकेत होते. तेव्हा भारतानं या स्पर्धेत भाग घेतला होता.
पुढील वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन : पुढील वर्षी म्हणजेच 2025 आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीचं आयोजन केलं जाणार आहे. 2017 नंतर या आयसीसीच्या या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं नाही. 2017 मध्ये पाकिस्ताननं विजेतेपद पटकावलं होतं. इंग्लंडमध्ये आयोजित केलेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पाकिस्ताननं भारतीय संघाचा पराभव केला होता.
हेही वाचा :
- 'बॉल बॉय' ते क्रिकेटचा देव: 51 वा वाढदिवस साजरा करणाऱ्या सचिनचे 'हे' विक्रम मोडणं जवळपास अशक्यच! - Sachin Tendulkar Birthday
- स्टॉइनिसच्या ऐतिहासिक शतकानं चेन्नईच्या 'किंग्ज'विरुद्ध लखनौ ठरली 'सुपर जायंट्स'; गायकवाडची शतकी खेळी व्यर्थ - CSK vs LSG
- RR VS MI IPL 2024 : राजस्थानची 'यशस्वी' खेळी : जैस्वालच्या धडाकेबाज शतकानं मुंबईला पराभवाचा तडाखा, शर्माचे 5 बळी - RR VS MI IPL 2024 38th match