दुबई ICC Lifted Suspension of SLC : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (आयसीसी) श्रीलंका क्रिकेट बोर्डावरील निलंबन मागं घेऊन तत्काळ निर्णय लागू केला. आयसीसीनं रविवारी हा निर्णय घेतलाय. सरकारी हस्तक्षेपामुळं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं श्रीलंकन क्रिकेट बोर्डावर बंदी घातली होती. आयसीसीच्या या निर्णयानं श्रीलंका क्रिकेटला मोठा दिलासा मिळालाय.
नोव्हेंबरमध्ये केलं होतं निलंबित : श्रीलंका क्रिकेट बोर्डाला 10 नोव्हेंबर 2023 रोजी आयसीसीचं सदस्य म्हणून त्यांच्या जबाबदाऱ्या पाडताना नियमांच उल्लंघन केल्याबद्दल निलंबन करण्यात आलं होतं. त्यानंतर 21 नोव्हेंबरला आयसीसी बोर्डाची बैठक झाली. श्रीलंका द्विपक्षीय आणि आयसीसी स्पर्धांमध्ये खेळू शकेल असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र सध्या खेळला जाणारा अंडर-19 विश्वचषक दक्षिण आफ्रिकेत हलवण्यात आला. यापूर्वी हा सामना श्रीलंकेत खेळवला जाणार होता.
- समाधानानंतर आयसीसीनं उठवली बंदी : आयसीसीनं सांगितलं की, "आता ते पूर्णपणे समाधानी आहेत. त्यानंतर श्रीलंका बोर्डावरील बंदी उठवण्यात आलीय. आयसीसी बोर्ड परिस्थितीकडे लक्ष देत आहे. श्रीलंका क्रिकेट यापुढे सदस्यत्वाच्या बंधनांचे उल्लंघन करत नाही. याबद्दल समाधान आहे."
-
The ban imposed by the ICC on Sri Lanka Cricket in November 2023 has been lifted.https://t.co/qDPp8I2CM6
— ICC (@ICC) January 28, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">The ban imposed by the ICC on Sri Lanka Cricket in November 2023 has been lifted.https://t.co/qDPp8I2CM6
— ICC (@ICC) January 28, 2024The ban imposed by the ICC on Sri Lanka Cricket in November 2023 has been lifted.https://t.co/qDPp8I2CM6
— ICC (@ICC) January 28, 2024
निलंबनानंतर निवड समितीत झाले फेरबदल : आयसीसीच्या निलंबनानंतर श्रीलंकन क्रिकेटमध्ये बदल पाहायला मिळाला होता. बोर्डानं निवड समितीत बदल केले होते. संघाचा माजी खेळाडू उपुल थरंगा याला 5 सदस्यीय निवड समितीचे अध्यक्ष करण्यात आलं. या समितीमध्ये अजंता मेंडिस, इंडिका डी सरम, थरंगा परनाविताना, दिलरुवान परेरा आणि अध्यक्ष उपुल थरंगा यांच्यासह एकूण पाच जण होते.
- 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेची निराशजनक कामगिरी : 2023 मध्ये भारतात खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेची कामगिरी अत्यंत खराब राहिली होती. कुसल मेंडिसच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेनं 9 पैकी फक्त 2 लीग सामने जिंकले होते. यामुळं गुणतालिकेत त्यांना नवव्या स्थानावर राहावं लागलं होतं.
हेही वाचा :