सिंगापूर Prize Money for D Gukesh : विश्वनाथन आनंदनंतर भारताला बुद्धिबळात दुसरा विश्वविजेता मिळाला आहे. बुद्धिबळाच्या 138 वर्षांच्या इतिहासात डी गुकेश हा विश्वविजेता बनणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. चीनच्या दिग्गज डिंग लिरेनविरुद्ध 14वा सामना जिंकून इतिहास रचणाऱ्या गुकेशला वयाच्या 18 व्या वर्षी कोट्यवधी रुपये बक्षीस मिळाले आहेत. यावर्षी विजेतेपदाची हॅट्ट्रिक करणाऱ्या गुकेशची एकूण संपत्ती जागतिक चॅम्पियनशिपपूर्वी 8.26 कोटी रुपये होती, मात्र विश्वविजेता बनल्यानंतर त्याच्या संपत्तीत कमालीची वाढ झाली आहे. त्यानं 17 दिवसांत 11 कोटींहून अधिक कमाई केली. सिंगापूर इथं 17 दिवस जागतिक बुद्धिबळ स्पर्धा पार पडली.
POV you just witnessed Gukesh D become the 18th World Champion! #DingGukesh 🇮🇳 🏆 ♟️ pic.twitter.com/gWaF8iJrvk
— International Chess Federation (@FIDE_chess) December 12, 2024
आनंदनंतर दुसरा भारतीय : डी गुकेशनं जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिपच्या 14 व्या आणि अंतिम सामन्यात चीनच्या दिग्गज डिंग लिरेनचा पराभव केला. गुकेशनं हा सामना 7.5-6.5 असा जिंकून इतिहास रचला. गुकेशनं शेवटचा खेळ काळ्या मोहऱ्यांनी खेळला. या विजयानंतर गुकेश भावूक झाला आणि तो आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकला नाही. विश्वनाथन आनंद नंतर विश्वविजेता बनणारा तो दुसरा भारतीय ठरला. गुकेश 5 वेळा विश्वविजेता विश्वनाथन आनंदच्या अकादमीत बुद्धिबळाचे प्रशिक्षण घेतो.
Congratulations! It's a proud moment for chess, a proud moment for India, a proud moment for WACA, and for me, a very personal moment of pride. Ding played a very exciting match and showed the champion he is.@FIDE_chess @WacaChess pic.twitter.com/o3hq26JFPf
— Viswanathan Anand (@vishy64theking) December 12, 2024
विश्वविजेता बनल्यानंतर गुकेशला मिळाले 11.45 कोटी रुपये : डी गुकेशला वर्ल्ड चॅम्पियन बनल्यानंतर 11.45 कोटी रुपये बक्षीस मिळालं, तर डिंग लिरेनला 9.75 कोटी रुपये मिळाले. FIDE च्या नियमांनुसार, फायनल खेळणाऱ्या खेळाडूंना प्रत्येक सामना जिंकण्यासाठी 1.69 कोटी रुपये मिळतात तर उर्वरित रक्कम दोन्ही खेळाडूंमध्ये विभागली जाते. गुकेशनं तीन सामने जिंकले. त्यानं तिसरा, 11वा आणि 14वा गेम जिंकला. ज्यातून त्याला 5.07 कोटी मिळाले, तर गुकेशला एकूण 11.45 कोटी मिळाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, वर्ल्ड चॅम्पियन बनण्यापूर्वी गुकेशची एकूण संपत्ती 8.26 कोटी रुपये होती, जी आता 20 कोटींच्या पुढं गेली आहे. बुद्धिबळातील बक्षिसांची रक्कम आणि जाहिराती हे गुकेशचं उत्पन्नाचे स्रोत आहेत.
🇮🇳 Gukesh D 🥹
— International Chess Federation (@FIDE_chess) December 12, 2024
Ladies and gentlemen, the 18th WORLD CHAMPION! #DingGukesh pic.twitter.com/CgzYBgeTfq
डी गुकेशची विजेतेपदाची हॅटट्रिक : डी गुकेशनं 2024 या वर्षाचा विश्वविजेता म्हणून निरोप घेतला. या वर्षी त्यानं 3 मोठी जेतेपदं पटकावली. गुकेशनं एप्रिलमध्ये झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या पात्रता स्पर्धा आणि 'कँडिडेट टूर्नामेंट'मध्ये भाग घेतला होता. 17 व्या वर्षी, तो उमेदवार जिंकणारा जगातील सर्वात तरुण बुद्धिबळ ग्रँड मास्टर बनला आहे. गुकेशनं प्रथमच बोर्डवर 1 धावा केल्या. परंतु त्यानं चमकदार कामगिरी केली आणि वैयक्तिक सुवर्णपदकही जिंकलं. डिसेंबरमध्ये वर्ल्ड चॅम्पियन बनून त्यानं विजेतेपदाची हॅटट्रिक केली.
FIDE World Championship Game 14: 🇮🇳 Gukesh D crowned 18th World Champion 👑
— International Chess Federation (@FIDE_chess) December 12, 2024
18-year-old Indian prodigy Gukesh D is the new FIDE World Champion and the 18th in the line of champions, the youngest ever in history.
In a dramatic and unexpected turn of events, when it seemed that… pic.twitter.com/IKmmYb5LAh
हेही वाचा :