बेंगळुरु Heavy Rain In Bengaluru : कर्नाटकात मंगळवारी सकाळपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळं राजधानी बेंगळुरुसह राज्याच्या मध्य आणि दक्षिण भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. ज्याचा परिणाम उद्यापासून भारत विरुद्ध न्यूझीलंड क्रिकेट संघ यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यावर होऊ शकतो. दोन्ही संघांमधील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना 16 ऑक्टोबरपासून बेंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
It's Raining heavily at the Chinnaswamy Currently. 🌧️
— Tanuj Singh (@ImTanujSingh) October 15, 2024
- Rain also predicted for all 5 days in first Test Match between India vs New Zealand...!!!! pic.twitter.com/XzwNOFoy6k
शहरात मुसळधार पाऊस : बंगळुरुमध्ये मुसळधार पावसामुळं रस्त्यावर जाम झाल्यामुळं विद्यार्थी आणि कार्यालयात जाणाऱ्या लोकांना मोठा त्रास होत आहे. अनेक सखल भाग पाण्याखाली गेले आहेत. मंगळवारी सकाळपर्यंत गेल्या 24 तासांत शहरात 16 मिमी पावसाची नोंद झाली आहे. किनारी कर्नाटक व्यतिरिक्त, IMD नं तुमकुरु, म्हैसूर, कोडागु, चिक्कमगालुरु, हसन, कोलार, शिवमोग्गा आणि चिक्कबल्लापूर जिल्ह्यांसाठी हवामानाचा 'यलो अलर्ट' जारी केला आहे. ही चेतावणी हवामानाची बिघडलेली स्थिती दर्शवते परिणामी येथील जनजीवन प्रभावित होऊ शकते.
कसोटी सामन्याच्या 4 दिवस पावसाची शक्यता : हवामान वेबसाइट एक्यूवेदरनुसार, बुधवार 16 ऑक्टोबरपासून पुढील 5 दिवस बेंगळुरुमध्ये पावसाची शक्यता आहे. यापैकी 4 दिवस पावसाची शक्यता 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त आहे. कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी 41 टक्के, दुसऱ्या दिवशी 40 टक्के आणि तिसऱ्या दिवशी सर्वाधिक 67 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्याचवेळी, बेंगळुरु कसोटीत चौथ्या दिवशी 25 टक्के आणि पाचव्या दिवशी 40 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि, बंगळुरुमध्ये पावसामुळं सामना वाहून जाण्याची शक्यता फारच कमी आहे कारण या स्टेडियमची ड्रेनेज व्यवस्था जगातील सर्वोत्तम आहे जी काही सेकंदात मैदान कोरडं करते.
Rain predicted for all 5 days at the Chinnaswamy Stadium for the 1st Test between India and New Zealand. 🌧️ pic.twitter.com/D8Af2HARvR
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 15, 2024
WTC गुणतालिकेत भारत अव्वल : न्यूझीलंडचं स्वागत करण्यापूर्वी घरच्या कसोटी मालिकेत बांगलादेशचा 2-0 असा पराभव करणारा भारतीय संघ सध्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC) गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. 2024-25 च्या WTC सायकलमध्ये त्यांची मोहीम संपवण्यापूर्वी भारताला आणखी 8 कसोटी सामने खेळायचे आहेत. न्यूझीलंड विरुद्धच्या 3 कसोटी मालिकेनंतर, भारत बहुप्रतिक्षित बॉर्डर-गावस्कर स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाला जाईल, ज्यात प्रथमच 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. WTC फायनल पुढील वर्षी जूनमध्ये लॉर्ड्सवर खेळवली जाणार आहे.
हेही वाचा :