ETV Bharat / sports

5 भाऊ-बहिणीच्या जोड्यांनी गाजवलं क्रिकेटचं मैदान; दोन तर अजूनही खेळत आहेत... - Raksha Bandhan - RAKSHA BANDHAN

Happy Raksha Bandhan : रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीचा सण. यामध्ये बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते. येथे आम्ही तुम्हाला अशा 5 भावा-बहिणीच्या जोडीबद्दल सांगत आहोत ज्यांनी आपल्या देशासाठी क्रिकेट खेळले आहे.

Happy Raksha Bandhan
5 भाऊ-बहिणीच्या जोड्या (AP and ETV Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Aug 19, 2024, 1:30 PM IST

Updated : Aug 19, 2024, 3:06 PM IST

हैदराबाद Happy Raksha Bandhan : रक्षाबंधन हा हिंदू धर्मातील सर्वात खास सणांपैकी एक आहे. यात बहीण भावाला राखी बांधते. यासोबतच ति भावाच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देते. तर दुसरीकडे, भाऊ आयुष्यभर बहिणीचं रक्षण करण्याचं वचन देतो. राखी बांधण्यासाठी तो बहिणीला भेटवस्तूही देतो. क्रिकेटमध्ये अशा अनेक भावा-बहिणीच्या जोड्या आहेत ज्यांनी आपल्या देशासाठी आंतरराष्ट्रीय सामने खेळले. आज आम्ही तुम्हाला अशाच 5 जोड्यांबद्दल सांगणार आहोत. (Raksha Bandhan Special News)

हॅरी टेक्टर आणि ॲलिस टेक्टर (आयर्लंड)

हॅरी टेक्टर हा आयर्लंडच्या सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे. त्यानं 45 सामन्यात 50 च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. तो आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर आहे. तर तीन दिवसांपूर्वी, हॅरीची बहीण ॲलिस टेक्टरनं श्रीलंकेविरुद्ध आयर्लंडकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.

Happy Raksha Bandhan
पीटर मॅकग्लॅशन आणि सारा मॅक्ग्लॅशन (न्यूझीलंड) (Getty Images)

पीटर मॅकग्लॅशन आणि सारा मॅक्ग्लॅशन (न्यूझीलंड)

सारा मॅक्ग्लॅशननं 2002 ते 2016 दरम्यान न्यूझीलंडसाठी 200 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले. यात 2 कसोटी व्यतिरिक्त 134 एकदिवसीय आणि 76 टी 20 सामील आहेत. तिच्या नावावर जवळपास 3500 धावा आहेत. तर तिचा भाऊ पीटर मॅकग्लॅशननं चार एकदिवसीय आणि 11 टी-20 सामन्यांमध्ये न्यूझीलंडचं प्रतिनिधित्व केलं.

Happy Raksha Bandhan
विल सदरलँड आणि ॲनाबेल सदरलँड (ऑस्ट्रेलिया) (Getty Images)

विल सदरलँड आणि ॲनाबेल सदरलँड (ऑस्ट्रेलिया)

ॲनाबेल सदरलँड ही ऑस्ट्रेलिया महिला संघाची आघाडीची अष्टपैलू खेळाडू आहे. तिनं अलीकडेच एका कसोटीत द्विशतक झळकावलं होतं. गोलंदाजीतही सरदलँडच्या नावावर 59 विकेट आहेत. ती डब्ल्यूपीएलमध्येही खेळते. ॲनाबेलचा भाऊ विल सदरलँड याला यावर्षी ऑस्ट्रेलियाकडून दोन एकदिवसीय सामने खेळण्याची संधी मिळाली. त्याच्या नावावर 18 धावा आणि 2 विकेट आहेत.

नॅथन ॲस्टल आणि लिसा ॲस्टल (न्यूझीलंड)

कोणत्या क्रिकेट चाहत्याला नॅथन ॲस्टलचं नाव माहीत नाही? तो न्यूझीलंड क्रिकेट इतिहासातील महान फलंदाजांपैकी एक आहे. कसोटीत सर्वात जलद द्विशतक झळकावण्याचा विक्रम ॲस्टलच्या नावावर आहे. तर नॅथनची बहीण लिसा ॲस्टल हिनेही न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे.

Happy Raksha Bandhan
एड जॉयस आणि इसोबेल जॉइस (आयर्लंड) (Getty Images)

एड जॉयस, डोम जॉयस आणि इसोबेल जॉइस, सेसेलिया जॉइस (आयर्लंड)

आयर्लंडच्या जॉयस कुटुंबात चार आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहेत. एड जॉयस तर इंग्लंडकडूनही क्रिकेट खेळला आहे. तर डोमला आयर्लंडकडून तीन एकदिवसीय सामने खेळण्याची संधी मिळाली. त्यांच्या दोन्ही बहिणी इसोबेल आणि सेसेलिया यांनी बरंच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलं आहे. एका कसोटीशिवाय इसोबेलनं 79 एकदिवसीय आणि 55 टी 20 सामने खेळले आहेत. सेसेलियाला 100 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव आहे.

हेही वाचा :

  1. ये डर अच्छा है...! भारताविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी कांगारुंचा कर्णधार क्रिकेटपासून दूर, म्हणाला... - Pat Cummins on Break
  2. विश्वचषकात भिडणार नाही कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान; आयसीसीचा आश्चर्यकारक निर्णय - India vs Pakistan

Last Updated : Aug 19, 2024, 3:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.