मुंबई Vinod Kambli Viral Video : एकेकाळी क्रिकेटचं मैदान गाजवणाऱ्या विनोद कांबळीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत विनोद कांबळीची अवस्था अतिशय बिकट असल्याचं दिसून येतंय. रस्त्यानं चालताना त्याला दुसऱ्यांचा आधार घ्यावा लागत असल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय. मुंबईच्या रस्त्यावरचा विनोद कांबळीचा हा व्हिडिओ आणि त्यामधील त्याची अवस्था पाहून अनेकांना धक्का बसलाय.
क्रिकेट का दिग्गज विनोद कांबली...दुनिया की सबसे अमीर संस्था #BCCI क्या अपने क्रिकेटर्स की मदद तक करने में असफल है। क्या फायदा ऐसे क्रिकेट बोर्ड का? इन्हीं खिलाड़ियों के बल पर बोर्ड की कमाई होती है।#VinodKambli #SachinTendulkar #Kambli @PMOIndia @BCCI @JayShah @IndiaSports pic.twitter.com/rtFZsEAp9j
— Dheerendra Gopal (@DheerendraGopal) August 5, 2024
विनोदी कांबळीच्या व्हायरल व्हिडिओमध्ये काय? : या व्हिडिओमध्ये विनोद कांबळी एका बाईकचा आधार घेऊन उभा आहे. पण जेव्हा तो चालण्याचा प्रयत्न करतो तेव्हा अडखळतो. त्यानंतर शेजारी उभे असलेले लोक त्याला आधार देतात. विनोद कांबळीला नक्की काय झालं? यासंदर्भात कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. तसेच व्हिडिओ कधीचा आहे, याबाबत माहिती समोर आलेली नाही. मात्र, मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीम इंडियाच्या या माजी क्रिकेटपटूची प्रकृती बऱ्याच दिवसांपासून खराब आहे. विनोद कांबळीला अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणानं रुग्णालयात दाखल करण्यात येत असतं.
Sad look at Vinod Kambli’s condition He was once among best batters/fielders in 🇮🇳 cricket team Bad luck/lifestyle is the apparent cause of his present state of health His pal 'Bharat Ratna' Sachin Tendulkar & BCCI shd help in his best possible rehabilitation fast ✅☝️ pic.twitter.com/ZVSC2fpeTl
— G M A PRABHU (@GMAPRAPRABHU1) August 5, 2024
सचिनला तेंडुलकराला मदतीचं आवाहन : विनोद कांबळीची ही अवस्था बघून काही नेटीझन्सनं त्याचा बालपणीचा मित्र आणि दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला या व्हिडिओवर टॅग करून विनोद कांबळीची मदत करण्याचं आवाहन केलंय. व्हिडिओ शेअर करत एका युजरनं म्हटलंय की, “विनोद कांबळी यांची ही अवस्था पाहून मन हेलावून गेलं. ते एक जबरदस्त खेळाडू होते. त्यांनीही त्यांचा मित्र सचिन तेंडुलकरसारखं आयुष्य जगायला हवं होतं. ते खूप मोठे झाले असते. मात्र आता त्यांची अवस्था वाईट आहे. ते पूर्णपणे बरे व्हावेत, यासाठी मी प्रार्थना करतो. सचिन तेंडुलकर आणि बीसीसीआयनंही त्याच्याकडं लक्ष द्यावं." तर दुसऱ्या एका युजरनं कमेंट केली आहे की, "जगातील सर्वात श्रीमंत संस्था बीसीसीआयआपल्या क्रिकेटपटूंना मदत करण्यातही अपयशी ठरत आहे का? अशा क्रिकेट बोर्डाचा उपयोग काय? या खेळाडूंच्या जोरावरच बोर्ड पैसे कमवतो." दरम्यान, व्हायरल
Disclaimer- व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या सत्यतेबाबत ईटीव्ही भारत कोणतीही पुष्टी करत नाही.
हेही वाचा -
- Vinod Kambli Beaten Wife: पत्नीला मारहाण केल्याच्या आरोपावरून माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीविरुद्ध गुन्हा दाखल
- Vinod Kambli News : पत्नीला मारहाणप्रकरणी विनोद कांबळीला जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याची नोटीस
- Vinod Kambli Net Worth कोट्यावधी कमावणारा विनोद कांबळी आज एक-एक रुपयाला झाला आहे महाग, जाणून घ्या काय आहे कारण