नवी दिल्ली Next India Captain : भारतीय संघाचा माजी डावखुरा फलंदाज सुरेश रैनानं भारतीय संघाच्या कर्णधाराबद्दल मोठी गोष्ट सांगितली. सुरेश रैनाच्या नजरेत जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंत नाही, तर शुभमन गिल हा भारतीय संघाचा कर्णधार होऊ शकतो, असं त्यानं म्हटलं आहे. रोहित शर्मानंतर गुजरात टायटन्सचं नेतृत्व करणारा शुभमन गिल भारताचा कर्णधार होऊ शकतो, असं मत त्यानं व्यक्त केलंय.
गिल होणार भारतीय संघाचा कर्णधार : अनेक सीनियर खेळाडूंबाबत अशाप्रकारची चर्चा होत असते. त्यामुळं सुरेश रैनाचं वक्तव्य देखील महत्त्वाचं आहे. ऋषभ पंतनं दुखापतीनंतर आयपीएलमध्ये पुनरागमन केलं आहे. त्यानं अनेक चांगल्या खेळीही खेळल्या आहेत. हार्दिक पांड्या सध्या मुंबईचं नेतृत्व करत असून, त्याच्या नेतृत्वाखाली गुजरातनं एकदा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं असून, दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली होती. जसप्रीत बुमराहनं इंग्लंडविरुद्ध चमकदार कामगिरी केली होती. त्यावेळी तो संघाचा उपकर्णधारही होता. त्यामुळं त्याच्याबद्दलही चर्चा रंगल्या होत्या. शुभमन गिल भारतीय संघाचा कर्णधार होऊ शकतो, असा विश्वास सुरेश रैनानं एका मुलाखतीत व्यक्त केलाय.
गिलची आयपीएलमध्ये चांगली कामगिरी : शुभमन गिलनं आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून 3 सामने जिंकले आहेत, तर चार सामन्यांत त्याला पराभवाचा सामना करावा लागला आहे. मात्र, त्यानं अनेकवेळा आपल्या निर्णयातून एका चांगल्या कर्णधाराची झलकही दाखवली आहे. आता उरलेल्या सामन्यांमध्ये त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात संघ कशी कामगिरी करतो, हे पाहायचं आहे. मात्र, अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत गिलनं भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. त्यामुळं कर्णधार पदाचा त्याला अनुभव आहे.
हे वाचलंत का :
- RCB चा नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय, KKR करणार प्रथम फलंदाजी - KKR vs RCB Live score IPL 2024
- हैदराबादच्या फलंदाजांनी मोडले आयपीएलमधील धावांचे सर्व रेकॉर्ड; घरच्या मैदानावर 'राजधानी एक्सप्रेस' 'फेल' - DC vs SRH
- IPL आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी टीम डेव्हिड आणि किरॉन पोलार्डला दंड - IPL 2024