नॉटिंगहॅम Fastest Team Fifty in Test : वेस्ट इंडिजविरुद्धची पहिली कसोटी एकतर्फी जिंकल्यानंतर आता इंग्लंड संघानं एक मोठा विक्रम केला आहे. नॉटिंगहॅम कसोटीत इंग्लंडच्या फलंदाजांनी असा विक्रम केला जो कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात प्रथमच घडला. इंग्लंड संघानं वेस्ट इंडिजविरुद्ध केवळ 4.2 षटकांत 50 धावांचा टप्पा पार केला. जो एक विश्वविक्रम आहे. यापूर्वी हा विक्रम केवळ इंग्लंडच्या नावावर होता. या संघानं 1994 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 4.3 षटकांत पन्नासचा टप्पा ओलांडला होता, पण आता 30 वर्षांनंतर या संघानं स्वतःचा विक्रम मोडीत काढला आहे.
5️⃣0️⃣ in just 3️⃣2️⃣ balls 🤯
— England Cricket (@englandcricket) July 18, 2024
Ben Duckett is flying in Nottingham ✈️ pic.twitter.com/0yOuwasgPv
डकेटच्या फटकेबाजीनं रेकॉर्ड केला : नॉटिंगहॅम कसोटीत इंग्लंडची सुरुवात खूपच खराब झाली होती. डावाच्या पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर या संघानं पहिली विकेट गमावली. सलामीवीर झॅक क्राउली 0 धावांवर बाद झाला. पण त्यानंतर ऑली पोपसह बेन डकेटनं पुढच्या 23 चेंडूत संघाची धावसंख्या पन्नासच्या पुढं नेली. बेन डकेटनं केवळ 32 चेंडूत स्वतःचही अर्धशतक पूर्ण केलं जे त्याचं सर्वात वेगवान कसोटी अर्धशतक आहे. आक्रमक फलंदाजी करत या खेळाडूनं ऑली पोपसोबत 106 धावांची भागीदारी केली. बेन डकेट 59 चेंडूत 71 धावा करुन बाद झाला. त्याची विकेट शमर जोसेफनं घेतली. डकेटच्या बॅटमधून एकूण 14 चौकार आले.
वेस्ट इंडिजवर इंग्लंडचं वर्चस्व : तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा संघ वेस्ट इंडिजवर पूर्णपणे वर्चस्व गाजवत आहे. इंग्लंड संघानं लॉर्ड्सवर खेळली गेलेली पहिली कसोटी एक डाव आणि 114 धावांनी जिंकली. वेस्ट इंडिजनं पहिल्या डावात केवळ 121 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडनं पहिल्या डावात 371 धावा केल्या. यानंतर वेस्ट इंडिजचा संघ दुसऱ्या डावात केवळ 136 धावाच करु शकला आणि त्याचा परिणाम असा झाला की या संघाला डावानं पराभव स्वीकारावा लागला. हा सामना जेम्स अँडरसनचा शेवटचा कसोटी सामना होता.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 50 धावा करणारे संघ :
- 4.2 षटकांत - इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज, नॉटिंगहॅम, 2024
- 4.3 षटकांत - इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ओव्हल, 1994
- 4.6 षटकांत - इंग्लंड विरुद्ध श्रीलंका, मँचेस्टर, 2002
- 5.2 षटकांत - श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान, कराची, 2004
- 5.3 षटकांत - भारत विरुद्ध इंग्लंड, चेन्नई, 2008
- 5.3 षटकांत - भारत विरुद्ध वेस्ट इंडीज, पोर्ट ऑफ स्पेन, 2023
हेही वाचा :