लंडन England Squad Announced : इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध वेस्ट इंडिज क्रिकेट संघ एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंड संघाची घोषणा करण्यात आली आहे. नियमित कर्णधार जॉस बटलरला दुखापतीतून सावरण्यात काही अडचण आल्यानं त्याला मालिकेतून वगळण्यात आल्यानं इंग्लंडनं वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेसाठी अष्टपैलू खेळाडू लियाम लिव्हिंगस्टोनची कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे.
Speedy recovery, Jos 🤞
— England Cricket (@englandcricket) October 21, 2024
A new captain for West Indies ODIs 🙌
Latest squad updates here 👇https://t.co/aUjgWjgs6a#EnglandCricket pic.twitter.com/gvVeNeueq0
T20 मालिकेत होणार बटलरचं पुनरागमन : इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानं (ECB) एसेक्सचा अनकॅप्ड यष्टीरक्षक-फलंदाज मायकेल पेपरचाही संघात समावेश करण्याची घोषणा केली. इंग्लंडचा संघ पुढील आठवड्याच्या सुरुवातीला कॅरेबियन दौऱ्यासाठी रवाना होणार असून जॉस बटलर T20 मालिकेत पुनरागमन करणार आहे. त्याआधी इंग्लंडनं 13 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीनंतर आणखी दोन खेळाडू या संघात सामील होतील. लिव्हिंगस्टन इंग्लंडचं कर्णधारपद भूषवण्याची ही पहिलीच वेळ असेल. लिव्हिंग्स्टनला कर्णधारपदाचा अनुभव आहे. त्यानं 81 सामन्यांमध्ये लँकेशायरचे नेतृत्व केलं आहे. आदिल रशीद आणि सॅम कुरननंतर तो वेस्ट इंडिज दौऱ्यावरचा तिसरा सर्वात अनुभवी खेळाडू असेल. मात्र, हॅरी ब्रूकला वनडे आणि T20 मालिकेसाठी संधी देण्यात आलेली नाही. त्याने अलीकडेच पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्रिशतक झळकावलं.
दुखापतीमुळं बटलर बाहेर : 2024 च्या पुरुषांच्या T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताविरुद्ध जूनमध्ये गयाना इथं झालेल्या पराभवानंतर बटलरनं स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेलं नाही, 2021 नंतर तिसऱ्यांदा त्याला दुखापत झाली होती. याआधीही तो दुखापतीमुळं द हंड्रेड स्पर्धेत मँचेस्टर ओरिजिनल्ससाठी सहभागी झाला नव्हता. तसंच सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या पांढऱ्या चेंडूंच्या मालिकेलाही त्याला मुकावं लागलं होतं.
Welcome Michael 👋
— England Cricket (@englandcricket) October 21, 2024
Essex wicketkeeper-batter Michael Pepper has been added to the squad for our West Indies white-ball tour 🌶️ pic.twitter.com/nJ5WHuGipa
31 ऑक्टोबरपासून सुरु होणार मालिका : इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज मालिकेतील पहिला वनडे सामना 31 ऑक्टोबरपासून खेळवला जाणार आहे. वनडे मालिकेतील शेवटचा सामना 6 नोव्हेंबरला होणार आहे. तर T20 मालिका 9 नोव्हेंबरपासून सुरु होणार असून मालिकेतील शेवटचा सामना 17 नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे.
मालिकेचं वेळापत्रक :
- पहिला वनडे : 31 ऑक्टोबर
- दुसरा वनडे : 2 नोव्हेंबर
- तिसरा वनडे : 6 नोव्हेंबर
- पहिला T20 सामना : 9 नोव्हेंबर
- दुसरा T20 सामना : 10 नोव्हेंबर
- तिसरा T20 सामना : 14 नोव्हेंबर
- चौथा T20 सामना : 16 नोव्हेंबर
- पाचवा T20 सामना : 17 नोव्हेंबर
वनडे आणि T20 मालिकेसाठी इंग्लंडचा संघ :
जॉस बटलर (T20 कर्णधार), जोफ्रा आर्चर, जेकब बेथेल, जाफर चौहान, सॅम कुरन, विल जॅक्स, लियाम लिव्हिंगस्टोन (वनडे मालिकेसाठी कर्णधार), साकिब महमूद, डॅन मौसली, जेमी ओव्हरटन, मायकेल पेपर, आदिल रशीद, फिल सॉल्ट, रीस टोपले, जॉन टर्नर.
हेही वाचा :