अँटिग्वा (वेस्ट इंडिज) ENG Beat WI in 2nd ODI : वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर असलेल्या इंग्लंड क्रिेकेट संघानं यजमान संघावर दणदणीत विजय नोंदवला आहे. सध्या इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंड संघाला 8 विकेटनं पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. मात्र त्यांनी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दमदार पुनरागमन केलं आणि इंग्लंडनं हा सामना 5 विकेटनं जिंकला. या सामन्यात संघाचा कर्णधार लियाम लिव्हिंग्स्टननं शानदार शतक झळकावलं. त्याच्या शतकामुळं त्याच्या संघानं 15 चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. या सामन्यातील विजयासह त्याच्या संघानं तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. या मालिकेतील पुढील सामना 06 नोव्हेंबर रोजी होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ मालिका जिंकेल.
A record-breaking chase! 📈
— England Cricket (@englandcricket) November 2, 2024
What a performance to level the series! 🙌
🌴 #WIvENG 🏴 | #EnglandCricket pic.twitter.com/obyvrDp12E
शाई होपनं खेळली शतकी खेळी : या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांचा हा निर्णय योग्य ठरला. अवघ्या 12 धावांवर वेस्ट इंडिज संघाचे दोन प्रमुख फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले होते. यानंतर कर्णधार शाई होप आणि केसी कार्टर यांनी मिळून डावाची धुरा सांभाळली आणि इंग्लंडच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. दोघांनी मिळून तिसऱ्या विकेटसाठी 143 धावांची भागीदारी केली. कार्टर 77 चेंडूत 71 धावा करुन बाद झाला. तो बाद झाल्यानंतर होपनं आपलं शतक पूर्ण केलं. त्यानंतर तो 117 धावा करुन बाद झाला. जोफ्रा आर्चरनं त्याची विकेट घेतली. शेरफेन रदरफोर्डनं 36 चेंडूत 54 धावांची शानदार खेळी केली. या खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजनं 50 षटकं खेळून 6 बाद 328 धावा करण्यात यश मिळवलं. इंग्लंडकडून आदिल रशीदनं सर्वाधिक 2 बळी घेतले. विशेष म्हणजे इंग्लंडनं या डावात 9 गोलंदाजांचा वापर केला होता.
Simply BRILLIANT!
— England Cricket (@englandcricket) November 2, 2024
A first ODI 100 for @liaml4893, and at the perfect time! 💯
Match centre: https://t.co/q1eOEABnWo
🌴 #WIvENG 🏴 | #EnglandCricket pic.twitter.com/j13JAXo2KY
लिव्हिंग्स्टनची शानदार शतकी खेळी : या सामन्यात दोन्ही संघांच्या कर्णधारांनी शानदार खेळी केली. प्रथम, वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होपनं 127 चेंडूत 117 धावा केल्या. यानंतर सामन्याच्या दुसऱ्या डावात लियाम लिव्हिंगस्टनची चमक पाहायला मिळाली. या सामन्यात लिव्हिंगस्टननं 85 चेंडूत 124 धावांची वादळी खेळी करत शाई होपची खेळी धुळीस मिळवली. या सामन्यात लिव्हिंगस्टननं आपले अर्धशतक 60 चेंडूत पूर्ण केलं होतं. मात्र त्यानं केवळ 77 चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. म्हणजे त्यानं पुढच्या 50 धावा फक्त 17 चेंडूत केल्या. सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाचा सामना करण्यासाठी इंग्लंडच्या वनडे संघातून लियाम लिव्हिंगस्टोनला सुरुवातीला वगळण्यात आलं होतं. दोन महिन्यांनंतर, त्यानं वेस्ट इंडिजविरुद्ध मालिका निर्णायक ठरविण्यासाठी इंग्लंडचा स्टँड-इन कर्णधार म्हणून सामना जिंकणारं शतक केलं.
124 runs from 85 balls 💪
— England Cricket (@englandcricket) November 2, 2024
Liam Livingstone we are in awe! 🙌
🌴 #WIvENG 🏴 | #EnglandCricket
हेही वाचा :