नवी दिल्ली PV Sindhu Marriage : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूनं अलीकडेच सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आणि प्रदीर्घ काळानंतर ट्रॉफीचा दुष्काळ संपवला. 29 वर्षांची सिंधू आता वधू बनण्यासाठी सज्ज झाली आहे. ती 22 डिसेंबर 2024 रोजी उदयपूरमध्ये सात फेरे घेईल. सिंधू हैदराबादस्थित व्यंकट दत्ता साईसोबत लग्न करणार आहे, जो पोसाइडेक्स टेक्नॉलॉजीजमध्ये कार्यकारी संचालक आहे. वडील पीव्ही रमना यांनी त्यांच्या लग्नाची महत्त्वाची माहिती शेअर केली आहे.
⚡ PV Sindhu to Get Married 💍
— Model Hub (@Model_hub_1111) December 3, 2024
Indian Badminton star and Olympic medalist PV Sindhu will marry businessman Venkata Datta Sai on December 22 in Udaipur.
Congratulations to the couple 💐#PVSindhuWedding #PVSindhu pic.twitter.com/TaqWt4xwSZ
20 डिसेंबरपासून लग्नाचे कार्यक्रम होणार सुरु : पीव्ही सिंधूचे वडील पीव्ही रमणा यांनी पीटीआयला सांगितलं की, दोन्ही कुटुंबं एकमेकांना ओळखत होते. परंतु सर्व काही एक महिन्यापूर्वीच ठरलं होतं. हीच वेळ होती कारण जानेवारीपासून तिचं (सिंधूचं) वेळापत्रक खूप व्यस्त असणार आहे. त्यामुळं दोन्ही कुटुंबीयांनी 22 डिसेंबरला लग्नसोहळा आयोजित करण्याचा निर्णय घेतला. 24 डिसेंबर रोजी हैदराबादमध्ये रिसेप्शन होणार आहे. पुढील सत्र अत्यंत महत्त्वाचं असल्यानं ती लवकरच तिचं प्रशिक्षण सुरु करणार आहे. 20 डिसेंबरपासून लग्नाशी संबंधित कार्यक्रम सुरु होतील.
सिंधू लयीत परतली : पीव्ही सिंधू काही काळ खराब फॉर्मशी झुंजत होती आणि ऑलिम्पिकमध्येही ती काही विशेष दाखवू शकली नाही. मात्र आता सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकून तिनं आपला वेग पुन्हा मिळवला असून आगामी काळात तिला अनेक मोठ्या स्पर्धा खेळायच्या आहेत, ज्यात भारतीयांना त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. सिंधूनं राष्ट्रकुल स्पर्धेतही दोन सुवर्णपदकं जिंकली आहेत.
PV Sindhu will be marrying Venkata Datta Sai, ED at Posidex Technologies on 22nd December.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 3, 2024
Many congratulations to them! 👏❤️ pic.twitter.com/gc3zaJRlYF
वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये जिंकली 5 पदकं : पीव्ही सिंधू ही भारतातील सर्वात दिग्गज बॅडमिंटनपटूंपैकी एक मानली जाते, तिनं 2019 मध्ये सुवर्ण पदकांसह जागतिक स्पर्धेत पाच पदकं जिंकली आहेत. याशिवाय तिनं ऑलिम्पिक स्पर्धेतही रौप्य आणि कांस्यपदक जिंकले आहेत. या चॅम्पियन बॅडमिंटनपटूनं रिओ 2016 आणि टोकियो 2020 मध्ये सलग ऑलिम्पिक पदकं जिंकली. ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी ती चौथी भारतीय खेळाडू आहे. त्यांच्याशिवाय मनू भाकर, सुशील कुमार आणि नीरज चोप्रा यांनी ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकली आहेत. सिंधूनं 2017 मध्ये करिअर-सर्वोत्तम जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाचं स्थान मिळवलं होतं.
हेही वाचा :