ETV Bharat / sports

भारतीय क्रिकेटचे 'हे' दिग्गज प्रेमाच्या खेळपट्टीवर 'क्लीन बोल्ड'; घटस्फोटानंतर कोणासोबत घालवतात आयुष्य? - Love Affairs of Indian Cricketers

Controversial love affairs of Indian cricketers : भारतातील असे 7 क्रिकेट खेळाडू आहेत, ज्यांची प्रेमप्रकरणं एकेकाळी खूप चर्चेचा विषय बनला होता. आज आम्ही तुम्हाला त्यांच्याबद्दल सांगणार आहोत. यासोबतच दुस-यांदा लग्न केल्यानंतर तो कोणासोबत आयुष्य घालवत आहे हे देखील सांगणार आहोत.

love affairs of Indian cricketers
भारतीय क्रिकेटचे 'हे' दिग्गज प्रेमाच्या खेळपट्टीवर 'क्लीन बोल्ड' (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Aug 26, 2024, 1:42 PM IST

Updated : Aug 26, 2024, 2:49 PM IST

नवी दिल्ली Controversial Love Affairs of Indian Cricketers : भारतीय क्रिकेटमध्ये असे अनेक क्रिकेटपटू जन्माला आले, ज्यांनी खेळात भारतासाठी चमकदार कामगिरी केली. या सर्व क्रिकेटपटूंनी आपल्या दमदार खेळानं प्रतिस्पर्ध्यांना घाम फोडला. पण असे अनेक क्रिकेटपटू आहेत ज्यांनी मैदानावर प्रतिस्पर्ध्यांना रडवलं, पण प्रेमाच्या खेळपट्टीवर क्लीन बोल्ड झाले. प्रेमात पडूनही त्याचा फायदा झाला नाही आणि त्यांचं नाव वादात सापडलं. तर आज आम्ही तुम्हाला अशा भारतीय क्रिकेटर्सबद्दल सांगणार आहोत जे त्यांच्या वादग्रस्त प्रेमप्रकरणांमुळे चर्चेत आले आहेत.

love affairs of Indian cricketers
हार्दिक पांड्या आणि दिनेश कार्तिक (ANI PHOTO)

मोहम्मद अझरुद्दीन : माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीनचं लव्ह लव्ह वादांच्या भोवऱ्यात सापडलं आहे. त्यानं दोनदा लग्न केलं पण त्याची दोन्ही लग्नं यशस्वी झाली नाहीत. या क्रिकेटरचं पहिलं लग्न नौरीनसोबत झालं होतं, जिच्यापासून त्याला 2 मुलं होती. यानंतर बॉलिवूड अभिनेत्री संगीता बिलजानीसोबतच्या त्याच्या अफेअरची जोरदार चर्चा झाली. त्यानं 1996 मध्ये अभिनेत्रीशी लग्न केलं आणि पहिल्या पत्नीला सोडलं. अझरुद्दीनच्या आधी संगीता सलमान खानसोबत लग्न करणार होती. फिक्सिंगमुळं या क्रिकेटपटूची कारकीर्द संपुष्टात आली.

दिनेश कार्तिक : भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकला त्याच्याच मित्रानं फसवलं. त्याचं लव्ह लाईफ अनेक वादांनी वेढलं गेलं आहे. कार्तिकची पहिली पत्नी निकिताचं भारतीय क्रिकेटपटू मुरली विजयसोबत अफेअर होतं, जो दिनेश कार्तिकचा मित्र होता. यानंतर कार्तिक आणि नितिका वेगळे झाले आणि दिनेश कार्तिकनं भारतीय स्क्वॅशपटू दीपिका पल्लीकलसोबत दुसरं लग्न केलं.

मोहम्मद शमी : भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचं लव्ह लाईव्ह वादांसोबतच अनेक समस्यांनीही वेढलेलं आहे. शमीनं 2014 मध्ये कोलकाता येथील मॉडेल आणि अभिनेत्री हसीन जहाँशी लग्न केलं. यानंतर हसीन जहाँनं त्याच्यावर घरगुती हिंसाचार, बलात्कार आणि इतर महिलांसोबत संबंध ठेवण्याचे गंभीर आरोप करत गुन्हा दाखल केला. शमी 2015 मध्ये वडील झाला पण आता तो पत्नीपासून वेगळा झाला आहे. या काळात त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. आता शमीचं नाव कधी सामिया मिर्झाशी तर कधी इतर अभिनेत्रींसोबत जोडलं जातं.

विनोद कांबळी : भारताचा माजी डावखुरा सलामीवीर आणि सचिन तेंडुलकरचा मित्र विनोद कांबळी याचं लव्ह लाइफही वादांच्या भोवऱ्यात सापडलेलं आहे. कांबळीनं 1998 मध्ये नोएला लुईससोबत लग्न केलं होतं. यानंतर त्याचं मॉडेल एंड्रिया हेविटसोबत अफेअर होतं. त्यानं आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला आणि नंतर हेविटशी दुसरं लग्न केलं. मात्र आज तो खूप संकटात आपलं जीवन जगत आहे.

सौरव गांगुली : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि डावखुरा फलंदाज सौरव गांगुली याचं लव्ह लाईफही वादांच्या भोवऱ्यात सापडलं आहे. गांगुलीनं 1997 मध्ये आपल्या कुटुंबाविरुद्ध डोनाशी लग्न केलं. यानंतर सौरव बॉलिवूड आणि साऊथ अभिनेत्री नगमासोबत रिलेशनशिपमध्ये आल्याच्या बातम्या आल्या. यानंतर त्याची पत्नी डोनाला त्याला घटस्फोट घ्यायचा होता पण तसं झालं नाही आणि सौरवच्या पत्नीनं त्यांच्या अफेअरच्या बातम्यांना अफवा ठरवून संपूर्ण प्रकरण संपवले.

जवागल श्रीनाथ : भारताचा माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ याचंही लव्ह लाईफ वादग्रस्त ठरलं आहे. 1999 मध्ये त्यानं ज्योत्स्नासोबत लग्न केलं. यानंतर तो माधवी पत्रावली नावाच्या पत्रकाराच्या प्रेमात पडला आणि त्यानं पत्नीला घटस्फोट दिला. यानंतर 2008 मध्ये त्यांनी माधवीसोबत दुसरं लग्न केलं. आजकाल तो मॅच रेफरी म्हणून मैदानावर दिसतो.

हार्दिक पांड्या : भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याचंही लव्ह लाईफ बरंच वादग्रस्त राहिलं आहे. अलीकडेच त्यानं त्याची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक हिच्याशी घटस्फोट घेतला आहे. आता हार्दिकचं नाव ब्रिटीश गायिका जास्मिन वालियासोबत जोडलं जातं आहे. हार्दिक पांड्याला एक मुलगाही आहे.

हेही वाचा :

  1. हार्दिक आणि नताशामध्ये का झाला घटस्फोट? समोर आलं मोठं कारण... - Hardik Natasha Divorce

Last Updated : Aug 26, 2024, 2:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.