मुंबई - David Warner retired : ऑस्ट्रिलियन संघाचा धडाकेबाज सलामीवीर सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत होणार असल्याच्या बातमीनं क्रिकेटप्रेमींना धक्का बसला आहे. याआधीच त्यानं कसोटी क्रिकेट आणि एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचा निर्णय घेतला होता. पंरतु तो सध्या सुरू असलेल्या टी 20 विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाकडून खेळत होता. काल झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या सामन्यात वॉर्नरला चांगली फलंदाजी करता आली नव्हती. अर्शदीपच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या नादात त्यानं सुर्यकुमारच्या हाती झेल दिला आणि केवळ 6 धावावर तो तंबूत परतला होता. हा त्याचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना ठरेल चाहत्यांसह त्यालाही वाटले नसेल.
खरंतर कालचा सामना ऑस्ट्रेलिया संघासाठी खूप महत्त्वाचा होता. यामध्ये विजय न मिळाल्यानं डेव्हिड वॉर्नर दुखावला होता. ऑस्ट्रेलियाला आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी अफगानीस्तान आणि ऑस्ट्रेलियाच्या सामन्याच्या निकालावर अवंलबून राहावं लागलं होतं. आज पार पडलेल्या या सामन्यात अफगाणिस्ताननं बांगलादेशवर डीएलएसनुसार 8 धावांनी विजय मिळवला. अफगाणिस्ताननं या विजयासह सेमी फायनलमध्ये धडक मारल्यानं ऑस्ट्रेलियाच्या सेमी फायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा मावळल्या आहेत. या पार्श्वभूमीवर डेव्हिड वॉर्नरनं आपला निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे.
डेव्हिड वॉर्नर याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
द डेव्हिड वॉर्नर यानं ऑस्ट्रेलिया संघाचं 112 कसोटी सामने, 161 एकदिवसीय सामने आणि 110 टी 20 सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्यानं क्रिकेटच्या या तिन्ही प्रकारामध्ये आपली निर्विवाद हुकुमत गाजवली होती. त्यानं कसोटीत 8 हजार 786, एक दिवसीय सामन्यात 6 हजार 932 आणि टी 20 मध्ये 3 हजार 277 अशा धावा केल्या आहेत. डोव्हिड वॉर्नर यांन कसोटीमध्ये 26, एक दिवसीय सामन्यामध्ये 22 आणि टी 20मध्ये 1 शतक ठोकून आपण या सर्व फॉर्मॅटमध्ये कसा योग्य होतो हे आधीच सिद्ध केलं आहे.
हेही वाचा -
- 5 महिन्यांत जिममध्ये घाम गाळून 26 किलोपेक्षा कमी वजन केल्यानंतर जयदीप अहलावत केलं चाहत्यांना प्रभावित - JAIDEEP AHLAWAT
- खाऊ गल्लीत नीता अंबानींनी चाट समोस्यावर मारला ताव, चाटवाल्याला दिलं अनंत-राधिकाच्या लग्नाचं आमंत्रण - NITA AMBANI EAT VARANASI CHAAT
- शाहरुख खान लंडनमध्ये कुटुंबासह खेळला क्रिकेट, फोटो व्हायरल - shah rukh khan