पॅरिस Paris Olympics 2024 Wrestling : भारताचा स्टार कुस्तीपटू अमन सेहरावतनं (Aman Sehrawat) पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या फ्रीस्टाइल 57 किलो वजनी कुस्तीतील कांस्यपदक जिंकून इतिहास रचला आहे. यासह त्यानं भारताला सहावं पदक जिंकवून दिलं आहे.
More pride thanks to our wrestlers!
— Narendra Modi (@narendramodi) August 9, 2024
Congratulations to Aman Sehrawat for winning the Bronze Medal in the Men's Freestyle 57 kg at the Paris Olympics. His dedication and perseverance are clearly evident. The entire nation celebrates this remarkable feat.
उपांत्य फेरीत झाला होता पराभूत : उपांत्य फेरीत आव्हानात्मक सामना गमावल्यानंतर अमननं कांस्यपदकापर्यंत मजल मारली. त्याला उपांत्य फेरीच्या सामन्यात जपानच्या रे हिगुचीकडून पराभव स्वीकारावा लागला होता. जो माजी विश्वविजेता आणि रिओ 2016 ऑलिम्पिकचा रौप्य पदक विजेता आहे. तांत्रिक श्रेष्ठतेच्या जोरावर अमनला हिगुचीनं अमनला 10-0 नं पराभूत केलं होतं.
Heartiest congratulations to Aman Sehrawat on winning the bronze medal in the men’s freestyle wrestling event at the Paris Olympic Games. One of the youngest male wrestler in the Games, he has won a medal in his very first Olympics. He has a promising career ahead and he will win…
— President of India (@rashtrapatibhvn) August 9, 2024
सुरुवातीच्या सामन्यांमध्ये मिळवला विजय : याआधी स्पर्धेत अमननं सुरुवातीचे सामने सहज जिंकून आपल्या दमदार खेळाचं प्रदर्शन केलं होतं. प्री-क्वार्टर फायनल सामन्यात त्यानं माजी युरोपियन चॅम्पियन मॅसेडोनियाच्या व्लादिमीर एगोरोव्हचा 10-0 अशा तांत्रिक श्रेष्ठतेसह पराभव केला. यानंतर अमननं उपांत्यपूर्व फेरीत अल्बानियाचा माजी विश्वविजेता आणि चौथा मानांकित झेलीमखान अबाकारोव्हचा 12-0 असा पराभव करून विजय मिळवला.
फ्रीस्टाइल कुश्ती में कांस्य पदक जीतने पर अमन सहरावत को हार्दिक बधाई।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 9, 2024
पेरिस ओलंपिक में भारत को अपना छठा पदक जीतते देखकर बहुत खुशी हुई। हमारे ओलंपिक टीम के प्रदर्शन पर पूरे देश को गर्व है 🇮🇳 pic.twitter.com/qzNOJRjZl7
पॅरिस ऑलिम्पिकमधलं कुस्तीतलं पहिलं पदक : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या स्पर्धेत भाग घेणारा 21 वर्षीय अमन एकमेव कुस्तीपटू होता. देशाच्या अपेक्षांचा भार त्यानं आपल्या खांद्यावर घेतला. त्यानं टोकियो 2020 चा रौप्यपदक विजेता रवी दहिया याला भारतीय कुस्ती चाचण्यांमध्ये पराभूत करुन ऑलिम्पिकमध्ये आपलं स्थान मिळवलं होतं. यानंतर आता त्यानं कांस्यपदक जिंकलं आहे. विशेष म्हणजे पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कुस्तीमध्ये महिला आणि पुरुष कुस्तीपटूंना अद्याप एकही पदक जिंकता आलेलं नव्हतं. मात्र अमननं ही कसर भरुन काढली. 2008 पासून प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये भारत कुस्तीत एक तरी पदक जिंकत. याहीवर्षी ही परंपरा अमननं कायम ठेवली.
हेही वाचा-
- कुस्तीपटू विनेश फोगटला मिळेल रौप्यपदक? कधी येणार निर्णय, समोर आली मोठी अपडेट - Paris Olympics 2024
- 'क्रिकेटच्या देवा'नं केलं कुस्तीपटू विनेश फोगटचं समर्थन; नियमांवरच प्रश्न उपस्थित करत केली मोठी मागणी - Sachin Tendulkar on Vinesh Phogat
- हॉकी संघाचा गोलकीपर पीआर श्रीजेशचा मोठा सन्मान! मनू भाकरसोबत ऑलिम्पिकमध्ये मिळाली 'ही' मोठी जबाबदारी - Paris Olympics 2024