ETV Bharat / sports

जामनगर राजघराण्याचा उत्तराधिकारी बनला दिग्गज क्रिकेटपटू; रणजी-दुलीप ट्रॉफी याच राजघराण्याची देण - JAMNAGAR ROYAL FAMILY

भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू अजय जडेजाला जामनगरच्या राजघराण्याचा उत्तराधिकारी बनवण्यात आलं आहे.

Jamnagar Royal Family
शत्रूशल्यसिंहजी जडेजा (Getty Images)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Oct 12, 2024, 1:26 PM IST

जामनगर (गुजरात) Jamnagar Royal Family : जामनगर राजघराण्याचे माजी जामसाहेब शत्रूशल्यसिंहजी जडेजा यांनी आज राजघराण्याबाबत महत्त्वाची घोषणा केली. जामनगरचे रहिवासी आणि जाम साहेबांच्या कुटुंबातील सदस्य आणि ज्येष्ठ माजी भारतीय क्रिकेटपटू अजय सिंगजी जडेजा यांना त्यांचा उत्तराधिकारी म्हणून घोषित करण्यात आलं आहे. जामसाहेब शत्रूशल्यसिंहजी महाराज यांनी ऐतिहासिक निर्णय घेत विजयादशमीच्या पूर्वसंध्येला अजयसिंहजी जडेजा यांना आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केलं आहे. विशेष बाब म्हणजे अजय जडेजा हा भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आणि कर्णधारही राहिला आहे.

पत्राद्वारे केली घोषणा : शत्रूशल्यसिंहजी जडेजा यांनी गुजराती भाषेत जारी केलेल्या पत्रात लिहिलं की, 'दसरा हा सण त्या दिवशी चिन्हांकित करतो जेव्हा पांडव वनवासातून विजयी झाले होते. या शुभ दिवशी, अजय जडेजानं माझा उत्तराधिकारी होण्याचा अर्ज स्वीकारल्यानं मी माझा संभ्रम दूर केला आहे. मला पूर्ण विश्वास आहे की अजय जडेजा जामनगरच्या लोकांसाठी वरदान ठरेल आणि समर्पणानं त्यांची सेवा करेल. मी त्याचा खूप आभारी आहे.'

वारसाचा इतिहास काय? : सध्याचे जामसाहेब शत्रूशल्यसिंहजी निपुत्रिक आहेत, त्यामुळं अजय जडेजा यांची उत्तराधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे. जामसाहेब शत्रूशल्यसिंहजी यांचे वडील दिग्विजय सिंह होते. जे 33 वर्षे जामसाहेब राहिले. त्यांचे काका रणजितसिंहजी यांनी त्यांना दत्तक घेऊन त्यांचा उत्तराधिकारी बनवलं. भारतीय क्रिकेटची देशांतर्गत आणि बहुचर्चित स्पर्धा रणजी ट्रॉफी जामसाहेब रणजित सिंग यांच्या नावानं खेळली जाते. स्वातंत्र्यापूर्वी रणजितसिंग जडेजा हा भारतीय क्रिकेटचा सर्वोत्तम फलंदाज मानला जात होता.

अजय जडेजा राजघराण्यातील : अजय जडेजा हे रणजितसिंहजी आणि दिलीपसिंहजी यांच्या घराण्यातील असून शुक्रवारी त्यांना अधिकृतपणे उत्तराधिकारी घोषित करण्यात आलं. महान क्रिकेटपटू केएस रणजितसिंहजी हे 1907 ते 1933 पर्यंत नवानगरचे राज्यकर्ते होते. रणजी ट्रॉफी आणि दुलीप ट्रॉफी रणजीत सिंग आणि केएस दिलीप सिंग यांच्या नावावर आहे. शत्रुशल्यसिंहजी हे देखील प्रथम श्रेणी क्रिकेटपटू होते आणि नवानगरचे महाराजा ही पदवी मिळवणारे ते शेवटचे व्यक्ती होते.

अजय जडेजाची क्रिकेट कारकिर्द कशी : 53 वर्षीय अजय जडेजा जामनगरच्या राजघराण्यातील आहे. अजय जडेजा हा भारतीय क्रिकेट संघाचा सर्वोत्तम खेळाडू ठरला आहे. 1992 ते 2000 पर्यंत तो भारतीय क्रिकेट संघाचा भाग होता आणि उपकर्णधारही होता. त्यानं भारतासाठी 15 कसोटी सामने आणि 196 एकदिवसीय सामने खेळले आहेत. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर जामनगरच्या राजघराण्याचा नवा वारस म्हणून या दिग्गज क्रिकेटपटूच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. अशा स्थितीत संपूर्ण जामनेरात आनंदाचं वातावरण आहे.

हेही वाचा :

  1. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत कोण होणार भारतीय संघाचा कर्णधार? BCCI नं दिले स्पष्ट संकेत
  2. भारताच्या सात सदस्यीय क्रिकेट संघाची घोषणा; 'या' टूर्नामेंटमध्ये खेळणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.