मुंबई Aaditya Thackeray on IND vs BAN Test : बांगलादेशचा क्रिकेट संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात दोन्ही संघां 2 सामन्यांची कसोटी तर तीन सामन्यांची T20 मालिका खेळवली जाणार आहे. यातील कसोटी मालिका 19 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. यात पहिला कसोटी सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवली जाईल. तर दुसरा कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर होणार आहे.
बांगलादेशचा क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आहे... BCCI नेच त्यांना पायघड्या घातल्यात!
— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 18, 2024
आता मी पराराष्ट्र मंत्रालयाकडून जाणून घेण्यास उत्सुक आहे की, काही माध्यमं आणि सोशल मिडियात सातत्याने सांगितलं जात असल्याप्रमाणे गेल्या २ महिन्यात बांगलादेशातील हिंदूवर अत्याचार होत असल्याच्या…
आदित्य ठाकरेंची टीका : दरम्यान, आता या कसोटी सामन्याच्या व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. कारण शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनी या दोन संघांदरम्यानच्या क्रिकेट सामन्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या संदर्भात त्यांनी परराष्ट्र मंत्रालय आणि बीसीसीआयवरही प्रश्न उपस्थित केले. "शेजारच्या देशात हिंदू समाज हिंसाचाराला तोंड देत असताना बांगलादेश क्रिकेट संघाला भारत दौऱ्यावर का येऊ देत आहे," असा सवाल शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि बीसीसीआयला केला. यामुळं आता या सामन्याबाबत चांगलीच चर्चा होत आहे.
काय केली पोस्ट : सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमध्ये आदित्य ठाकरेंनी लिहिलं की, "बांगलादेशचा क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आहे. BCCI नंच त्यांना पायघड्या घातल्यात! आता मी पराराष्ट्र मंत्रालयाकडून जाणून घेण्यास उत्सुक आहे की, काही माध्यमं आणि सोशल मिडियात सातत्यानं सांगितलं जात असल्याप्रमाणे गेल्या 2 महिन्यात बांगलादेशातील हिंदूवर अत्याचार होत असल्याच्या बातम्या खऱ्या आहेत का? जर खऱ्या असतील, तर हिंदूंवर बांगलादेशात अन्याय होत असताना त्यांच्या क्रिकेट संघाला भारतात येऊ देण्याच्या निर्णयामागे केंद्र सरकारवर कोणाचा दबाव आहे? आणि जर ह्या बातम्या खोट्या असतील तर, सोशल मिडियातून आणि माध्यमातून पसरवल्या जाणाऱ्या ह्या बातम्या (बांगलादेशात हिंदू समाजावर अत्याचार!) हा भाजपानं भारतातल्या निवडणुका जिंकण्यासाठी आणि समाजात तेढ निर्माण करण्यासाठी निर्माण केलेला 'जुमला' तर नाही ना? हिंदूवर जर बांगलादेशात खरंच अत्याचार होत असतील, तर भाजपा प्रणित केंद्र सरकार त्यांच्याच क्रिकेट संघाला पायघड्या का घालतंय? कुठं गेलं ह्यांचं हिंदुत्व? की त्यांचं हिंदुत्व केवळ निवडणुकांसाठीच असतं?" या आशयाची पोस्ट करत आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि BCCI वर जोरदार टीका केली आहे.
हेही वाचा :