- मेष : या आठवडयतात आपणास कुटुंबियांचं सहकार्य मिळेल. त्यांच्यासह एखाद्या ठिकाणी फिरावयास जाण्याची संधी मिळेल. तेथे गेल्याने सर्वजण खुश झाल्याचं दिसून येईल. शैक्षणिक जीवनात यश प्राप्त होईल. प्रणयी जीवनातील गोडवा टिकून राहील. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात खुश असल्याचं दिसून येतील. भावाच्या विवाहात येणाऱ्या अडचणी दूर होतील. घरात मंगल कार्याचं आयोजन होईल. नोकरी करणाऱ्यांना नोकरीच्या ठिकाणी देण्यात आलेली कामे वेळेवर पूर्ण करावी लागतील. वरिष्ठांचं सहकार्य मिळेल. व्यापारात यश प्राप्ती होईल. धन लाभ संभवतो. खर्चात वाढ होईल, परंतु प्राप्ती सुद्धा वाढेल. आपण स्वतःसाठी एखादे नवीन वाहन खरेदी करू शकता. आपली प्रकृती ठीक राहील. विद्यार्थी मन लावून अध्ययन करतील. आपले मन विचलित होऊ न देता अभ्यास केल्यानं त्यांना अपेक्षित परिणाम मिळतील. बाहेर जाण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ शकतात. या आठवड्यात कोणालाही उसने पैसे देऊ नका.
- वृषभ : या आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात खुश असल्याचं दिसून येईल. आपल्यावर वडिलधाऱ्यांचे आशीर्वाद राहतील. मातेचे सानिध्य आणि सहकार्य लाभेल. आपले प्रणयी जीवन सुखद होईल. आपण आपल्या प्रेमिकेशी नवीन नाते जोडू शकाल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. व्यापारात यश प्राप्ती होईल. सरकारी क्षेत्राकडून सुद्धा लाभ होण्याची संभावना आहे. नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याचे संकेत आहेत. उच्च शिक्षणासाठी आठवडा उत्तम आहे. आपणास आपली कामगिरी दाखविण्याची संधी मिळेल. घरात पूजा-पाठाचे आयोजन होईल. त्यामुळं घरातील ये-जा वाढेल. या आठवड्यात आपली प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली राहील. जे आयात-निर्यातीशी संबंधित कार्यात गुंतलेले आहेत त्यांना चांगली बातमी मिळेल. शैक्षणिक जीवनात यश प्राप्त होईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडत्या शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाल्यानं त्याचा खूप फायदा होईल.
- मिथुन : या आठवडा आपणास आर्थिक दृष्ट्या उत्तम आहे. आपणास नवीन कंत्राट मिळाल्यानं आपण व्यवसायास पुढे घऊन जाण्यात यशस्वी व्हाल. सर्व प्रकारचे खर्च करण्याची आपली तयारी असेल. घराची दुरुस्ती आणि सजावटीसाठी सुद्धा आपण भरपूर पैसा खर्च कराल. बहिणीच्या विवाहात येणारे अडथळे दूर होतील. मंगल कार्याचं आयोजन होईल. सर्वजण एकत्रितपणे खरेदी करण्यासाठी जाल. नोकरी करणाऱ्यांना नोकरीच्या ठिकाणी देण्यात आलेली कामे वेळेवर पूर्ण करावी लागतील. वरिष्ठांशी बोलताना तोलून मापून बोलणं हितावह होईल. सामाजिक कार्य करण्याची संधी मिळेल. त्यासाठी एखाद्या सामाजिक संस्थेत सहभागी होऊ शकता. वैवाहिक जीवनात सुख-शांती नांदेल. जोडीदारासह प्रणय गीत गात सुटाल. प्रेमीजन त्यांच्या प्रेमिकेस आपल्या मनातील विचार सांगू शकतील आणि त्यामुळं ती खुश झाल्याचं दिसून येईल. एखाद्या धार्मिक कार्यक्रमात आपण कुटुंबियांसह सहभागी व्हाल. त्यामुळं आपणास मनःशांती मिळेल. एखाद्या तीर्थ यात्रेचं आयोजन होईल.
- कर्क : या आठवड्यात विवाहितांच्या वैवाहिक जीवनात चढ-उतार होताना दिसतील. आपण आपल्या अहंकारामुळं असं काही बोलाल की, त्यामुळं आपला जोडीदार दुखावला जाऊ शकतो. आपण आणि आपली प्रेमिका या दरम्यान उत्तम समन्वय राहील. आपण कुटुंबियांसह एखादी तीर्थ यात्रा करण्याचं आयोजन कराल. विद्यार्थी मन लावून अभ्यास करतील. उच्च शिक्षणासाठी आठवडा उत्तम आहे. आपली आर्थिक स्थिती उत्तम राहील. प्रत्येक दिवसाच्या प्राप्तीत वाढ होईल. आपण एखादी आर्थिक गुंतवणूक सुद्धा करू शकता. व्यापाऱ्यांना अपेक्षित लाभ प्राप्ती होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या नोकरीत खुश असल्याचं दिसून येईल. ऋतुमानातील बदलामुळं प्रकृतीत चढ-उतार होत असल्याचं दिसून येईल. स्पर्धेत यश संभवते. घरात पूजा - पाठाचं आयोजन होईल. मातेचं सानिध्य लाभेल. त्यांचं प्रेम मिळेल. भावनेच्या आहारी न जाता विचारपूर्वक कामे केल्यास या आठवड्यात आपला खूप फायदा होईल.
- सिंह : या आठवड्यात आपणास स्वतःवर विश्वास ठेवायला शिकावं लागेल. असं केल्यानेच आपणास चांगले परिणाम मिळू शकतील. प्रणयी जीवन असो किंवा वैवाहिक जीवन आपण त्यात खुश आणि संतुष्ट असल्याचं दिसेल. काही महत्वाच्या कामात आपणास भागीदाराची साथ मिळाल्यानं आपला आत्मविश्वास उंचावेल. आर्थिक बाबतीत चढ-उतार आले तरी आपणास चांगली प्राप्ती होऊ शकते. व्यापारासाठी आठवडा अनुकूल आहे. आपल्या व्यवसायास वेगळ्या दिशेत प्रगती करण्याची संधी मिळेल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळविण्यात यश प्राप्त होऊ शकते. विद्यार्थ्यांनी एखादे ध्येय समोर ठेवून अभ्यास केल्यास त्यांना चांगले परिणाम मिळू शकतील. असं झाल्यामुळं त्यांची शिक्षणातील गोडी सुद्धा वाढेल. या आठवड्यात आपल्या आरोग्याची जास्त काळजी घ्यावी. अशक्तपणा संभवतो.
- कन्या : या आठवड्यात आपणास वैवाहिक जोडीदाराचं सहकार्य मिळेल. त्यांच्यासह काही सुखद क्षण घालवू शकाल. मुलांचे सहकार्य मिळेल. वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद प्राप्त होतील. पैतृक संपत्तीतून धनलाभ संभवतो. प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली राहील. प्रणयी जीवनात चढ-उतार येतील. आपली आर्थिक स्थिती ठीक राहील. खर्चात वाढ होईल. शैक्षणिक जीवनात यश प्राप्त होईल. नोकरी करणाऱ्यांना नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. प्राप्तीत वाढ होईल. व्यापारात आपण यशस्वी व्हाल. नवीन संधी मिळेल. स्पर्धेत यश प्राप्त होईल. जे घरापासून दूर राहून नोकरी करत आहेत त्यांना घराची आठवण त्रस्त करेल. विवाहेच्छुकांच्या विवाहाची बोलणी संभवतात. कुटुंबीय एकत्रितपणे एखाद्या तीर्थ यात्रेस जाण्याचं आयोजन करतील.
- तूळ : हा आठवडा प्रणयी जीवनासाठी उत्तम आहे. आपले नाते दृढ होईल. आपण कुटुंबियांना आपल्या प्रेमिकेची ओळख करून देऊ शकाल. असं केल्यानं आपल्या विवाहास विलंब होणार नाही. वैवाहिक जीवनात सुख-शांती नांदेल. जोडीदाराच्या सहवासात आपण आनंदाचे काही क्षण व्यतीत कराल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती नोकरी व्यतिरिक्त एखादा जोड व्यवसाय सुद्धा करू शकतील. त्यात त्यांना वैवाहिक जोडीदाराची साथ मिळेल. व्यापारी आपला व्यवसाय पुढे नेण्याचा जो प्रयत्न करत आहेत, त्यात यशस्वी होतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. थकबाकी मिळेल. आपण जर कर्ज घेतलं असेल किंवा कोणाकडून उसने पैसे घेतले असतील तर त्याची परतफेड होऊ शकेल. राजकारणात यश प्राप्त होईल. घरात होम-हवन, पूजा-पाठ, भजन, कीर्तन इत्यादींचं आयोजन होईल. त्यात सर्वजण एकत्रितपणे काम करताना दिसतील.
- वृश्चिक : या आठवड्यात आपण आपल्या प्रेमिकेस आपल्या मनातील विचार सांगू शकाल. तिला एखादी भेटवस्तू सुद्धा देऊ शकता. असं केल्यानं ती खुश होईल. वैवाहिक जीवनात एखाद्या त्रयस्थाचा हस्तक्षेप तणाव निर्माण करू शकतो, तेव्हा सावध राहा. नवीन वाहनाचे सौख्य प्राप्त होईल. पैतृक संपत्तीतून धनलाभ संभवतो. आपली आर्थिक स्थिती चांगली राहील. आपल्या खर्चात वाढ झाली तरी प्राप्तीत सुद्धा वृद्धी होईल. सरकारी क्षेत्राकडून सुद्धा आपणास लाभ होईल. नोकरीत प्रगती होईल. व्यापारात नवीन कंत्राट मिळतील. विद्यार्थी मन लावून अभ्यास करतील. त्यामुळं त्यांना अपेक्षित परिणाम मिळतील. उच्च शिक्षणासाठी आठवडा अनुकूल आहे. आपणास आपल्या आवडीचे विषय शिकण्याची संधी मिळेल. भावाच्या विवाहात येणारे अडथळे दूर होतील. घरात मंगल कार्याचं आयोजन होईल.
- धनु : या आठवड्यात आपणास कुटुंबियांचं सहकार्य लाभेल. त्यांच्या सहवासात वेळ घालवाल. आपली सुख-दुःख एकमेकांना सांगाल. भविष्यात काही त्रास होऊ नये म्हणून धन संचय कसा करावा हे आपण वडिलधाऱ्यांकडून शिकून घ्याल. वैवाहिक जीवनात चढ-उतार येतील. प्रवास संभवतात. हे प्रवास सुखद होतील. आपले प्रणयी जीवन खुशीने भरलेले असेल. कामाच्या ठिकाणी आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. धन लाभ संभवतो. आपण एखादी प्रॉपर्टी सुद्धा खरेदी करू शकता. व्यापाऱ्यांना सावध राहावं लागेल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या मेहनतीमुळं यश प्राप्त होईल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन रमणार नाही. माता-पिता दुःखी होतील. उच्च शिक्षणासाठी आठवडा अनुकूल आहे. प्रकृतीच्या दृष्टीनं हा आठवडा नाजूक आहे.
- मकर : या आठवड्यात विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेतील. ते आपल्या जोडीदारासह एखादे नवीन कार्य सुरु करू शकतील. बहिणीच्या प्रकृतीत पूर्वी पेक्षा सुधारणा होईल. मुलास चांगली नोकरी लागल्यानं माता-पिता खुश होतील. प्राप्तीची नवीन संधी मिळेल. त्यातून लाभ मिळवून आपण आपली आर्थिक स्थिती मजबूत करू शकाल. आपण घरगुती कार्यात सुद्धा भरपूर पैसा खर्च कराल. दूरवर राहणाऱ्या नातेवाईकाच्या विवाहात सहभागी व्हाल. तेथे सर्वांची भेट होईल. उच्च शिक्षणासाठी आठवडा अनुकूल आहे. परदेशातून शिक्षणाची सुद्धा संधी मिळेल. प्रणयी जीवनात चढ-उतार होत असल्याचं दिसून येईल. व्यापारास पुढे घेऊन जाण्यात आपण यशस्वी व्हाल. कामाच्या ठिकाणी आपणास देण्यात आलेली सर्व कामे आपण मन लावून कराल. आपणास आपल्या वरिष्ठांचे आणि कनिष्ठांचे सहकार्य मिळेल. वडिलधाऱ्यांचं आशीर्वाद घेतल्यास आपली सर्व कामे पूर्ण होतील.
- कुंभ : या आठवड्यात आपले प्रेम संबंध दृढ होतील. आपल्या प्रेमिकेची ओळख आपल्या कुटुंबियांना करून देऊ शकाल. त्यामुळं आपल्या विवाहास विलंब होणार नाही. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंद अनुभवतील. जोडीदारासह कुटुंबाच्या कल्याणासाठी कार्य कराल. आर्थिक स्थिती ठीक राहील. आपण पूर्वी जी गुंतवणूक केली होती त्याचा पूर्ण लाभ मिळेल. आपले मित्र आणि नातेवाईक आपली आर्थिक स्थिती मजबूत करण्यास मदत करतील. जे भागीदारीत व्यवसाय करत आहेत त्यांना खूप मोठा लाभ होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नोकरीच्या ठिकाणी देण्यात आलेली कामे वेळेवर पूर्ण करावी लागतील. उच्च शिक्षणासाठी आठवडा प्रतिकूल आहे. आपले अभ्यासात लक्ष लागणार नाही. आपणास वडिलधाऱ्यांचे मार्गदर्शन लाभेल. विवाहेच्छुकांच्या विवाहाची बोलणी संभवतात.
- मीन : या आठवड्यात विवाहित व्यक्ती आनंदात राहतील. कुटुंबियांसह एखाद्या ठिकाणी फिरावयास जाण्याचा बेत आखतील. प्रेम विवाहाची संभावना आहे. विवाहेच्छुकांसाठी त्यांच्या पसंतीस उतरेल असे चांगले स्थळ येईल. हा आठवडा खर्चिक आहे. रोजची प्राप्ती चांगली झाल्यानं आपणास त्याचा काही त्रास होणार नाही. व्यापाऱ्यांना चांगला लाभ प्राप्त होईल. प्रकृतीत पूर्वी पेक्षा जास्त सुधारणा होईल. उच्च शिक्षणासाठी आठवडा अनुकूल आहे. आपणास आवडीचे विषय शिकण्याची संधी मिळेल. आपल्यावर वडीलधाऱ्यांचा वरदहस्त राहील. घर, दुकान, प्लॉट इत्यादी खरेदी करण्याची इच्छा असणाऱ्यांना त्यात यश प्राप्त होईल. मुलास चांगली नोकरी लागल्यानं माता-पिता आनंदित होतील. या आठवड्यात कौटुंबिक समस्या आपले लक्ष वेधून घेतील. त्यामुळं आपण लक्षपूर्वक अभ्यास करू शकणार नाही.
हेही वाचा -