- मेष : हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. कुटुंबियांचं सहकार्य मिळेल. कुटुंबीय एकजुटीनं काम करत असल्याचं दिसून येईल. विवाहित व्यक्ती आपल्या जोडीदाराच्या सहवासात खुश असल्याचं दिसून येईल. असं असून सुद्धा काही कारणानं त्यांच्यात तणाव असल्याचं सुद्धा दिसेल. वडील्याच्या संपत्तीतून धनलाभ होईल. या आठवड्यात अदांजपत्र बनवून आपण खर्च कराल. उच्च शिक्षणासाठी आठवडा अनुकूल आहे. आपणास नशिबाची साथ मिळेल. परदेशात शिक्षण घेण्याची संधी सुद्धा मिळेल. मुलांच्या सहवासात आपण थोडा वेळ घालवाल. मातेचा आशीर्वाद घ्यावा. आपण एखाद्या नवीन प्रॉपर्टीत गुंतवणूक करू शकता,जी भविष्यात आपणास मोठा लाभ मिळवून देईल. प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी आपण सकाळी फिरावयास जाणं, योगासन आणि ध्यान-धारणा इत्यादींचा आपल्या दिनचर्येत समावेश करावा.
- वृषभ : हा आठवडा आपल्यासाठी उत्तम आहे. आपले प्रणयी जीवन उत्तम असेल. वैवाहिक जीवनात काहीसा तणाव असल्याचं दिसलं तरी आपण कौशल्यपूर्वक तो दूर करण्यात यशस्वी व्हाल. आपणास जर एखाद्या प्रॉपर्टीत गुंतवणूक करावयाची असेल तर त्यासाठी हा आठवडा अनुकूल आहे. शैक्षणिक जीवनात यश प्राप्त होईल. उच्च शिक्षणासाठी आठवडा उत्तम आहे. नोकरी करणाऱ्यांनी सध्याच्या नोकरीत टिकून राहणं हितावह आहे. व्यापारी त्यांच्या व्यवसायात काही नवीन योजनांची अंमल बजावणी करून व्यवसायात प्रगती करण्यात यशस्वी होतील. प्रकृतीत हळू हळू सुधारणा होईल. प्रकृती विषयक एखादी समस्या असल्यास चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घेणं उपयुक्त ठरेल. खर्च वाढतील. आपण फिरण्यासाठी सुद्धा खर्च कराल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. कुटुंबीय एकत्रितपणे एखाद्या धार्मिक यात्रेस जाण्याची योजना आखतील.
- मिथुन : हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आपण आपल्या वैवाहिक जीवनाचा भरपूर आनंद घेऊ शकाल. कुटुंबियांचे सहकार्य लाभेल. कुटुंबियांसह एखाद्या ठिकाणी फिरावयास जाण्याचा बेत आपण आखत असल्याचं दिसेल. आपण आपल्या मनःशांतीसाठी काही काळ धार्मिक कार्यक्रमात सुद्धा व्यतीत कराल. आपल्या भावाच्या विवाहात येत असलेले अडथळे एखाद्या नातेवाईकाच्या मदतीनं दूर होतील. घरात मंगल कार्याचे आयोजन होईल. त्यात कुटुंबातील सर्वजण काम करत असल्याचं दिसून येईल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. शैक्षणिक जीवनात सुद्धा यश प्राप्त होईल. पूर्वीच्या मानानं प्रकृतीत सुधारणा होईल. नोकरीत प्रगती होईल. व्यवसायात आपल्या योजना पुन्हा सुरु करण्यात आपण यशस्वी व्हाल. प्रणयी जीवन सुखावह होईल. आपण आपल्या प्रेमिकेस एखादी भेटवस्तू देऊ शकता. एखाद्या रोमँटिक रात्री भोजनास सुद्धा जाऊ शकता.
- कर्क : या आठवड्यात आपण खुश असल्याचं दिसून येईल. वैवाहिक जीवनात सुख - शांती नांदेल. या आठवड्यात आपण आपल्या वैवाहिक जोडीदाराची आवड ओळखून त्यांना खुश करण्यावर भर द्याल. प्रेमीजन त्यांच्या प्रेमिकेस भेटून आपल्या मनातील विचार व्यक्त करण्यात यशस्वी होतील. शैक्षणिक जीवनात यश प्राप्त होईल. उच्च शिक्षणासाठी आठवडा अनुकूल आहे. आपण जर एखाद्या स्पर्धेत सहभागी होणार असाल तर आपणास खूप मेहनत करावी लागू शकते. आर्थिक स्थिती मजबूत राहील. व्यापार वृद्धी होईल. आपलं आरोग्य उत्तम राहील. स्वतःला ताजेतवानं ठेवण्यासाठी आपल्या दिनचर्येत बदल करावे. संपत्तीतून धन लाभ होईल.आपण एखाद्या ठिकाणी आर्थिक गुंतवणूक करू शकता,जी येणाऱ्या कालखंडात आपणास लाभ देईल.
- सिंह : विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनात खुश असल्याचं दिसून येईल. प्रेमीजनांना त्यांच्या प्रेमिकेचे सहकार्य मिळेल. विवाहेच्छूकांना चांगली स्थळे येतील. शैक्षणिक जीवनात यश प्राप्त होईल. असं असलं तरी जे मित्र आपला वेळ वाया घालवत असतील त्यांच्या पासून आपणास दूर राहावं लागेल. नोकरी करणाऱ्यांनी नवीन नोकरीच्या मागे न लागता आहे ती नोकरी टिकवून ठेवणं हितावह होईल. त्यातच आपणास भरपूर संधी मिळेल. व्यापारात आपणास प्रतिष्ठित व्यक्तींना भेटण्याची संधी मिळेल. प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं दिसेल. आपली आर्थिक स्थिती मजबूत राहील. आपण जमिनीत गुंतवणूक करू शकता. आपणास जर नवीन वाहन घ्यावयाचं असेल तर आपण ते घेऊ शकता. हे सर्व करताना आपण जर आपल्या खर्चांवर नियंत्रण ठेवलेत तर ते आपल्यासाठी उपयुक्त होईल.
- कन्या : हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. कुटुंबियांचे सहकार्य लाभेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. आपण वैवाहिक जोडादारासह एखाद्या रोमँटिक रात्री भोजनास सुद्धा जाल. अविवाहितांना त्यांच्या मनाप्रमाणे जोडीदार मिळण्याची संभावना आहे. कुटुंबात मंगल कार्याचं आयोजन होईल. घर सजावटीसाठी काही खरेदी सुद्धा कराल. व्यापार वृद्धीसाठी एखाद्या चांगल्या व्यक्तीचे सहकार्य मिळेल. शिक्षणात आपल्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल. स्पर्धेत यश प्राप्त होईल. नोकरीत तुम्हाला देण्यात आलेली कामे पूर्ण कराल. अधिकारी वर्गाचे सहकार्य मिळेल. कुटुंबियांसह एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याचा बेत ठरवाल. त्याने सर्वजण खुश होतील. आपण एखाद्या प्रॉपर्टीत गुंतवणूक करू शकता.
- तूळ : हा आठवडा आपल्यासाठी विशेष आहे. कुटुंबात काही ना काही कारणानं कलहाचं वातावरण राहीलच. काही कारणानं वैवाहिक जोडीदाराशी भांडण होऊ शकते. प्रणयी जीवनात सुद्धा वाणीतील कठोरतेमुळं मने दुखावल्याचं जाणवेल. प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी आपणास आपल्या दिनचर्येत बदल करावा लागेल. उच्च शिक्षणासाठी आठवडा अनुकूल आहे. आपणास परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची संधी मिळेल. आपली आर्थिक स्थिती उत्तम राहील. आपण सर्वांचे कर्ज फेडण्यात यशस्वी व्हाल. मित्रांद्वारा प्राप्तीच्या संधी येतील. आपण व्यापार वृद्धीसाठी जो प्रयत्न करत होता त्यात यशस्वी व्हाल. नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. या आठवड्यात आपण जमिनीत गुंतवणूक करू शकता. आपण जर एखादे घर किंवा प्लॉट खरेदी करू इच्छित असाल तर त्यात सुद्धा यशस्वी व्हाल.
- वृश्चिक : या आठवड्यात आपण जे अनेक दिवसांपासून आपल्या आवडीचं काम करू इच्छिता ते पूर्ण कराल. मित्रांचं सहकार्य मिळेल. मित्रांसह एखाद्या ठिकाणी फिरावयास जाण्याचा बेत सुद्धा ठरवू शकाल, ज्यात खर्च जास्त होऊ शकतो. नोकरीत आपली प्रगती होईल. व्यापारात प्रगती करण्यात यशस्वी व्हाल. अविवाहितांच्या विवाहाची बोलणी होण्याची संभावना आहे. घरात पूजा - पाठाचे आयोजन होईल. अधिकारी वर्गाशी संवाद साधताना वाणीत गोडवा ठेवावा. आरोग्या प्रती सावध राहावं. वैवाहिक जीवनात थोडासा तणाव असल्याचं दिसेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. प्राप्तीत वाढ होईल. खर्च सुद्धा वाढतील. आपण स्वतःसाठी आणि कुटुंबियांसाठी काही खरेदी कराल. शैक्षणिक जीवनात यश प्राप्त होईल. उच्च शिक्षणासाठी आठवडा उत्तम आहे. शिक्षणासाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात जाऊ शकता.
- धनु : दीर्घ काळापासून आपण जी महत्वाची कामे करू शकत नव्हता, ती या आठवड्यात करू शकाल. वैवाहिक जोडीदारासह सुखद क्षण घालवून एखाद्या नवीन कार्याची सुरूवात कराल. यात जोडीदार पूर्ण सहकार्य करेल. आपले प्रणयी जीवन सुखावह होईल. प्रकृतीत सुधारणा होईल. शैक्षणिक जीवनात जास्त मेहनत करूनच यश प्राप्ती होईल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. नोकरी करणाऱ्यांना अधिकारी वर्गाकडून चांगली बातमी ऐकण्यास मिळेल. आपण जमिनीत गुंतवणूक करू शकता. आपण जर याआधी गुंतवणूक केली असेल तर त्याचा सुद्धा पूर्ण लाभ मिळेल. नवीन वाहनाचे सुद्धा सौख्य लाभेल. भावंडांच्या शिक्षणासाठी आर्थिक गुंतवणूक कराल. शेअर्स बाजारात गुंतवणूक करू नये. आपण आपली सर्व कामे पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. कुटुंबियांचे सहकार्य लाभेल.
- मकर : या आठवड्यात आपणास आपले संबंध आणि नात्यास खूपच सांभाळावं लागेल. एखाद्या बाहेरील व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळं मने दुखावण्याची संभावना आहे. कुटुंबियांच्या सहवासात वेळ घालवावा. एखाद्या ठिकाणी फिरावयास जाण्याची योजना आखावी. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. दैनिक प्राप्तीत वाढ होईल. विद्या प्राप्तीत काही समस्यांना सामोरे जावं लागू शकतं. उच्च शिक्षणासाठी आठवडा उत्तम आहे. भावाच्या विवाहात येणारा अडथळा दूर होईल. घरात मंगल कार्याचं आयोजन होईल. सर्वजण मिळून खरेदीसाठी जाल. एखाद्या नवीन पाहुण्याच्या आगमनानं घरात आनंदाचं वातावरण निर्माण होईल. आपले मित्र आर्थिक मदत करतील. गुंतवणूक करताना एखाद्या जाणकाराचा सल्ला घ्यावा. प्रकृतीत सुधारणा होईल. नवीन नोकरीची ऑफर सुद्धा येईल. व्यापार वृद्धीसाठी आपला भाऊ आपणास मदत करेल.
- कुंभ : हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. आपण कुटुंबियांच्या सहवासात थोडा वेळ व्यतीत करून धन संचय कसा करावा ते शिकून घ्याल. आगामी काळात ते आपल्या उपयोगी पडेल. शिक्षणात खूप मेहनत करूनच आपण यशस्वी व्हाल. आपला वेळ वाया दवडत असतील अशा मित्रांपासून मात्र दूर राहा. आर्थिक स्थिती मजबूत राहील. आपण एखादे नवीन घर खरेदी करू शकता. नवीन वाहनाचे सौख्य सुद्धा प्राप्त होईल. वैवाहिक जीवन आनंदाने भरलेलं असेल. आपले प्रणयी जीवन सुखद असेल. परदेशाशी व्यापार करण्याची संधी मिळेल. नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक गुंतवणूक कराल. आपण जर यापूर्वी एखादी गुंतवणूक केली असेल तर त्याचा सुद्धा पूर्ण लाभ होईल. विवाहेच्छुकांच्या विवाहाची बोलणी होऊ शकतात.
- मीन : या आठवड्यात आपणास उत्साही असल्याची जाणीव होईल. त्यामुळं आपण आपली सर्व प्रलंबित कामे पूर्ण कराल. आपण आपल्या प्रेमिकेस आपल्या मनातील विचार सांगाल. काही क्षण एकमेकांच्या सहवासात घालवाल. कुटुंबियांचं सहकार्य मिळेल. वैवाहिक जोडीदाराशी असलेला दुरावा कमी होईल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. नोकरीत आपले वरिष्ठ आपल्या कामाची प्रशंसा करतील. व्यवसायात सुद्धा आपणास यश प्राप्त होईल. परदेशात आयात - निर्यात करण्याची संधी सुद्धा मिळेल. मित्रांकडून चांगली बातमी मिळेल. प्रकृतीत सुधारणा होईल. शैक्षणिक जीवनात यश प्राप्त होईल. सरकारी परीक्षेसाठी खूप तयारी करावी लागेल. उच्च शिक्षणासाठी आठवडा अनुकूल आहे. शेअर्स बाजारात गुंतवणूक करू शकता. आपण आपल्या घर सजावटीसाठी काही खरेदी कराल.
हेही वाचा -