हैदराबाद : दरवर्षी आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला शरद पौर्णिमा साजरी केली जाते. महाराष्ट्रात याला कोजागरी तर गुजरातमध्ये याला 'शरद पौर्णिमा' असेही म्हणतात. या दिवशी देवी लक्ष्मीसह विष्णूची पूजा करण्याची परंपरा आहे.
कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी माता पृथ्वीवर भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येते असे मानले जाते. देवीला प्रसन्न करण्यासाठी भक्त उपवास करून माता लक्ष्मीची पूजा करतात. हिंदू दिनदर्शिकेनुसार शरद पौर्णिमा ही वर्षातील पौर्णिमा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. केवळ शरद पौर्णिमेच्या दिवशीच चंद्र सोळा टप्प्यांनी पूर्ण होतो (उगवतो) असे मानले जाते.
चंद्राच्या सोळा कला म्हणजे 16 गुण- चंद्राच्या सोळा कला म्हणजे सोळा गुण मानले जातात. प्रत्येक गुण हा एका कलेशी निगडित असतो, अशी हिंदू धर्मात श्रद्धा आहे. तर सर्व 16 कला एका आदर्श व्यक्तिमत्वात उपस्थित असतात. भगवान श्रीकृष्ण हे 16 कला असलेले एक आदर्श व्यक्तिमत्व मानले जाते. श्रीकृष्ण हे भगवान विष्णूचा पूर्ण अवतार मानला जातात. तर भगवान श्रीरामामध्ये केवळ 12 कलांचे मिश्रण होते, असे मानले जाते. या कारणास्तव कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र देवाची पूजा करण्याचे खूप महत्त्व आहे.
- महाराष्ट्रात कोजागरी पौर्णिमा कशी साजरी होते?महाराष्ट्रात कोजागरी पौर्णिमा सहकुटुंब अथवा मित्रमंडळीमध्ये साजरी केली जाते. चंद्राचे प्रतिबिंब दिसेल अशा पद्धतीनं अंगणात दुधाचे भांडे ठेवले जाते. दुधात पडलेल्या पडलेल्या चंद्रदेवतेच्या प्रतिबिंबाचं दर्शन घेतले जाते. चंद्रप्रकाश पडलेले दूध हे कुटुंब आणि मित्रमंडळी एकत्रित पितात.
कोजागरी पौर्णिमेची वेळ कोणती?
- दिवस बुधवार, 16 ऑक्टोबर 2024
- शरद पौर्णिमा, चंद्रोदयाची वेळ - 4.42 वाजता
- पौर्णिमा तिथी प्रारंभ: 16 ऑक्टोबर 2024 रात्री 8:40 वाजता
- पौर्णिमा तिथी पूर्ण: 17 ऑक्टोबर 2024 दुपारी 4:55 वाजता
चंद्रप्रकाशात ठेवतात खीर-शरद पौर्णिमेच्या दिवशी दिवशी चंद्राच्या किरणांमध्ये आश्चर्यकारक गुणधर्म असतात. त्यामुळे या दिवशी चंद्र किरणांना आरोग्यासाठी आणि आयुष्याच्या कल्याणासाठी अमृत मानले जाते. कोजागरी पौर्णिमेला गायीच्या दुधापासून तयार केलेली खीर रात्री चंद्रप्रकाशात ठेवली जाते. ही खीर अनेक गुणांनी भरलेली असते, असे मानले जाते. कोजागरी पौर्णिमेत चंद्रप्रकाशात ठेवलेली खीर खाल्ल्यानं शारीरिक आणि मानसिक पीडा दूर होतात, असे मानले जाते. विशेषत: दृष्टीसाठी ही खीर फायदेशीर मानले जाते. कोजागरी पौर्णिमेला रात्रभर ठेवलेली खीर सकाळी पूजा करून खावी. कोजागरी पौर्णिमेचा प्रसाद म्हणून कुटुंबातील सदस्यांमध्ये द्यावा.
पौर्णिमेचे उपवास आजपासून सुरू करता येतील?अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील शरद पौर्णिमा किंवा कोजागरी पौर्णिमा आज आहे. वर्षातील सर्व पौर्णिमा तिथींमध्ये शरद पौर्णिमा ही सर्वात महत्त्वाची शुभ आणि फलदायी मानली जाते. शरद पौर्णिमेचे व्रत आज करता येईल. नवविवाहित स्त्रियांना वर्षातील सर्व पौर्णिमेच्या दिवशी उपवास करण्याचे व्रत आजपासून सुरू करता येईल.
कशामुळे म्हटले जाते कोजागरी पौर्णिमा-उत्तर प्रदेशात शरद पौर्णिमा ही रास पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. मान्यतेनुसार, शरद पौर्णिमेच्या रात्री भगवान श्रीकृष्णानं दैवी प्रेमानं अद्भुत नृत्य म्हणजे रासलीला केली. काही ठिकाणी कोजागरीला उपवास करण्याचीही परंपरा आहे. या प्रसंगी पाळल्या जाणाऱ्या व्रताला कोजागर व्रत आणि कौमुदी व्रत असेही म्हणतात. शरद पौर्णिमेलाच कुमार पौर्णिमा, कोजागरी पौर्णिमा, नवन्ना पौर्णिमा, कोजाग्रत पौर्णिमा किंवा कौमुदी पौर्णिमा असेही म्हणतात. कोजागरी म्हणजे कोण जागे राहून पूजा करत आहे, हे देवी पाहते. यावरून कोजागरी या पौर्णिमेला म्हटले जाते.
पूजा कशी करावी? पंडित किराडू यांनी सांगितले की, भगवान श्रीकृष्णांनी 16,000 गोपींसोबत शरद पौर्णिमेला रासलीला आयोजित केल्याचाही उल्लेख धर्मग्रंथात आढळतो. शरद पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी, कुबेर, देवांचा राजा इंद्र आणि ऐरावत यांची पूजा शास्त्रात सांगितली आहे. भगवान हनुमानाचीदेखील पूजा केली जाते. एखाद्या भक्तानं शरद पौर्णिमेला मा लक्ष्मीची मनापासून पूजा केली तर देवी लक्ष्मी त्याला आयुष्यभर संपत्ती देते. त्याला गरिबी कधीच येत नाही. धनप्राप्तीसोबतच हा दिवस सुख आणि भाग्यही वाढवतो. देवी लक्ष्मीला खीर खूप आवडते. या दिवशी खीरचा प्रसाद बनवून देवी लक्ष्मीला अर्पण करावा.
Disclaimer - सदरील लेख प्राप्त माहितीवर आणि धार्मिक मान्यतांवर आधारित आहे. या लेखातील माहितीशी 'ईटीव्ही भारत' सहमत असेलच असं नाही.